आपली सुरक्षा आपल्याच हातात. 4.8.2023.
जेष्ठ व श्रेष्ठ वाचक हो, आपण सर्व नेहमी चांगलेच चिंतित असतो. कोणाचे ही भले व्हावे, अशी आशा बाळगतो. पण बर्याच वेळा, या विचाराला अनुसरून आचार करण्यास बिचकतो. रस्त्यात कोणी मुलींना छेडताना, comments पास करताना आढळल्यास, फक्त स्वतःची सुरक्षा विचारात घेऊन, दुर्लक्ष करतो. तेव्हा मात्र थोड्या broad मनाने, तेथे बोला, त्या व्यक्तीला अडवा. या विषयावर, मी एक short film केली आहे. तिची लिंक देते bad touch hands up… जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन, समोरील मुलीला- महिलेला स्पर्श करते, तेव्हा मागील लोकांच्या, हे नजरेस पडते, पण नजरे आड केले जाते. तेव्हा, त्या मुलीत आपली बहीण, ” बघा” व त्या माणसास, हटका” या कायरे, ने खूप चांगले काम होईल.
अाता, बघा फार पूर्वीपासून एक गुन्हा घडत होता, घडत आहे, घडणारच आहे. समर्थ रामदासस्वामी, च्या दासबोधातील ,” मुर्ख लक्षण” या समासातील दशकानुसार, आपण- म्हणजे- जे फसवले जातात, ते परक्या माणसांवर विश्वास ठेवतात व अविचाराने, त्यांच्या सुचनेनुसार, आचरण करतात. तुम्ही पेपरात, कित्येकदा ही असली बातमी वाचली असेल, रस्त्यात चालणार्या महिलेला,” पोलिस आहोत”, अशी बतावणी करून, सांगितले जाते, पुढे खूप दंगल झालेय, तर तुमचे दागिने काढून पर्समध्ये ठेवा. शिवाय तेच एखादा रूमाल देतात, अन् ,” त्या बायका त्यानुसार करतात. पण साधा common sense आहे, दंगल जर झाली असेल, पोलिस तेथे बंदोबस्त करतील. का आधीच्या मार्गात उभे राहून दागिने काढा, असे प्रत्येकाला सांगत फिरतील. याबाबत एक खरे उदाहरण देते. आमच्या ऑफिसमध्ये जरा उशीरा येणार्या एका SMART महिलेला असे सांगून तिचे दागिने ( पाटल्या बांगड्या व मंगळसुत्र) लांबवले. ही बातमी ऑफिसमध्ये लगेच पसरून चर्चा सुरू झाली, तेव्हा एक साधी सुधी( स्पष्ट शब्द लिहित नाही) सांगू लागली, ” मागच्या आठवड्यात, मला ही असेच ,” पोलिस” भेटले होते, मग मी सरळ मागे समोरच्या ऑफिसमध्ये गेले व तासाभराने, आपल्या ऑफिसमध्ये आले, बघा आता कोण खरी Smart😁. अहो, मेस्मेरिझन काही नसते, समर्थांच्या शब्दात, ” जो दुसर्यावरी विसंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला.” मी एकदा माझी मुले लहान असताना, जादूचे प्रयोग पाहावयास गेले होते. जादुगाराने, काहीजणांना स्टेजवर येणास बोलावले. माझी मुले ही गेली. सर्व जण त्या जादूगाराच्या वशीकरणाला बळी पडले. पण माझी मुले काही केल्या त्याच्या संमोहनात जाईनात. तेव्हा त्याने ह्या दोघांना खाली पाठवले व कार्यक्रमाच्या शेवटी माईकवर सांगितले, ” जर तुमचा आत्मविश्वास पक्का असेल, तर तुमच्यावर कधी ही ,” संमोहनाचा” परिणाम होत नाही. काहीतरी घरच्या संस्काराने, या दोन्ही भावांवर माझा प्रभाव पडला नाही. त्याचप्रमाणे तुम्ही ठाम असल्यास, कधीच फसगत होणार नाही”. हेच कायम लक्षात ठेवा. salesmanship ला असेच आपण बळी पडतो. हे आपल्या सामान्यांच्या जीवनातील सत्य. एकावरएक फ्री- मोठा discount – सस्तेका माल रास्तेमें वगैरे. मग नको असलेल्या वस्तू विकत घेतो. तसाच insurance चा प्रकार. आपले होणारे नुकसान कळतच नाही हि कोणाला. असो. सध्या लिखाण थांबवते. हा लेख नीट दोनदा वाचा व विचार करा बरे. तेव्हा अशा प्रकारापासून सावधान. तर भेटू दोन दिवसांनी. then read my blog share to अपने लोग और मिलते रहे ,मुझे।
Comments
Post a Comment