लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना.

 १.८.२०२३ स्वातंत्र्याची महती व माहीती करून देणारे लोकमान्य.

ह्या संकल्पनेची जाणिव, आपल्या भारतियांना, प्रथम करून दिली, ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी. त्यांची आज पुण्यतिथी.
माझ्या सुज्ञ वाचक हो, ही फक्त शाळांतून साजरी करायची बाब नाही हो. हे स्वातंत्र आपण भोगतो आहोत, त्या सर्व देशभक्तांना, प्रेरणा मिळाली, टिळकांकडून. आठवतेय, शाळेत, पाठ केलेली, त्यांची घोषणा. :- स्वातंत्र हा माझा जन्
मसिध्द हक्क आहे व तो मी मिळणारच.” आज जास्त न लिहिता, माझा २.३ वर्षापूर्वीचा, ब्लॉग पुनश्च प्रसारित करीत आहे. स्वातंत्र व स्वतंत्र यातील फरक समजावून घ्या. मी ८.१० दिवस, हेच आपल्या गळी उतरवण्याचा प्रयास करीत आहे. बघा बरे.
स्वतंत्रतेविना स्वातंत्र्य नसावे.
August 18, 2021
१८. ८.२१ . बुधवार. श्रावण शुक्ल. दशमी.

आलात,माझ्या ब्लॉग ला भेट द्यावयास. खरेच मनापासून स्वागत. आता मात्र नेहमी continue blog चालू.

लवकरच पुस्तक ही आपल्या भेटीस येईल. Just wait and watch. नेहमी नवनवीन विषयावर बोलू आपण. आज जरा परत स्वातंत्र्यावरच लिहिणार आहे. पण हे स्वातंत्र आपल्या देशाचे नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील आहे. आपण मुलांना स्वातंत्र देतो, तसेच मुले ही स्वतःसाठी हक्काने स्वातंत्र मिळवतात व उपभोगतात. पण ती विचाराने व अधिकाराने , " स्वतंत्र" झाली असतात का? तीच नव्हे तर कित्येक वयाने वाढलेली पौढच नव्हे तर जेष्ठ - वयस्क ( सरळ शब्दात बोलायचे तर म्हातारी) मंडळी, अशा बाबतीत, " स्वतंत्र" झाली असतात का? स्पष्टपणे सांगायचे झाले, तर या दोन्ही शब्दातील ( स्वतंत्र आणि स्वातंत्र्य) यातील फरक जाणतात का? स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला, हवे तसे वागण्याची मुभा. स्वतःच दिलेली परवानगी. स्वतंत्र म्हणजे आपल्यात असणारी क्षमता. आज हे मला आठवायला व मी लिहावयाला कारणीभूत झालेय, एक दुर्घटना. ही का घडली तर, तो SELFY चा हव्यास. हे खरे तर स्वतःवरच केलेले अतिरेकी प्रेम होय. अरे मोबाईलमध्ये येवढे powerful कॅमेरे आहेत तर कलेची, कमाल दाखवा नं! एकतर जर पोहता येत नसेल, तर पाण्याच्या "एवढे" जवळ जायचेच कशाला? ही काय घटना आहे, ती सांगते. पण अशा अनेक घटना घडतात. पण कोणी अक्कल शिकत नाही. उलट वार्ताहर COMMENTS करत आहेत कि, लोक त्यांना वाचवायला न जाता म्हणे record करत राहिली मोबाईलमध्ये. पोहायला न येता, या प्रचंड प्रपाता जवळ जाण्याचा " परिणाम" समोर दिसत असताना, स्वतःला पोहण्याचा गंध नसलेली, इतर मंडळी, उड्या मारून काय करणार? उलट असे, " व्हिडिओ" तुम्ही पत्रकार , " व्हायरल" करू शकलात. त्याचा BITE न करता, ""मागच्यास ठेच पुढचा शहाणा, "" या धर्तीवर टिपण्णी करा. व असे प्रसंग रोखण्याच्या कामी ह्या recording चा उपयोग करा. मुलांनी व पालकांनी यातून शहाणपण शिका. शौर्य चांगल्या कार्यात दाखवा हो. या मुलांच्या पालकांना , आपली मुले घरातून, टॉवेल व कपडे घेऊन , धरणावर, सहलीला गेलेली कळली नसतील का?हां. लपवून गेली असतील, म्हणाल, खरे ना? पण मग मोबाईल वर असे shoot करून, upload करणारे, मोठे समाजकार्यच करत आहेत हो, दिपगृहाप्रमाणे हे दृश्य दाखवून सावध करीत आहेत. बाबानो, असे ही घडू शकते. अन् या उलट्या गंगेला तोंड द्यावे लागेल. जन्म भर झुरणे, नशिबी येईल. स्वातंत्र्याचा दुरूपयोग करू नका. जर पाण्याच्या जवळ ट्रिपा काढायच्या असतील, swimming शिका. त्याबाबतीत स्वतंत्र ( आत्मनिर्भर) व्हा. निदान तेथील शिस्त व कायदा पाळा

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू