कृतज्ञता. एक अनोखा अनुभव
माझ्या सुजाण वाचक हो,मी आपले स्वागत करत आहे. व आभार ही मानत आहे. तसे तर कित्येक दा कोणा ना कोणाचे आभार मानतो. कधी कधी इतर जण आपले आभार मानतात. त्याच वेळी काही gift ही देतो वा स्वीकारतो. पण आज इतक्या दिवसाने, मी आपल्याला भेटत आहे. तेव्हा एका अनोख्या आभार प्रदर्शनाची कथा सांगणार आहे. यात मला, एक अनोखा व अनमोल नजराणा मिळाला, एका छोट्या अनामिक मुलाकडून. तर वाचाच, ती हकीकत.
कृतज्ञता. एक अनोखा अनुभव
ही एक सत्य कथा आहे. आपण, आभार मानतो, तेव्हा ती बहुदा शाब्दिक असते. कधी कधी return gift च्या स्वरूपात असते. या बाबतीतला ना शाब्दिक ना भेट स्वरूप असा एक नजराणा, मला मिळालाय. नुसत्या आठवणीने, मन भरून व भारून जाते हो.
हाच माझा एक अनुभव, मी तुम्हाला सांगणार आहे. अापण दुसर्यासाठी थोडे केले, तर देवाच्या दारी नक्कीच रूजू होते.
ही घटना आहे १९९७ ची. अशी ही एक, दिलसे, कृतज्ञता. आम्ही मालाडला रहात होतो. माझे वडिल अचानक आजारी पडले. पण CGHS ची सोय अ सल्याने त्यांनी प्रायव्हेट मध्ये जाणे, नाकारले. तेव्हा त्यांना, कुपर हॉस्पिटलमध्ये, भरती केले. जनरल वॉर्ड असल्याने, रा त्री माझी मुले तेथे राहत व दुपारी मी दादां( माझे वडील) ब रोबर असे. निदान झाले- पार्किन्सन. ते तेथे ५.६ दिवस होते. मी जवळ बसले होते. तेव्हा एका १२.१३ वर्षाच्या मुलाला वार्डमध्ये आणले. त्याला खूप ताप होता. व तो कण्हत होता. पण नवल म्हणजे, त्याच्या बरोबर कोणीच नव्हते. नर्सेसच सर्व बघत होत्या. मी जरा नवलाने, एका सिस्टरला विचारले, "ह्याचे पालक कोणीच कसे नाहीत?" त्या बोलल्या, "अहो, हा कँन्टीनचा पोरगा आहे. साऊथला घर आहे. इथे ही मुले एकटीच राहतात." मी विचार करत होते. त्याचे गुंगीत,"अम्मा, अम्मा" म्हणून रडणे, मला सहन होईना. सिस्टर त्याला औषध देऊन सलाईन लावून, इतर कामाला लागल्या. त्याचे पाय दुखत असावेत. डोके ही धरत होता. मला राहवले नाही. मी समोरच्या कॉटकडे वळले. दादा ही बोलले," बघ ग त्याला.मी ठिक आहे. " मी त्याच्या जवळ बसले . व जणू प्रतिक्षिप्त क्रिया घडावी, तसे त्याचे डोके चेपू लागले. त्याचे ओठ हलले, तो त्याच्या भाषेत काही तरी बोलला. पण त्याला बरे वाटत असावे. नंतर पाय चेपले. तो गुंगीतच होता. तेवढ्यात जवळ आलेल्या, दोन सिस्टरांनी, माझ्या खांद्यावर हात ठेवले व स्मितहास्य केले. तो पुरूषांचा वॉर्ड असल्याने, रात्री माझा मुलगा आल्यावर मी घरी गेले. दुसर्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचले, तर त्याला, बरे वाटल्याने dischage मिळाला होता.
खरी महत्वाची गोष्ट नंतर घडली. दादांचे जेवण झाल्यावर मी जेवावयास कँन्टीनमध्ये गेले. एका टेबलजवळ बसले. तोच तो मुलगा पाणी घेऊन आला. त्यांच्या नेहमीच्या पध्दतीने (!)ग्लास ठेऊन वळला. तेवढ्यात एका मोठ्या मुलाने, त्याला, माझ्याकडे बघत, काहीतरी सांगितले, तो, उद् गारला, " अय्यो," अन् माझ्या समोरील ग्लास घेऊन गेला. मला कळेना. पण त्याची कृती बघून खूप छान वाटले. तो बेसीनशी गेला व त्याने तो ग्लास धू धू धुतला. ग्लास लाईटकडे नेऊन बघितला- हसला व काँऊटरशी गेला. शेट्याशी काहीतरी बोलला. जणू काहीतरी मागत होता.
तो काँऊटरवरचा माणूस हसला व त्याने बिस्लरीची बाटली काढून दिली. ती पण नीट बघून त्याने, तो ग्लास भरला. एक ट्रे मध्ये ठेवला. वर एक स्वच्छ बशी झाकण ठेवली. अन् माझ्याकडे आला. अदबीने माझ्या समोर पाणी ठेवले. तोपर्यंत त्याची, "आभारप्रदर्शनाची" धडपड , सर्व कँन्टीन स्टाफच्या व माझ्या लक्षात अाली. मला खरेच कौतुक वाटले. ते मॅनेजर, माझ्या पायाकडे बोट दाखवून, त्याला खूण करत होते. पण अचानक तो," अम्मा," म्हणून माझ्या गळी पडला. आणि मला माझ्या छोट्या कृतीचे, शंभरपटीने in return मिळाले. ही माझ्यासाठी खूप मोठ्ठी पावती होती. ~~
Comments
Post a Comment