64 कलांच्या देवता, योगिनी परिश्रमपूर्वक त्यांची केलेली आराधना.
64 कलांच्या देवता योगिनी. परिश्रमपूर्वक त्यांची आराधना. माझ्या प्रिय वाचक मंडळी हो, काल मी आपल्या सध्याच्या शालेय अभ्यासक्रमाबद्दल लिहिले. आपला खरा इतिहास, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा तर, महत्वाची बाब म्हणजे त्यांना, त्या बाबत उत्सुकता व कळकळ निर्माण होणे, गरजेचे आहे. त्यासाठी शालेय जीवनातच,म्हणजे, विद्यार्थी दशेत त्यांना, त्याबाबत झलक देणे, योग्य आहे ना? आपल्या आयुष्यात, काही योग येतात, मग ते चांगले वा वाईट कसे ही असले तरी, ते का येतात, त्याची समग्र माहिती व जाणिव असणे. हे सुखी जीवनाच्या, दृष्टीने आवश्यक आहे. एक गंमत सांगते. सर्व अनेक ठिकाणी प्रवास करतात. पण असे एक ठिकाण आहे, ते कित्येक जणांना even टूरच्या कंपनींना माहित नाही. योगिनी म्हणजे योगाची साधना करणारी महिला. जबलपूर जवळ बेडाघाट च्या पुढे एका टेकडीवर ६४ योगिनींचे मंदीर आहे. तेथे गौरीशंकराचे देऊळ आहे. तिथे सभोवताली ६४ योगिनींच्या मुर्ती आहेत. त्या एक एक ज्ञानाच्या शाखेच्या अधिष्ठित देवता आहेत. पुर्वापार...