निरक्षर पण अध्ययनातील गुरू

   दादरकर मुलांमुलीचा गुरू.

           स्वागत आहे, माझ्या प्रिय वाचक हो, परवा, माझ्या बहिणीची पदवीधर होण्याची जिद्द बघितलीत नं? आता मी तुम्हाला शिक्षण विषयी, एक गंमतीदार खरी घटना सांगणार आहे.आमच्या लहानपणीची. खरे तर अभ्यास करणे, त्या शालेय जीवनात काही आवडीचा विषय नसतो. मी दादरच्या खांडके चाळीत राहत होते.  खांडके 5 नं. मध्ये, मजल्यावर नऊ बिऱ्हाडे.  आम्हाला अभ्यासू बनवण्याचे श्रेय कोणाला जाते,कल्पना आहे का? पुढे वाचून हसाल, हसा बापूडे. पण हे सत्य आहे की,दर दिवसा आड येणाऱ्या, डब्बेबाटली वाल्याचे, हे महान कार्य होय. 

           आता सविस्तर सांगतेच, ऐका, I mean वाचा. 

   तो काळा कुट्ट, दातपुढे त्यात ही एक दात सोनेरी, खांद्यावर  कळकट पोते. एक डोळ्यात पांढरे.. एकूण भयानकच. गल्लीच्या तोंडा वरून, ओरडायचा, " डब्बेबाटलीय, नंतर सर्व मजल्या वर येई. आम्हा पोरांना दम देई. " बुक वाचली का, पाटी लिवली का अं, की घालू पोत्यात? आम्ही सर्व त्याला गल्लीत शिरताना पाहून, धडाधड पाटी पेन्सिल वही पुस्तकं घेऊन, गॅलरीत बसत असू. मग तो कोणाला ही वाचायला सांगत असे. आम्हाला काय माहीत, तो अक्षर शत्रू आहे.   त्याला, गिनती शब्द माहीत असावा. आणि गंमत म्हणजे, त्याच्या भीतीने सर्व जण पाढे ही म्हणून दाखवत असू.तो वही वा पाटी हातात घेऊन, बरंय म्हणे,आम्हाला खरेच भीती वाटे, हा आपल्याला पोत्यात टाकून घेऊन जाईल.... पण झाले काय, आमच्या चाळीतून, याच्या भयापोटी, नियमित अभ्यास करायची, सवय लागली. एका साध्या भोळ्या, आजच्या भाषेत, भंगारवाल्याचे, केवढे मोठे कार्य. 🙏🙏🙏. 

        हो, नवलाची बाब म्हणजे,आमच्या लहानपणी, कोणी ही, शेजारी, मुलांना बिनधास्त रागावू शकत असत.  दुकानातला वाणी,  ही मुलांना दम मारी.. 

पालक, "ही", देखरेख समजत.

    खरी गंमत म्हणजे, मी काही दिवस,"मुंबई चौफेर" पेपर मध्ये लेख  लिहीत असे. असेच या,आमच्या, "गुरुदेव" बद्दल लिहिले. तर काय झाले, माहितेय, त्या पेपर मध्ये लेखा सोबत, आमचे मोबाईल नं. ही छापत. तर त्याच दिवशी, व नंतर, मला चक्क 15.20 फोन आले, दादरवासियांचे. We too. म्हणून. बघा तर त्या   काळ्या कुट्ट भयकारी चेहरा असलेल्या, साध्या डबा बाटली वाल्याचे विस्तृत कार्य. नंतर कळले, त्याच्या या अनोख्या कामगिरीची, बहुतेक पालकांना जाण होती व ते त्याचे उतराई होत ही असत. असे बघा, ओरडायला न लागता, बिनबोभाट, मुले अभ्यास करीत. हे ही नसे थोडके. 

आजही मनापासून वाटते,मी हे लेखन करते. माझी चार पुस्तके छापलीत, त्याचे श्रेय त्या गरीब पण मनाने श्रीमंतअशा त्या, सामाजिक कार्यकर्त्याला जातेय.

     🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव