Posts

Showing posts from March, 2026

देवाला विनवणी, " जे माझे आहे, ते आपले म्हणा.

Image
 

समर्थ रामदास, हे देवाकडे , मागवयास सांगत आहेत. ते आचरणात आणावे, ही 🙏 विनंती

Image
 

समर्थांची पुढील मागणी ऐका व काहीतर धर्मासाठी करा हो.

Image
 

वासुदेवी आलीय हो जागवाया!

Image
 

वासुदेवी आली हो वासुदेवी आलीय, हिंदुत्वाला जागवायला आलीय व्ह....

Image
 रसिक श्रोते हो, आज पासून थोडा बदल, मला खात्री आहे, हा बदल, तुम्हाला आवडेल. आजपासून, मी बोलणार व तुम्ही ऐकणार म्हणूनच, वाचक असे न संबोधता श्रोते अशी हाक दिली.

छत्रपती संभाजी महाराज व गुडी पाडवा आणि आपले इतर ही सण.

 18 मार्च 2026. फाल्गुन अमावस्या छत्रपती संभाजी महाराजांची पुण्य तिथी. व उद्या गुडी पाडवा..         वाचक हो, कालपासून, सोशल मीडिया वर काही नटद्रष्ट लोक मुर्खा सारखे लिहीत आहेत. म्हणे, छत्र पती संभाजीची हत्या झालीय, तर गुडी पाडवा करू नये. पण सत्य हे आहे की त्यांना मनःपूर्वक श्रद्धान्जली द्यावयाची असेल तर, आपण आपल्या हिंदू नव वर्षाची सुरुवात गुडी उभारूनच करावयास पाहिजे. त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी बलिदान दिले. त्यांच्या सोबत कवि कलसांनी ही आत्म बलिदान व राजेंच्या भक्ती साठी आत्म समर्पण केले. त्या स्मरणाखातर आपण सण साजरे करणे व पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. ते धर्मवीर होते. धर्म निष्ठ होते. त्यांनी ही लहानपनापासून, " गुडी उभारलेली आहे. जर ही प्रथा बंद केली तर विचार करा त्यांच्या आत्म्याला किती क्लेश होतील. या पुढे, मी त्यांनी दिलेला सल्ला च देत आहे. . बुधभूषणमधील  छ. संभाजीमहाराजांचा बहुमोल सल्ला.   काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्ल...

जैसे को तैसा मिला, तो ही जिंदगी में मजा रहेगा! ठगाशी असावे ठग.

 को तैसा मिला तो ही जिंदगी में मजा रहेगा! ठगाशी असावे ठग!     म्हणूनच, वाचक हो, काल मी लिहिले कि, उद्या- आज आपण, आपल्या खर्‍या गुरूंना भेटू या. जर व्यवसाय kraycha, तर हे माहित होणे, जरुरी आहे.       अर्थात् त्यांनी त्यांच्या ग्रंथातून, जे काही लिखाण केलेय, ते जाणून घेऊ या. ज्या योगे आपले भलेच होईल. कारण ते आपल्याला एका जागी बसून देवदेव न करता,सामाजिक व मानसिक व पारिवारिक समाधान कसे मिळवायचे, ते सांगतात. हो, हे खरे कि, ज्ञानदेव- रामदास स्वामी प्रपंचात पडले नाहीत आणि तुकाराम महाराज  कुटुंबात, कमलपत्रागत राहिले. पण त्यामुळे या त्रिमुर्ती आपल्याच परिवारात अडकून न पडता, त्या पल्याड पाहू शकले.       या तिघांनी कधीच, सदैव, अगदी अपराध्यांशी ही क्षमाशील राहा,असे सांगितले नाही. उलट या प्रकाराने, सामाजिक समतोल बिघडेल,असेच ठासून सांगितले. अन् ते कोणी तरी करील. आपण बसावे चूप, हे चूक आहे, हेच कानीकपाळी ओरडून(वाचार्थाने) प्रतिपादन केले.       बघा,  कालचा लेख आठवतोय नं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ठगाशी असावे ठग। ते काही असे ना...

आयुष्य महत्वाचे आहे, ते जपा. पण त्यासाठी साधन ही महत्वाचे आहे,

 आयुष्य महत्वाचे आहे, ते जपा. पण त्यासाठी साधन ही महत्वाचे आहे, ते जोखा.      माझ्या प्रिय वाचक हो, आज मी सुखी जीवनाचे व यशस्वी व्यवसायाचे रहस्य सांगत आहे.         व्यवसायासाठी must -मस्त आयडिया सांगते. हसतमुख राहणे. तसे तर आपल्या जीवनात ही , ही संकल्पना नेहमी फायदेशीरच ठरते. नोकरीत boss शी yes sir करतोच नं, मग एखादा धंदा करावयाचा ठरवले तर  हे follow करायचे नं !     यशस्वी जीवनाचे खरे रहस्य म्हणजे सदैव एक हातचा ठेवावा.  आता बघा, तुम्ही नोकरी करता, पण त्यात     सतरादा बदल करू नका. पण  दुसरे ही काही तरी करायची, तयारी, फक्त मनाचीच नव्हे तर practically ही तयारी ठेवा. दर महिन्याला थोडा तरी fund वेगळा काढून ठेवा. त्याला  any how हात लाऊ नका. तुम्हाला माहीत आहे का, इतर धर्मात कमाईच्या, विशिष्ट % त्यांच्या  धार्मिक संस्थांना देणगी दाखल देण्याची प्रथा असते. आपण जेव्हा मंदिरात जातो, तेव्हा देवाकडे विशिष्ट मागणी  घेऊनच जातो.  नाहीतर, त्या निमित्ताने  ट्रीप काढतो. पण निरपेक्ष दान देतो का? न...

तडजोड नको, पण सर्वांना चांगली जीवन शैली हवीच. मग त्याचा च मार्ग सांगतेय. वाचन करा, तर.

 तडजोड नको. पण चांगली जीवनशेलौ हवीच.    आज मी तुम्हाला, एका जाहिरातीतील तत्वज्ञान दाखवणार आहे. generally या जाहिराती, त्यांचा माल खपवण्यासाठीच असतात. rather आपल्या गळी उतरवण्याच्या प्रयत्नात असतात. पण त्यातही बुध्दिमंताची झलक दिसते. एका builder ची जाहिरात आहे, घरे खपवण्यासाठी. अर्थात् ज्यांना घर घेण्याची निकड व क्षमता आहे, साहजिक तेच अशा जाहिराती वाचतील नं. पण या जाहिरातीने माझे मन वेधून घेतले.       त्यात म्हटलेय,  "तडजोड नाकारा. उत्कृष्ट दर्जाची जीवनशैली स्विकारा."  अगदी पटले हे! आपल्या ध्येयापासून दूर न होणे, म्हणजेच चांगली जीवनशैली.  कालच्या रिक्षावाल्या, I mean, लेक्चररने ते दाखवून दिले. पण destination मिळेपर्यंत,  तो हातावर हात ठेवून बसला नाही, विशिष्ट गोष्ट मिळेपर्यंत, आईवडिलांच्या जीवावर रिकामा/ बेकार बसायचे नाही. अशी जिद्द असावी.      या वरून पुन्हा आपल्या मुंबई बिषय चा " मुंबईची पुनर्घडण, ह्या विषयाशीच संबंधित आहे, हे त्यांचे सुभाषित.  त्या मुंबईच्या बाबतीतील, इंग्रज्यांची  धडपड, खरेच विचार करण्याज...

स्मरण शक्तीचा चमत्कार. देवाची अद्भुत लिला. आजही, मी तिला नाव विचारायला विसरले..

 13मार्च, 2026 12मार्च च्या दिवशीच आम्हा,, एकमेकांना, अनोळखी असलेल्या लोकांकडून घडलेले , माणुसकीचे कार्य.           माझ्या सजग वाचक हो,. कालचा लेख वाचला असेल, तरच, आजचा समजून येईल. तेव्हा तो वाचाच.  खरे तर त्या बॉम्ब स्फ़ोटच्या घटनांमुळे सर्व स्वतः च्या विवंचनेत होते. पण कदाचित त्याचमुळे तिचे दुःख समजून, एकप्रकारे mass behavier काम झाले...जरा विषय बदलतेय. पण, या संबंधीच आहे.         माझ्या आयुष्यात,. मी,महाराष्ट्र मध्ये अशा दोनच व्यक्ती जाणते, त्या बायकोच्या करियरमध्ये  सक्रिय साथ देतात, हां, south इंडियन मध्ये बरेचसे आहेत. पण...एक माझे मेव्हणे विजय कुळकर्णी ब हे मीना शहाचे पती, अनिल शहा.  मीनाला ऑफिस मधून ऑडिटला जायचे होते, तर त्यांनी दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली.आम्हाला compulsury नसते.  तर आता आपण मूळ विषया कडे वळू या.           त्या दिवशी तिला( कालचा लेख वाचलाय नं कोण ती कळले नं ), त्या पालघर च्या शिक्षिकेने, ट्रेनमध्ये बसविले. आणि आम्ही तो विषय विसरलो. पण   मी त्यानंतर तीस वर्ष...

12मार्च :1993, असंख्य बॉम्ब स्फ़ोट. हा मुंबईकरांच्या, नव्हे तर पूर्ण भारताच्या आठवणी तील काळा दिवस.

 12.मार्च 2026.मुंबईकरांसाठी काळा दिवस. 12मार्च 1993.      माझ्या सुजाण व विचारी वाचकहो आठवतोय नं, तो दिवस, sorry, कोणीही भारतीय, ती घटना विसरूच शकणार नाही       आज मी खूप दुःखदायक आठवणीत आहे. तसे पाहिले तर मुंबईत ही घटना ( बॉम्बस्फ़ोट ) पूर्ण भारतासाठी तो दिवस वेदनामय होता. मुंबईत अनेक ठिकाणी, धडाधड स्फ़ोट घडवले गेले.        मी तेव्हा ऑडिटसाठी, पालघरला होते. अं हं, ते काही नशिब नव्हते, मी व माझ्या सोबत मीना शहा. जात असू. आणि चार जण जेन्टस. आमची मुले व परिवार मुंबईतच होते हो.मी माहीमला व ती पार्ल्यात राहत होती.बाकीची भांडुपला रहात होते..        अचानक 2.30  वाजता,तिथे पालघरला मला बैचैनी वाटली. काहीतरी काहूर मनी दाटले. मी मीनाला बोलले, "मला कसेसेच होतेय. असे वाटले, आता घरी जावे ", ती म्हणाली,"नेमके काय होतेय, बरे नाही का?"            आणि  थोड्याच वेळात, कोणीतरी बातमी आणली, मुंबईत, अनेक ठिकाणी बॉम्ब स्फ़ोट  होत आहेत.  आम्ही हादरलो. दोघी  डेरी ( जिथे ऑडिट चा...

जीवनात आपण,आदर्श म्हणजेच मार्गदर्शक (शिक्षक ), योग्य असे,आपणच निवडावेत

Image
जीवनात आपण आदर्श म्हणजेच मार्गदर्शक ( शिक्षक ) आपणच निवडावेत      आज मी, माझ्या वाचकहो, तुम्हाला, माझ्या, एका short film द्वारे हेच दाखवणार आहे.  शिक्षण हे सतत चालूच असते. ते समाजात वावरताना, आजूबाजूचा, परिसरात व लोकांनी दिलेले असते पण आपण त्यातून चांगले, तेच निवडणे, ही हुशारीचे लक्षण होय. समर्थ रामदास स्वामी, यांनी, हेच, ""दासबोधात  मूर्ख लक्षण"", या समासात सांगितले आहे. ऐका तर, बघा, चुकीच्या व्यक्तीला follow करणे, आयुष्य बरबाद करू शकते. Aspecially राजकारणात...    तर उद्या या वर भाष्य  ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

जीवनातील मार्गदर्शक. कुसुमाग्रज. त्यांची कविता :- “पाचोळा”

  10 मार्च 2026        . जीवनातील मार्गदर्शक - कुसुमाग्रज..        मम प्रिय व सुजाण वाचक वृंद हो,  कुसुमाग्रज, आपल्या सर्व मराठी जणांना माहीतच आहेत, त्यांची ही  " पाचोळा " कविता आपण शाळेत शिकलो. पण ती आपल्या ला पौढ पणी चा धडा आहे. पाचोळा. कविता.   आता मी हेच आध्यत्मिक अधिष्ठान, सगळ्यांच्या जीवनात असतेच असते. हे सिध्द करणार आहे. कदाचित, तुम्हाला, त्याची जाणिव नसेल. कसे ते सांगते.  मराठी लोकांमध्ये,  "कुसुमाग्रजांना न ओळखणारे, व्यक्ती विरळाच. खरे तर अजिबात नाही बोलणे, मला आवडले असते. पण आज कित्येक मंडळी शालेय जीवनात शिकलेले धडे, कविता, म्हणी, वाक्यप्रचार व खास शब्द विसरलेत. Rather, in those days, most of the students, have not taken,, " THAT PORTION SERIOUSLY.. निबंध कविता--अर्थ  व रसग्रहण वगैरे, गाईडवरून. फक्त % वाढविण्यासाठी. असो.   तर आता सध्याच्या जीवनात, सोप्या रितीने, सुखी जीवनाचा मंत्र, मी ह्या ब्लॉकद्वारा देण्याचे १५ जानेवारी २०२० पासून कबूल केलेय. अन् शब्द पाळला आहे. ह्याच लिंक वर तेव्हापासूनचे लेख वा...

एकरूपता -संचित व क्षमता, हीच खरी रामस्वरूपे.

 एकरूपता संचित व क्षमता. हीच खरी रामस्वरूपे होय    स्वागत आहे , रसिक हो. मीही तुम्हाला भेटायला उत्सुक असते, सदैव.        मागच्या महिन्यात, आपण "राम" या नावाचा संदर्भ व  संस्कार कसा होऊ शकतो. ते पाहत होतो. आज ही  " राम" ही संकल्पना वेगळ्या स्वरूपात व संदर्भात जाणून घेणार आहोत. धर्म म्हणजे काय, ते मी वेळोवेळी सांगत आहे. आपल्या आजुबाजूच्या संपर्कातील व्यक्तींच्या बाबत, आपले कर्तव्य म्हणजे आपला धर्म. काही जण, " हिंसा करणे" हाच आपला धर्म मानत आहे. आज जे काही बंगला देशामध्ये घडत आहे, ते घडवणार्‍या घटकांना, तसेच घडवले आहे. मारावे हेच इति कर्तव्य, हा कुसंस्कार झाल्याने, ते असा इतिहास घडवत आहेत. असो. मी काही या बाबत बोलणार नाही. प्रत्येकाने या वर विचार करावा. वा मला काय, त्याचे असे मानावे. फक्त यामुळे आपल्या मुलाबाळांना, नातवंडा-पतवंडांना कसे जीवन जगायला मिळणार आहे, त्याची just कल्पना करावी.       आता बघा. आजकाल,आपण पितृपक्ष फालतू ठरवतोय. पण ती एक पूर्वजांना. देण्यात येणारी Thank giving  आहे. आपण त्याला मुकणार आहोत. आजच्या नातवांच्...

आजची शिक्षण पद्धतीपरीक्षार्थी झालेय. तिथे विद्या + अर्थी मुले होणार कशी???

 परीक्षार्थी रीत. विद्यार्थी नव्हे.  मतप्रिय, वाचक हो, हा पुढील भाग, कदाचित प्रत्येकाला मनापासून पटला, तरी आजच्या सद्य परिस्थितीत आचरणात आणणे, कोणाला ही शक्य नाही 🤣. कारण आपण आपली विचार शक्ती गहाण ठेवली आहे. पण त्यामुळे आपण,आपल्या मुलांवर अत्याचार करत आहोत. त्यांना विद्यार्थी न होऊन देता, परीक्षार्थी बनवत आहोत.       "" तिची साडी वा दागिने माझ्या कडे का नाहीत?? अशाच धर्तीवर सतत आपल्या मुलांची, तुलना इतरांशी करून, मार्कांच्या, घोडदौडीत, त्यांची दमछाक करतो.            येक द्रव्याचे विकिले  (आजचे कोचिंग क्लासेस)            येक शिष्याचे आखिले               (शिष्य सांगेल तेवढाच portion शिकविणे)           अति दुराशेने केले।    ( इतके 2.3 मार्क्स का गेले? )           दीनरूप  (शिष्याला, बिचारा करणे )  ।।२३।।          जें जें रुचे शिष्यामनीं ।         तै...

शिक्षक कसा असावा आणि कसा नसावा समर्थ रामदास स्वामी - दासबोध.

 शिक्षक कसा असावा आणि कसा नसावा. समर्थ रामदासस्वामी यांनी दासबोधात सांगितलेय.भाग 1.  माझ्या सुबोध वाचक हो,    शालेय जीवनातील काही शिक्षक आपल्याला, त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे कायम आठवणीत राहतात. तसेच पुढील जीवनात ही indirectly प्रोत्साहित करतात. त्यापैकी आमच्या कामेरकर बाई. Oh, I mean सर्व दुनियेच्या, सुलभा देशपांडे. ते कौतुक नंतर सांगेन     पण तसेच, याच्या उलट काही शिक्षक... असो. No comments     आपण बघणार आहोत कि, गुरू नेमका कोठचा योग्य, पण समर्थ रामदास स्वामींनी , दासबोधात हेही सांगितलेय कि, गुरू कसा नसावा. बरेचदा कोठचीही गोष्ट कशी असावी, ह्याचे वर्णन करणे, विस्तृत होते. तरीही काही बाबी राहून जातात. तेव्हा सोपा मार्ग म्हणजे, त्या कशा नसाव्यात, हे ठरवले कि, scope नेटका व नेमका होतो.           हेच रामदास स्वामींनी दाखवून दिले आहे.  चांगल्या व भल्या माणसाचे गुणधर्म न सांगता, ते मूर्ख लक्षण- पढतमूर्ख- कुविद्या-  बध्दलक्षण- चंचळ लक्षण- करंटलक्षण यावर निरूपण करतात. हे करंट मराठी करंट ( क रं टा ) आह...

समर्थ रामदास स्वामी कृत सोपी व सुकर अध्ययन पद्धती.

  जय जय रघुवीर समर्थ ॥ समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक यातील अध्ययन पद्धत.    माझ्या जिज्ञासा असलेल्या जागृत रसिक वाचक हो,                पहिलाच श्लोक बघू          गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा                 मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥           नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।                  गमूं पंथ आनंत या राघवाचा ||1||         त्यांनी प्रथमच विद्यापती बुद्धीची देवता श्री गणेशाचे स्तवन केले आहे. तो सर्व गुणांचा ईश - देव आहे, असे सांगितलेय. तो सर्व कार्याचा मूळ स्वरूपी आरंभ आहे   तो निर्गुण ही आहे. पुढे, ते असा उपदेश करतात की, शारदा म्हणजेच विद्या देवी ही जणू स्वयंभु,  "" चत्वार """ वाचा आहे. तेव्हा आपण सर्वांनी हा पंथाने मार्गाने गमन करू या. म्हणजेच याचे आचरण करू या. तर अध्ययन, हे योग्य मार्गाने होऊन, आपल्याला विद्या - ज्ञान प्राप्त होईल. चत्वार = चार प्रकार. ...

अभ्यास विषयी चा महत्वाचा पुढील भाग. ऐका व वाचा तर वाचाल.

Image
 कालचा, अभ्यासाविषयी चा लेख,त्याचा पुढील महत्वाचा भाग 2.    मम प्रिय वाचक हो आता, मी वक्ता व तुम्ही श्रोते बनला आहात. हा बदल कसा वाटला बरे!  तर आता अध्ययन पद्धतीचा पुढचा  भाग ऐका, खरे तर आपण बरेचजण सदा सर्वदा सोबत बहुदा , "मनाचे श्लोक, याचा पहिला श्लोक बोलतोच. नसेल तर वाचा      गणाधीश जो ईश सर्व... त्यात  "चत्वार वाचा " असे जे म्हटले आहे त्यातच अभ्यासाचे  महत्व आहे. उद्या ते सविस्तर सांगेन. ते मात्र  लिहूनच सांगायला पाहिजे  तर उद्या ही, मला नक्की भेटाच  ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

अभ्यासाची, रामदास स्वामींनी सांगितलेली सोपी रीत. भाग 1

Image
 3 मार्च 2026  होळीची  बोंब मारून शिमगा झाला, आता पुढे...  माझ्या सजग व धर्मनिष्ठ वाचक व आता श्रोते हो, आज हे ऐका, सध्या परीक्षेचा माहोल आहे मज्जा केली आता अभ्यासाची सोपी रीत ऐकलीत ना? उद्या पुढील मुख्य भाग.    ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ