परशुराम. दशावतारातील सहावा अवतार.
28. परशुराम. दशावतारातील, सहावा अवतार. ज्ञानार्जन इच्छुक अशा माझ्या प्रिय वाचक हो, माझे कालचे promise, लक्षात आहे, मी आपण नेहमी आरती नंतर म्हणत असलेल्या मंत्र+ पुष्प+ अंजली बद्दल सांगणार होते, तुम्ही म्हणाल, असा विषय का बरे बदलला.. नाही हं, मी त्याच बाबत लिहिणार आहे. फक्त आधी त्यातून, आपण त्या ईश्वराकडे काय व का मागणी करत आहोत, हे जाणून घ्या. आपण त्यातून योग्य जनहितदक्ष शासन कर्ता मागतो. पूर्वी राजेशाही होती, त्यामुळे, त्याच वंशांतील, राजपूत्र शासन कर्ता म्हणजे अधिपती होत असे. त्यामुळे प्रजा, हा भावी राजा योग्यच निपजो, त्याला योग्य असे शिक्षण व शौर्य लाभो. गुरू गृही चांगले संस्कार मिळो अशी प्रार्थना करत. तो प्रजा हित दक्ष होवो. पण आज दोर आपल्या हातात आहेत. आज लोकशाही आहे.आपण योग्य अधिपती निवडू शकतो. असो. अयोग्य व भ्रष्टाचारी नेत्यांना पाय उतार करणे, सर्वस्वी आपल्या हातात आहे. फक्त पारखी नजर पाहिजे. आता मला ह्या सहाव्या अवताराचीच का आठवण आली. कारण परशुराम हे जमदग्नी पुत्र. त्यांची माता क्षत्रिय व पिता ब्राह्मण...