ऐतिहासिक कुसंस्कार अर्थात सत्य लपले हो.

 १७. ८.२०२३ . अनेक वर्षानुवर्षे, संपूर्ण पिढीवर होणारे कुसंस्कार. हो, माझ्या जिज्ञासू वाचक हो, मी आज जे लिहीणार आहे. ते लक्षपूर्वक वाचा, ही विनंती. तुम्हाला कदाचित ही स्वातंत्रोत्तर कहाणी माहित असेल, तर आता वाचताना, ” याद उसे भी कर लो। नसल्यास , हे सत्य जाणून घ्या व आपल्या मुलांबाळांना सांगा. हे सत्य अंधारात दडपले जाऊ नये. ह्याची दखल घ्या.

हां, यात कुसंस्कार असा कि, जे घडले आहे, ते जेव्हा घडलेच नाही, असे दाखवून, जेव्हा ही (?) मंडळी, त्यावर मोठेपणा मारतात व सर्व यश आम्हीच मिळवले, असा डांगोरा पिटतात. व इतिहासातील सत्य बदलतात. तेव्हा आपण, ” मला काय त्यात करायचेय. मी बरा/बरी की माझा परिवार बरा! ही कबूतरी वृत्ती ठेवू नका हो. सजग व्हा.
अाता या स्वातंत्र संग्रामावरील निखालस सत्य सांगते.
माझ्या बरोबरीच्या व नंतरच्या अनेक पिढ्यांनी, प्रत्येक १५ऑगस्ट व २६ जाने.ला हे गाणे कोरसमध्ये बोलले वा ऐकले असेलच.
” साबरमतीके संत, दे दी आजादी, तु ने
खडग बिना ढाल।
मग इतर अनेक कॉंग्रेस व्यतिरिक्त मंडळीनी,आपले रक्त सांडले, अनेक जणांना, अंदमानला कष्टाचे जीवन व्यतीत करावे लागले, ते बलिदान व्यर्थ का?
आज हे आठवायचेय, एका संदर्भात. मला हे सत्य माहित होते. पण काल, १६ ऑगस्टच्या एका मान्यवर पेपराच्या( मुंबई चौफेर) संपादकांनी ( श्री.प्रफुल्ल फडके) या विषायावर अभ्यासपूर्वक लेख लिहिला आहे. त्यातील मुद्दे, क्रमवार येथे देणार आहे. या माहितीनुसार, तुम्हाला , निश्चित लक्षात येईल. कि मूळ कॉंग्रेस केव्हाच संपली आहे.
१. मूळ कॉंग्रेसची स्थापना १८८५ मध्ये,स्वातंत्र्याच्या चळवळीच्या उद्देशाने सुरू झाली.
२ हा भारतीय कॉंग्रेस पक्ष,, पंडित नेहरूजींच्या मृत्यु नंतर विसर्जित झाला होता. व त्यानंतर ही वेळोवेळी त्यात फूट होऊन त्याचे विभाजन झालेय.
पुढील ३ते ५ मुद्दे, उद्या तपशीलवार सांगेन. तर उद्या नक्की हे सत्य जाणून घ्या, त्यासाठी आपण भेटू याच. अहो, हा हिंदुस्थान, आपला एक परिवार आहे. मग इथे घडलेले सत्य जाणून घेणे, आपले कर्तव्यच आहे, हे पटतेय ना? मग उद्या याच माझ्या ब्लॉगमध्ये.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू