घरबसल्या तुम्ही ही, खर्चा विना, समाजासाठी कार्य करा.
25.7.2023.घरबसल्या करा -समाजकार्य व पुण्य मिळवा.
माझ्या सजग वाचक हो, आपले स्वागत करते, व आभार मानते, माझ्या ह्या ब्लॉगरूपी विचारांना प्रतिसाद देत आहात. वाचन करता आहातच. त्याचबरोबर, विचार व आचारांना ही दिशा मिळत असेल, ही आशा धरून, माझे लिखाण चालू आहे. असो.
परवा मी आपल्याला समर्थरामदास स्वामींच्या, काव्याचा उर्वरित भाग, सांगितला.( त्या आधीची तीन कडवी, तुम्हाला पटली असतीलच. तर ४,५ व ६ व्या कडव्यांचा आपल्या जीवनातील उपयोग बघू या.
गुरू मायेचे निरसन।
गुरू मायेचे अंजन।
गुरूचे अगाध महिमान।
मुखे कित्येक वदावे॥४॥
त्याचसाठी तर प्रत्यक्ष दत्तगरू व श्रीकृष्ण, अनेक क्षेत्रातील मान्यवरांना, त्या त्या बाबतीत मानतात व follow करतात. मग आपणच का एकाच व्यक्ती वा दैवतालाच भजावे बरे? माया म्हणजे प्रेम – पण मोह भुल हा ही अर्थ आहे. ज्याला त्या क्षेत्रात समग्र ज्ञान असेल, तोच त्या विषयातील, आपल्या difficulty सोडवू शकेल. उदाहरणार्थ, गणितातील अडचणी, मराठीच्या शिक्षकांना विचारून काय उपयोग? तसेच इतर विषयांच्या बाबत. अंजन- काजळ घालून, नजर स्पष्ट clear होते. तेच काम गुरू शिक्षक करतात नं? म्हणून त्यांची महती अगाध आहे. हे कित्येकजण ( मुखे) सांगतील. संशोधक, व्यापारी, कारखानदार हेच सांगतील. साधी सायकल चालवायला शिकताना, पडतच शिकतो नं?
जर हेच ज्ञान अनुभवींकडून घेतले तर काय बिघडते. सिनेमाक्षेत्रात, तर कित्येकदा picture flop जातात. पण ते मान्यवर पुन्हा निर्मिती अभिनय दिग्दर्शन करतातच नं? मग जर तुम्हाला मिडियात यावयाचे असेल, तर तेच, “आदर्श- गुरू असावेत नं?
आता कालचा तो रिक्क्षावाला, अादर्श की,
“” जे मी दुसरे उदाहरण सांगितले, तसे करणे बरोबर आहे? त्याने आपले काय हित साधतेय, हा विचार करावयास हवा होता, त्या कार्य(?) कर्त्यांनी?
असो. ज्यांनी त्यांनी आपली प्रगती करणे, हे साध्य ठेवून, साधन आपलेसे करावे. त्यासाठी सर्वांनी, ” झेंडा” सिनेमा बघायला हवा. शाळा कॉलेजमधून academic
अभ्यासक्रमा सोबत- हा ” झेंडा” दाखवून, चर्चा घडवायला हव्यात. हो अन् जे dropout आहेत त्यांच्या ही, या प्रकारे, समर्थांचा उपदेश, मनोरंजक मार्गाने, गळी उतरवावा. हो जमल्यास माझ्या प्रिय वाचक हो, आपल्या maid च्या, जवळपासच्या, वाट चुकलेल्या वासरांना, मार्गी लावा, हेच मोठे समाज कार्य कराल, तर माझ्या या लिखाणांचे सार्थक होईल.
Then please subscribe – read from the bottom of your heart – follow and share this to many, whom it may beneficial for their better life. See you tomorrow.
Comments
Post a Comment