Posts

Showing posts from January, 2026

धर्मवीर छ. संभाजी राजेंच्या, मृत्यू नंतर, महाराणी येसूबाई यांच्या अचूक निर्णय.

 माझ्या जिज्ञासू वाचक वृंद हो, आधी माफी मागते. आज मी बऱ्याच दिवसाने भेटत आहे. जरा दुसऱ्या लेखनात गुंतले होते. आणि नवनाथ यात्रा ही केली. त्यांच्या बद्दल लवकरच माहिती देईन तसे तर तुम्ही, त्यांच्यावरील मालिका पाहिली असेलच.असो.       आज आपण महाराज्ञी येसूबाईं व बाल शिवाजी (शाहू) राजे व इतर राजपरिवाराच्या, मोगल अधिपत्याखालील व्यतित झालेल्या, तब्बल १९ वर्षाचा (१६८९ ते १७०८)  या  कालावधीचा आढावा घेणार आहोत. मी मुद्दाम अटक व कैद शब्द वापरले नाहीत.  का तोच खुलासा करणार आहे.         अगम्य व अजिंक्य असा रायगड, फितुरीमुळे, मोगलांचा अधीन होऊ घातला होता. आधीच स्वकियांच्या, खुद्द येसुबाईंच्या सख्या भावाच्या दगलबाजीमुळे छत्रपतींचा संभाजीराजेंचा मृत्यु झाला होता. सद्यकाळात आपले कोण - फितुर कोण कळेनासे झाले होते. येसुबाईंनी चाणक्यनीतिचे अध्ययन केले होते. त्याचा उपयोग केला. औरंगजेबाच्या सरदाराला, झुल्फिकारखानाला संदेश पाठवला, " आम्ही रायगड  देऊन स्वत: स्वाधीन व्हायला तयार आहोत. पण एका अटीवर, आमच्या जीवाची व धर्मरक्षणाची हमी, त्याने घ्यावी. त्या आ...

मनन व चिंतन हे आपल्या धार्मिकतेचा विकास करते हो.

  मनन व चिंतन हे आपल्या धार्मिकतेचा विकास करते हो.       माझ्या सजग वाचक हो, आपले वर्षाचा, आरंभ गुडी पाडवा या शुभ दिनी होत आहे. दारू पिऊन धागंडढीगा घालून वर्षाच्या प्रारंभी, उशीरा उशीरा उठणे,  योग्य आहे का? 31 डिसेंबरला, कोणाकोणाची मुले, तो कापडी बाहुला घेऊन, भिक्षा देही करायला गेली होती.  आज मी दोन मराठी व हिंदी लेख लिहिणार होते नं,        पण काही अपरिहार्य कारणामुळे, मी 5.6 दिवस रजा घेत आहे. अगदी खरे तर या वरील प्रकाराबाबत, जे काळजात तुटतं आहे.  त्यामुळे मन उदास आहे हो,  जरा मन:शांति मिळवत आहे. तोपर्यंत आधीचे लेख, तुम्ही परत परत वाचून, त्यावर चिंतन मनन करावे, अशी मी विनंती करीत आहे. कारण मागचे काही लेख वाचून सोडून देण्यासारखे नाहीत हो, ते पुन्हा पुन्हा  वाचून, त्यावर मनःपूर्वक विचार व त्यानुसार आचार व त्याचा प्रचार व प्रसार करण्या योग्य आहेत. मग कृपया माझी ही अपेक्षा rather विनंती  पूर्ण करणार नं 🙏🙏🙏🙏.मी लवकरच नवनाथाच्या यात्रेला जात आहे.   नऊ नाथ व प्रत्येक नाथाचे नऊ नाथ हे देवांचे, जणू सैनिक च आहेत. ...