आपले भावी जीवन, आपणच घडवायचेय हो।
4.8. 2023. आपले जीवन व आपले भविष्य व आपली सुरक्षा.
माझ्या प्रिय वाचक हो, आपली जीवन शैली आपणच ठरवतो नं, त्यातूनच आपले भविष्य- भावी जीवन घडत असते. अन् मग त्यावरच अवलंबून असते – आपली सुरक्षा. पण हे ध्यानात न घेता, प्रत्येक जण, आपल्या अपयशासाठी व कमतरतेसाठी, दुसर्याला दोष देतो. किंवा कमनशिब व दुदैव मानून, नामानिराळा होतो. स्वतःच्या चुकीच्या निर्णयांवर पांघरूण घालतो. ह्यालाच कुरवाळत बसतो.यावर, प्रत्येकाने आत्मपरिक्षण करणे, आवश्यक आहे. माझे बोल कडवे वाटतील. पण सत्य असेच असते. दुसर्याचे यश हे, वशिल्याने, गैरमार्गानेच मिळवलेले आहे, ही आणखीन एक संकल्पना . काही व्यापारी जमाती दानधर्म करतात. त्याचे कौतुक न करता, , ” हमलोग( स्पष्ट लिहित नाही.पण आपलेच १० ते ५ वाले), म्हणतात, ” मग काय झाले, ते म्हणे धंद्यात हेराफेरी करतात व बर्या बुर्या मार्गाने कमवालेला पैसा, मोठ्या दानतीने दान करतात. पण करतात नं? आता बघा, , दिवस रात्र मेहनत करणारे हे परप्रांतिय, व नोकरी मिळेल,म्हणून आशाळभूत असलेले आपण, यात फरक काय आहे, हे जाणून FOLLOW THEIR FOOT PRINTS मग बघा, काय घडते. असो. माझी आकांक्षा आहे की, आपली मंडळी ही EMPLOYERSव्हावी , NOT EMPLOYEES. अन् त्यासाठी एक विनंती करते, 🙏 माझा कालचा ब्लॉग परत परत वाचा- मनन करा व त्यावर चिंतन करा. प्रत्येक वेळी कालचे वर्तमानपत्र – रद्दी – नसते हो. कित्येक बातम्या व संपादकिय विचारप्रवर्तक असते. परवाची , ” बेपत्ता महिला व मुलींची बातमी”ने प्रत्येकाच्या मनात,'” जागते रहो”, चा नारा जागृत राहिला पाहिजे. तरच आपला समाज, मूळ गुन्हेगारीला पायबंद घालू शकेल. तेव्हा एकच मागणे आहे, हा माझा ब्लॉग वाचून सोडून देऊ नका. स्वतःला व आपल्या स्वकियांना, direct & Cyber गुन्हेगारांपासून वाचवा.अपनी जिंदगी डर कर नही, डटकर जिओ। आज इतकेच. फक्त जरा मागे वळा व आधीच्या ब्लॉग्सचे अध्ययन करा. हीच इच्छा आहे कि, पुरी कराल नं? तर भेटू उद्या. 😉😊.
Comments
Post a Comment