स्वातंत्र्याचा बहुदा होणारा दुरूपयोग. २.८ .२०२३

 माझ्या स्नेहांकित सुज्ञ व विचारवंत वाचकहो, हो, मी तुम्हाला विचारवंतच म्हणेन, कारण आज गुगलवरील reel, pranks, नाचगाण्याच्या जंजाळातून ही आपण माझ्या या गंभीर ब्लॉगला भेट देत आहात. त्याबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच हो. मुळात आपण शिर्षकातील विषय social media वरील पैशासंबंधी, अपराध बघताना, आधी सधन होण्याचा विचार केला. आपल्याकडे जर मोजकेच धन असले तर ही चोरमंडळी आपल्याला विचारात घेणारच नाहीत. त्यातील तीन सुचना पाहणे, जरा मागे ठेवून, मी स्वातंत्र व स्वतंत्र यातील फरक दाखवून दिला. पण हे दोन्ही विषय, एकमेकांशी संबंधितच आहे. व माझा याविषयीचा १८.८.२१ चा ब्लॉग, पुन्हा तुमच्या पुढे ठेवला. प्रत्येक पावसाळ्यात, या प्रकारे दुर्घटना होतात. आज ही युगेयुगे हेच घडतेय. आज मी सोमवारच्या ३१ जुलैच्या मान्यवर वर्तमानातील बातम्याकडे आपले लक्ष खेचणार आहे. “मुंबई चौफेर” हा लेख वाचल्यावर जमल्यास हे पेपर मिळवून वाचा व विचार करा. मुंबई चौफेर मधील पान ६ वरील भुशी डॅम वरील सहलींसंबंधी. त्यांनी लिहिलेय,” तेथे पोहोण्या बंदी असून, पोलिस अडवत असून ही लोक तेथे उड्या मारतात. अन् जीवावर बेतणारे खेळ करतात. लाऊडस्पिकरवरील सुचना व पोलिस बंदोबस्त याकडे दुर्लक्ष करतात.” काय म्हणावे या कर्माला. यात मुलेच नव्हे तर पालकवर्ग ही लहान मुलांना घेऊन सामील असतो. या विषयीच्या माझ्या दोन short film मुद्दाम देते. बघा व तुम्ही तरी कधी ,” यात” नव्हतात नं? 😉😀.





दुसरी बातमी,” महाराष्ट्र टाईम्सच्या ३१जुलैच्या रविवारच्याच पेपरमधील, पहिल्याच पानावरची, “देशभरातूम १३.१३ लाख मुली, बायका बेपत्ता.”
या सर्व , “बिचार्‍याच” म्हणावे का? माहित आहे, मला तुम्ही निर्दयी म्हणाल, पण यातला ४० टक्के तरी, प्रेम वा मोह यापायी कोणाच्या तरी फशी पडल्या असाव्यात. इथून तर आपण म्हणतो, बालविवाहावर बंदी असावी. पण लहान वयात, वेड्या प्रेमासाठी(?) घरातून पळून जाण्यार्‍यांची संख्या किती आहे. ” श्रध्दा मानकर” सारख्या अांधळेपणाने, स्वत: खाईत पडतात ना? हां, हे मात्र खरे की, केरळमधील ५ वर्षाच्या मुलीची काही चूक नव्हती. पण दारूच्या धुंदीत हे घडले. मग आपण संपूर्ण दारूबंदी का करू शकत नाही? बेकार भटकणार्‍यावर हा संस्कार होतो, social media -मोबाईलच्या माध्यमातूनच नं? माझ्या सजग वाचकहो, विचार करा व त्यानुसार “आचार” करा. जर रस्त्यात कोणी, लहान मुलामुलींच्याशी गैरवर्तन करताना आढळल्यास, त्यांना हटका. आत्मनिर्भर बना व एवढे करा हो. आपोआप “सत्कार्य” घडेल. मी refer केलेली माझी short film, ” सातवी लाट” बघा. मला नंतर यश आलेच नं? तर सजग व्हा व be active & be helpful to unknown kids
तर उद्या भेटू या. एक वाचक share च्या रितीने ४.५ वाचक वाढवू शकेल. मग वाचत रहा व गरजूंना वाचवत रहा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू