Posts

Showing posts from February, 2026

आपल्या धर्मातील सणांची महती.

Image
     होलीका दहन भाग 2  सुज्ञ व धर्म निष्ठ वाचकहो, आता,तुम्ही  श्रोते झालात. हे सोयीस्कर की वाचन, मी दोन्ही चालू ठेवीन. कधी असे तर कधी तसे 😊. तर ऐका होलीका दहन भाग 2. बघा, कोणताही भावनिक बदल होण्यासाठी थोडा समय लागतो एका रात्रीत, आशी करामत होत असते. उलट 31 डिसेंबर ला रात्री 12वाजेपर्यंत, धमाल करणारी 50%  ( I mean,gents 1 जानेवारीला टूण होऊन व बाकीची ही नव वर्षा च्या पहिल्या दिवशी, उशीरा उठतात. उलट आपण हिंदू होळीचे दहन करून, पंधरा दिवसाने, वैर विसरून  गुढी उभारतो. बघा, आपल्या धर्माची महती.       ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

होलीका -होळी जवळ आली. त्या निमित्त विचार विनियम करू या.

Image
 होलीका -- -होळी जवळ आली.. त्या निमित्त विचार करू या.      माझ्या धर्म निष्ठ वाचक बंधू - भगिनीनों,      होळी पेटवली जाते, ती किंमअर्थ, ते पाहू. होलीका, ही हिरण्यकश्यपूची बहीण, प्रल्हादाला घेऊन अग्नित बसली. तिला त्यापासून भय नव्हते. पण प्रल्हादाला --- असो. पण झाले उलटेच. तर याबाबतीत,सध्या जे माहित असावे, ते आज मी सांगितले, ते नीट ऐकून समजून घ्या. 🙏🙏🙏. उद्या पुढील माहिती सांगेन  तर त्या प्रमाणेच,होळी साजरी करा. ह्यात चांगल्याचा जय व वाईट गोष्टीचा पराजय  होतो. ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

आजकालच्या वातावरणात, ""डरना जरुरी है,"" आपल्या मुलांसाठी हो.

Image
  पटतेय नं? तसेच आपण जे बोलतो, टीव्हीत बघतो,त्यातून त्यांच्या वर काय  संस्कार होतात त्याचा विचार करून आचरण करणे, गरजेचे आहे. तसेच फेसबुक, जे paid महाशय, खालच्या पातळीवर जाऊन comments करतात  त्यांची मुले ही, तसेच वागतील, हे त्यांना कळत नाही. पण मोठे झाल्यावर, असेच शब्द प्रयोग, पालकांना ऐकवतील , तेव्हा जाग येईल. असो.  ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

गुरू कसा असावा, गुरूंचे संस्कार व स्वतः ची वागणूक कशी असावी.

 गुरू कसा असावा  गुरूंचे संस्कार व स्वतः ची वागणूक.       माझ्या सजग वाचक हो, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. पण आज त्या नेत्याची टिवटिव--  ज्याच्या त्याच्यावर (sorry for the word ) भुंकणे, पाहताना एक आठवण आली. .    गुगलवर एक बातमी वाचली. एका राजकिय नेत्यावर,दुःखाचा डोंगर कोसळला. वाचून मनात काय आले असेल बरे? मला तर खरेच धक्का बसला, वाटले कोणीतरी घरचे, तसे त्या परिवारातील, सर्वच वयाने लहानच. पण पूर्ण बातमी वाचली तर, त्यांचा पाळीव कुत्रा गेला. ही त्यांच्यासाठी, दुःखाची बाबच .पण जनतेला, असा" धक्का" देणे, कितपत योग्य आहे? असो. आमचा पण , "केव्हिन"ने ही ( कुत्रा)  माझ्या वडिलांच्या मृत्यु नंतर लगेच तासाभरात, त्याने प्राण सोडले. पण ते दुःख फक्त आमचेच होय.       हे पत्रकार,  आपल्या, जीवनात कशाला व केव्हा घुसखोरी  करून, फालतू बाबींना किती महत्व देतात हे विचार करण्यासारखे आहे.      कालपर्यंत आपण गुरू( शिक्षक) व  शिष्य( विद्यार्थी) संबंध कसे असावेत. हे बघितले. ते आपल्यावर संस्कार करतात. आपला धर्म= वागणूक कशी ...

आपणच, आपली फसवणूक करून घेतो.. "आ बैल मुझे मार "

 आपणच आपली फसवणूक करून घेतो "आ बैल, मुझे मार ".  माझ्या  सुजाण वाचक वृंद हो, आजचे शीर्षक जरा गोंधळात टाकणारे आहे. पण ते सत्य आहे.              माझ्या नव्या नव्या विषयावरील माहिती मिळवण्यास उत्सुक वाचक हो.   मी आपल्याला, माझ्या अनोख्या गुरूंबद्दल सांगणार. आहे.खरेच प्रत्येकांच्या आयुष्यात असे अनेक गुरू असतात. बहुतेकजण, अ‍ामचे , अमूक तमूक बाबा/ बाबी ( sorry) गुरू आहेत, म्हणतात. त्यांची पुस्तके वाचून/  सभेत जाऊन आम्हाला , " शांति" मिळते.  शांति म्हणजे राग येत नाही. आता बघा . ही गांधीगिरी, निष्क्रिय व भावना शून्य बनवते. उद्या ह्या एका गालावर कोणी मारले तर , दुसर्‍या गाल पुढे करा. या,  ह्या, "त्या महात्म्यांच्या सल्ला मागील सत्य जाणून घेऊ या.  This I am repeating again and again. पण नंतर..  कोणातरी एकाच व्यक्तीला गुरू मानणे, काही  बरोबर नाही. स्वतः दत्तगुरूंचे ३६ व कृष्णाचे २४ गुरू होते. मी,लवकरच त्यांची नावे सांगेन. अगदी मनोरंजक आहेत हं, तसे तर, चार वर्षापूर्वी, त्यांची नावे सांगितली होती.  तर पुन्...

जाहिरात ही कला ही या 64 कलात सांगितलीय, बरे का!

Image
 जाहिरात, आजच्या जमान्यात मान्यता असलेली एक कला.          माझ्या जागृत ज्ञानप्रेमी वाचक हो, मला तुमचे खूप कौतुक वाटते. कालचा, योगिनींचा गंभीर विषय असून ही, मला असंख्य वाचक मिळाले. तसे तर माझे ही कौतुक करायला पाहिजे. 😊 असो.       आज मी सांप्रत जिकडे तिकडे चोहीकडे दिसून येणाऱ्या, कले बद्दल सांगणार आहे.  ती म्हणजे जाहिरात. आपण समजतो, तशी ती नवीन नाही, या 64 कलामध्ये सांगितलीच आहे. त्यातील 16वी आहे, "आकर्षण. हां सर्व जणांना, आकर्षण म्हटल्या वर मुलामुली च्यातले आकर्षण च आठवते नं, नाही हं, ह्याचा अर्थ व्यापक आहे. म्हणजे आपले म्हणणे, दुसऱ्या ला पटवणे, आपल्या मताकडे  वा पक्षाकडे  ओढून घेणे. आपलेच कसे बरोबर आहे, ते इतरांना पटवणे.  जाहिराती दुसरे काय करतात बरे?  साडया, ड्रेस च्या सेल मधून आपला माल खपवतात. Branded मालाकडे सर्व जण, तोंड महाग असूनही धावून धावून घेतात नं, काय तुम्ही सुध्दा sorry पण चूक आहे का? आजकल शिक्षण पण... क्लासेस च्या जाहिराती तर जोर लावून, सर्रास झाल्यात पण शाळाही या जाहिरात बाजीतून सुटल्या नाहीत, AC वर्ग ल...

64 कलांच्या देवता, योगिनी परिश्रमपूर्वक त्यांची केलेली आराधना.

  64 कलांच्या देवता योगिनी. परिश्रमपूर्वक त्यांची आराधना. माझ्या प्रिय वाचक मंडळी हो,          काल मी आपल्या सध्याच्या शालेय अभ्यासक्रमाबद्दल लिहिले.  आपला खरा इतिहास, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा तर, महत्वाची बाब म्हणजे त्यांना, त्या बाबत उत्सुकता व कळकळ निर्माण होणे, गरजेचे आहे. त्यासाठी शालेय जीवनातच,म्हणजे, विद्यार्थी दशेत त्यांना, त्याबाबत झलक देणे, योग्य आहे ना?          आपल्या आयुष्यात,   काही योग येतात, मग ते चांगले वा वाईट कसे ही असले तरी, ते का येतात, त्याची समग्र माहिती व जाणिव असणे. हे सुखी जीवनाच्या, दृष्टीने आवश्यक आहे. एक गंमत सांगते. सर्व अनेक ठिकाणी प्रवास करतात.  पण असे एक ठिकाण आहे, ते कित्येक जणांना even टूरच्या कंपनींना माहित नाही.         योगिनी म्हणजे योगाची साधना करणारी महिला. जबलपूर जवळ बेडाघाट च्या पुढे एका टेकडीवर ६४ योगिनींचे मंदीर आहे. तेथे गौरीशंकराचे देऊळ आहे. तिथे सभोवताली ६४ योगिनींच्या मुर्ती आहेत. त्या एक एक ज्ञानाच्या शाखेच्या अधिष्ठित देवता आहेत. पुर्वापार...

आजचे actual शिक्षण व प्रत्यक्षात काय शिकवावयास हवे.

 आजचे शिक्षण आणि प्रत्यक्षात काय शिकवावयस हवे.          छत्रपती शाहूंच्या माता व पित्यांचे जीवन.           स्वागत आहे, तुम्हा चौकस वाचकांचे , या माझ्या Blog मध्ये. इतिहासाकडे बघण्याच्या, माझ्या दृष्टीकोनाकडे, तुम्ही  interest घेऊन व कुतुहलाने, ओढ घेत आहात, याचे समाधान वाटले.          इतिहास फक्त शालेय जीवनातच, लावलेल्या क्रमिक पुस्तकापुरताच नसतो, हो. आपल्याला खरा इति+ हास  शिकवलाच नाही. तो आज ही  अभ्यासक्रमात नाही.  त्याऐवजी इंग्रजी माध्यम म्हणून, परदेशी लेखकांच्या, कादंबरीतील भाग, प्रायमरीत शिकवला जातो.          आता प्रथम आपण, आपल्या स्वधर्मरक्षणासाठी, म्हणजे आपल्यासाठी जो अनोखा त्याग- sacrifice   आपल्या छ. शिवरायांनी केला. त्याला शंभूराजेंनी अवघ्या ८ .९ व्या वर्षी साथ दिली, त्या घटनेचे अध्ययन करू या.  हो. अभ्यासच. सगळ्यांना, आग्राहून सुटका  ही कहाणी माहित आहेच. पण त्याकडे कहाणी म्हणूनच  पाहिलेत. मिठाईच्या पेटार्‍यातून,  दोघांनी...

आ बैल मुझे मार.

Image
 आ बैल मुझे मार.       माझ्या सजग वाचक हो, कालचा लेख, तुम्ही वाचला असेलच. काय समज झाला, की, मी दोन अगदी वेगळेच विषय, चुकून एकत्र टाकले, नाही हं, he दोन्ही विषय, मुद्दामच एकत्र लिहिले आहेत.  दोन्ही प्रकारात, एकच साम्य आहे, ते म्हणजे, " आ बैल मुझे मार " पहिल्यात आपण सामान्य जनता, स्वतः आपल्यावर, जोखीम ओढवून घेतो. त्या मोटरमन वा driver च्या चलाखीमुळे वाचतो. पण आपण जरा गुर्मीतच असतो, मी कसा /कशी चपळ आहे. हे पटतेय का? जर हो तर यापुढे, " जरा संभलके |  तसेच मी, दोन दुकानाचा उल्लेख केला. ते ही, एक प्रकारे, आ बैल मुझे मार ( धंद्यात )  असे धोरण ठेऊन वागतात. मग काय, व्यवसायात, यशा पासून दूर राहतात. त्यांचा माल, उत्कृष्ट असून त्याप्रमाणात मं, फायदा होत नाही. पण सध्या, पुण्याच्या दुकानातील, पुढच्या पिढी ने  नेमके पाऊल उचलले व  आमची कोठे ही शाखा नाही, ही  कल्पना सोडून आपला भरभराट साधला, ये हुई ना बात 👍         ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

आपली सुरक्षितता आपल्या हातात

Image
 आपली सुरक्षितता आपल्याच हातात..          माझ्या सुज्ञ वाचक हो,  मी काल म्हटलं होते जरा गंमतीच्या कथा लिहीन. पण पेपरातील बातम्या, पुन्हा गंभीर विषयाकडे वळवतात. पण हे सद्यपरिस्थितीत लिहिणे गरजेचे आहे. हा विषय नवीन नाही. वर्षानु वर्षे घटना घडत असल्या, तरी मुंबईकर काही त्यातून धडा         पण हा मी निवडलेला विषय जऽरा शुभ वा अशुभ म्हणता येईल का? तसे तर नाही. पण आपणच आपले दिवस शुभ व  मंगलमय ठरवू शकतो.    हिंदीत एक म्हण आहे, " जान है, तो जहाँ है। हे मला मान्य आहे. त्यामुळे कमाईची साधने, प्राप्त करावयाची तर प्रवास MUST आहे. अन् मुंबईत ट्रेनला पर्याय नाही.   स्टेशनमध्ये शिरकाव होण्यासाठी. तिकिट मिळत नाही. मग दुसरा मार्ग- आडमार्ग पत्करण्यास लोक मजबूर होतात. without ticket travelling. मग TC पासून बचावण्यासाठी, ट्रेनमधून उतरल्या नंतर, लाईनीतून चालत जाऊन, फट असेल, तेथून बाहेर पडणे. हा अपराध आहे, माहित असून ही हाच मार्ग पत्करला जातोय. पण जरा सावध राहा नं! ज्या रूळावरून चालता , तेथे गाडी नाही, ह्याची खात्री करा. ...

बुध भूषण या ग्रंथामधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला

 बुधभूषणमधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला.   काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मुख्य म्हणजे सद्य परिस्थिती जाणून घ्या. यात काय अडचणी येऊ शकतात. त्याचा आढावा घ्या.  त्यानुसार पावले टाका. उगीचच नसते साहस, अपयशी करू शकते. बुद्धीबळ खेळताना माघार  घ्यावी लागते नं? तेच महाराणी येसूबाईंनी केले. रायगडावरील स्वराज्य निष्ठ मंडळी सुखरूप राहणे, गरजेचे होते.          मी नेहमी एक श्लोक सांगते.  "राम"चा  अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.        मी छ. शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची आपल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. ती सर्व लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे.       शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे.  हे वर्णन छत्रपती संभाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे  नेमके दर्शन  दाखवत आहे.   ...

आजची गरज - मानसिक सामाजिक - राजकीय. शंभूराजे व महा राणी येसूबाईंचे धोरण

  आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.   मम जिज्ञासू व अभ्यासू वाचक हो          आज आपण महाराज्ञीचे धैर्य व स्थिर बुद्धी व संयम, त्यांनी कोठून मिळवला हे  पाहणार आहोत. त्यांचे शिक्षण, शंभू राजेयांसोबतच जिजाबाईच्या निगराणीत झाले. त्यांना हीसं संस्कृत, घोडेस्वारी व लढाईचे उत्कृष्ट ज्ञान होते.          छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही.  तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्‍हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत.  मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते बांधू श...

धर्मरक्षण आपल्या येसूबाई राज्ञीचे व आज आपली धर्म परायणता.

  धर्मरक्षण आपल्या राज्ञीचे व आज आपली धर्मतत्परता.    स्वागत करते, आपण सर्व वाचक रसिकच नव्हे तर सजग आहात. धर्मजागृत आहात. छान वाटले. धर्मपरायण म्हणजे गंभीर boring life जगायचे, असे नाही, तर यात ही गंमत आहेच. तेव्हा आज इतिहासासोबत, वर्तमानावर ही नजर टाकू या. कारण आपण काही फक्त माहिती करून गपचिप बसणार नाहीत. तर सद्य परिस्थितीत त्याचा, आशय व उपाय बघणार आहोत. I mean follow करणार आहोत.    त्या खडतर परिस्थितीत, राज्ञी येसुबाईंनी, आपल्या पुत्रांवर, स्वधर्मप्रेम व स्वराज्यनिष्ठता बिंबवली. गुप्तता राखून, प्रशिक्षित केले. स्वतः व राजमाता सकवारबाईंची व्रत वैकल्ये संभाळली. त्यातून शके महिने व ऋतु व तिथी - सणवार  यांचे सखोल ज्ञान, बालशाहूंना करवले. भावी छत्रपती या नात्याने, असलेला धर्म= धृ धारयते  इति धर्म. म्हणजे आपली समाजाशी बांधिलकी व आपण जे काही आहोत, त्या प्रमाणे आपले कर्तव्य. राजा असो- अधिकारी असो.- सेवक असो वा बाल- तरूण- पौढ - वृध्द. सर्वांचे एक विशिष्ट कर्तृत्व   विधीलिखित असते. त्याप्रमाणे वर्तन.       आता थोडे म्हटले तर विषयां...

राणी येसूबाई व मातोश्री सकवार बाई समवेत बालशाहू यांचे छावणीतील वास्तव व वास्तव्य.

    राणी येसूबाई व  मातोश्री सकवार बाई समवेत बालराजेंचे छावणीतील वास्तव व वास्तव्य.       सजग व इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक वाचक हो, काल आपण महाराणी येसूबाई यांच्या धीरोदात्त व त्या परिस्थितीत योग्य असा निर्णय जाणून घेतलात नसेल, तर मागे जाऊन नक्की वाचा.             बादशहाला, शिवाजीचे नाव मुखी नको होते. म्हणून बालशिवाजीराजे, " शाहू" बनले व  त्यांचे छावणीतील जीवन, कसे व्यतित झाले. ते पाहू.      बादशहाची छावणी. मजल दरमजल करीत, सरदार झुल्फिकारखान,  राजकैद्यांना घेऊन डेरे दाखल झाले.          छावणीत शिरल्यावर, मातोश्री सकवारबाईसाहेबा व राज्ञी येसुबाईंना धक्काच बसला.  मोगल शिपाईंच्या सोबत जवळजवळ, त्याच संख्येने, आपली मराठी मंडळी ही तेथे दिमाखाने वावरत होते.  राजे तर लहान होते. पण येसुबाई तर जाणत्या होत्या. त्यांच्या लगेच मनात आले. ही तर उघड छावणी आहे. इथे तर काही बंदिस्त चालत नसावे. म्हणजे~ मग  जेव्हा, स्वारींच्या बाबत ते s ते वध झाला-- धर्म बदलण्यासाठी, त्यांचे व कवि...