जीवन समजू लागणे.
12 नोव्हेंबर 2025,, माझ्या प्रिय वाचकहो, आज ममी, आपल्याला दीर्घ काळानंतर भेटत आहे कारण जरा अस्वस्थ व अस्वास्थ ही दोन्ही कारणे. आताच मी 75 वर्षाची झाले. वाटले,की असो. पण काही करावयाची, उर्मी, अजून, नसानसात भिनली आहे, ती स्वस्थ बसून देत नाही. आणि तुम्हा वाचकांच्या सख्याची व व संख्येची आठवण, निवांत झोपू देत नाही. भेटणार नं, परत मळ
ला. वाट पहाते, तर आज फक्त माझी एक कविता वाचा rather अनुभवा.
जीवन असे जगावेच.
मरणाच्या जाणीवेतूच,
जीवनाची किंमत कळते,
जीवनातील संकटातूनच,
जगण्याची हिंमत्त मिळते
जगण्याच्या यत्नातूनच,
सृजनाकडे मन वळते.
सृजनाच्या क्रियेतूनच,
निर्मिती घडत असते,
निर्मितीच्याआंनदातूनच,
मरणाची भीती सरते,
म्हणून, " अस्थित्व ", हे,
कधीच मिटत नसते.
सरते, शेवटी ही,
टिकून असते.
आणि टिकून ठेवणे.
आपल्याच हातात असते.
सुनीता कर्णिक.
म्हणूनच मी आजपासून सदैव भेटत राहीन, अनंत काळ 😊.
Comments
Post a Comment