झाकोळ व कल्लोळ व मागोवा.
३०.११ .२०२३ . मम प्रिय वाचक हो, आज मी फक्त ,चार लाईना," story लिहिणार आहे. ही संज्ञा, सर्वसाधारणतः boliwood मध्ये वापरली जाते. एखाद्या सिनेमाची कथा, लेखक , दिग्दर्शकास निर्मात्यास, अख्खी फाईल घेऊन दाखवत नसतो, तर अगदी थोडक्यात, ती संकल्पना सांगतो/ते. म्हणजेच, शालेय जीवनात,परिक्षेत एक प्रश्न असे. ," सारांश करा." म्हटले तर सोपा. समोर दिले अाहे, तेच तर, थोडक्यात लिहावयाचे. पण तेच सर्वात कर्मकठीण असायचे नं? बघा आठवा. तेव्हा आता, माझे, पूर्वीचे २०१९ ते २०२२चे हे गुगलवरील लेख सोडले व या माझ्या या ३.४ महिन्यातले blogs एकत्रित केले व सारांश करावयाचा ठरवला, तर चार शब्दात सांगता येईल. कमाई - जमाई- जपणूक - वागणूक. कमाई:- तनमनधनाची जपणूक करून जी जमाई करावयाची, त्यासाठी, आपली वागणूक कशी असावी, ह्याविषयी मार्गदर्शन. त्यासाठी, आपण, "झाकोळ" केव्हा करावा/ केव्हा नाही. किंवा " कल्लोळ" कसा व कशासाठी करावा. हे ज्याचे त्याने ठरवावे. पण आनंदी व समाधानी जीवन हवे, तर मन(चांगल्या विचारांनी)मानी असावे. ...