आपले अर्थिक गणित व हितसंबंध. 24.7.2023.

 त्यासाठीची वाटचाल.

माझ्या प्रिय वाचक जन हो, काल मी ब्लॉग लिहिला नव्हता. कारण आधीचे लेख, पुन्हा अभ्यासपूर्वक सर्वांनी परत वाचावे, ही मनिषा. हा ब्लॉग, मी हेतुपूर्वक लिहावयास, प्रारंभ केला अाहे.
This is not timepass for me and I expect my readers also read them, with bottom of heart and do something or share these to youngster’s, not only by age, but “दिलसे जवान है- और कुछ करने की चाहत रखते है।
आता, माझे २.३ दिवसातील ब्लॉग “आठवा”, नाहीतर पुन्हा वाचा. मी असे लिहिलेय कि, गुरू कसा व कोठे कोठे शोधावा. अाता हे बघा, आपला दशावतारातील , ” आठवा”. ह्या ” कृष्णाला ३२ गुरू होते. अन् सर्वांचे गुरू ,”दत्तगुरूंना २४ गुरू होते. ह्याचा अर्थ लक्षात घ्या. मग मी जे पुढे भाष्य करणार आहे, त्याचा राग येणार नाही. मी दोन दिवस परप्रांतियांचा( व्यापारी- कामगार- रोजंदारी वर्ग) आदराने उल्लेख केलाय, त्यासंबंधी एक सत्य उदाहरण, सांगते. READ AND THINK OVER IT.
मी एकदा मीरारोडहून,बोरिवलीच्या गोकुळ हॉटेल( जिथून बाहेरगावसाठी लक्झरी बसेस सुटतात.) निघाले होते. रिक्क्षा पकडली. नेहमीच्या, माझ्या पध्दतीनुसार, मी रिक्क्षावाल्याशी बोलण्यास सुरूवात केली, ” कहाँसे हो आप?” उत्तर मिळाले,” कानपूरसे” अन् बोलताना, मला धक्का बसला. तो Mcom with distinction होता. मी नवलाने व शंकेने विचारले,” तो फिर रिक्क्षा कों?” तो शांतपणे उत्तरला,” देखो माँजी, यहाँ मै दूरके रिस्तेदारोके पास रह्ता हुूँ। अपना खर्चापानी तो देना चाहिये। माँ-पिताजी से माँगनेसे, जो मिले, वो काम करना, अच्छा है नं? वैसे तो मैने दो कॉलेजेस और कंपनीज् में अर्जी की है।” नीता ट्रव्हल्सच्या बसजवळ पोहोचल्यावर, त्याने माझे सामान बसमध्ये, अात नीट ठेऊन दिले. मी काय केले होते, तर त्याला आशिर्वाद दिला होता, देखो तुम्हे जल्दी अच्छा जॉब मिलेगा। मेरा आशिर्वाद है। ” बस. त्याने माझा मोबाइल नं. मागितला. मी दिला. तो डिसें. महिना होता. गंमत म्हणजे नंतरच्या जूनमध्ये मला एक फोन आला, “माँजी मै* मुझे नवी मुंबईके कॉलेजमें , लेक्चरशीप मिली है। मै कानपूरवाला!”
बघा ही जिगर व हिंमत असणे, गुरूस्वरूप नाही का? मग मी काल म्हटले ते , “रितेपण योग्य की, ही मेहनतीची वृत्ती योग्य? मी यापुढे जे विधान करणार आहे, ते मार खाण्याचे धंदे आहेत, मला माहीत आहे. कारण बघा बरे, काही असेल, पण एखाद्या मॉलमध्ये किंवा टोलनाल्यावर तोडफोड होतेय. मग मला ७३ वर्षाच्या म्हातारीला????. असो. माझा मूळ हेतु आहे तो म्हणजे आपले हित, आपणच समजून , “जिओ और जीने दो” हे तत्व जाणून व स्वतःत बाणवून, आपले चांगले हित साधा, व परिचितांना आपलेसे करून द्या. हिच second inning समजा. अन् अाजूबाजूच्या मुलांना, स्वतःचे हितसंबंध साधण्यास मार्ग दाखवा. निदान , फक्त हा ब्लॉग जास्तीतजास्त होतकरूंना SHARE करा.
हो, मला आठवतेय, मी ब्लॉगच्या opening मध्ये, उद्देश जाहीर केला होता, सायबर व सोशल मिडियावर होणारी फसवणूक जाणून सावधान व्हा. पण विचार केला. आधी कमाई व जमाई( शिल्लक) कशी करावी, हे महत्वाचे ठरेल. मुख्य मुद्दा आपण, स्वतःलाच कसे जनरीत म्हणून लुटतोय.उधळतोय. ते पाहू . नंतर लोकांना दोष देऊ या. पटले असेलच. पण विचार करा. एक ताजे उदाहरण सांगते. सध्या retirement चे वय ६० वरून ६५ केलेय.म्हणून मंडळी खूश आहेत. पण यात जी गडबड आहे, ती समजावेन. बघा. 😀😬😁.
तसेच “विमा” प्रकरण समजून घेऊ या. खरेच काय घडतेय। तर उद्या भेटूयाच. Then I request you to subscribe and share my blog to maximum people, whom you LIKE. and like & comment on my thoughts.
आणि हो, समर्थांचे बोल ही समजून घ्यायचेत नं? आपले कसे नेमके कल्याण त्यात अाहे, ते कळेलच.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू