Skip to main content

फसवणूक व अपराध याला दोन्ही बाजू, तितक्याच जबाबदार.

 ९.८ .२०२३. फसवणूक व अपराध याला दोन्ही बाजू जबाबदार.

हो, माझ्या सजग व समजदार वाचक हो. माझे वरील विधान अगदी १००% सत्य आहे. काल मी दाखवून दिले कि, जर समोरून लाच मिळण्याची शक्यता असते, म्हणूनच मागणी येते. हेच सत्य मुलींच्या फसवणूकीत दिसून येते. “फूस लावली” हे विधान -ह्यात , ” टाळी एका हाताने वाजत नसते.” हेच सत्य आहे. तुम्ही म्हणाल, ह्याच्याशी, आमचा काय संबंध? पण जेव्हा या असल्या बातम्या वाचाल, तेव्हा निदान मनाशी पूर्णतः विचार करा. त्यात तरी पक्षपाती होऊ नका. यावर अशा प्रकारे, चर्चा करा. महिला व पुरूष वर्गाने सकाळ- संध्याकाळी, सार्वजनिक ठिकाणी चर्चा करा. मुलींना फूस लावली जाते, म्हणजे, नेमके काय घडते, ते या बातमी तून पहा. कालच्या मान्यवर वर्तमानपत्रातील ही बातमी वाचा. विचार करा. अन् सर्वदूर पसरवा. ती कशी तर पुढील निष्कर्षासहीत.
आधी बातमी थोडक्यात सांगते.
शिर्षक-:- तरूणीला प्रेमजाळ्यात ओढून अत्याचार. मी त्या अपराध्याला, निर्दोष मानत नाही. तो दोषी नक्कीच आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण येथे पिडित महिला ( वय २६) , बिच्चारी ठरते का? ते पूर्ण घटना क्रम पाहून, ठरवा बरे. मोबाईलवर त्यांची ओळख झाली. वाढली. त्याने, म्हणे, लग्नाचे आमिष दाखवले. व तिला नागपूरला बोलाविले. अाता विचार करा, फक्त मोबाईलच्या ओळखी(?) वर ही २६ वर्षाची तरूणी हुरळून गेली, sorry for my word, पण हेच खरे अाहे. लग्नाचाच विचार होता, तर पुढील कारवाईसाठी बरोबर कोणाला तरी, आईवडिल काका मामा वगैरे पैकी नेण्यास काय हरकत होती. ती एकटीच गोंदिया ते नागपूर चार तासाचा प्रवास करून, त्या कधी न पाहिलेल्या व्यक्तीला भेटावयास गेली. आता बघा,सकाळी निघून ११ वाजता पोहोचलेली ही पिडित(?) तेथे भेटीत ४.५ तास तरी घालवून, घरी परतणार असणार, मग घरी काही तरी खोटे कारण सागितले असेल नं, मग हे योग्य आहे का? कि सरळ पळून गेली, कायमचे घर सोडून???? मी नेहमी समुद्रावर पोहोवयास जाण्यार्‍या मुलामुलीं बद्दल जे बोलते, कि पालकांना, मुले कपडे घेऊन गेलेत, हे कळत नसते का? हाच प्रश्न हिच्या बाबतीत उभा राहतो. ही कोठे जात आहे, पालकांनी विचारले नसेल का? मग २७ वर्षे ज्यांनी मोठे केले, त्यांच्यावर विश्वास ठेवावयाचा कि, कधी पाहिलेल्या इसमाच्या भरवशावर धावायचे?
माझ्या प्रिय वाचक हो, तुम्ही म्हणाल, ह्या असल्या बातम्यांचा आपल्याशी काय संबंध? वाचायच्या व सोडायच्या! झाले. पण असे योग्य नाही. प्रवासात जाताना अशी, चलबिचल मुलगी दिसल्यास, तिची चौकशी करा. जमल्यास मार्गदर्शन करा. या असल्या प्रकाराची( परक्यांवर विश्वास ठेवणार्‍यांची), समर्थरामदास, मुर्ख लक्षणात गणना करतात. तसेच मोबाईलमध्ये घुसून आपली मुले वा आप्त स्वकिय, या जाळ्यात फसत नाहीत ना? हे बघा व त्यांच्या पालकांना सावध करा. हे सत्कार्यच होईल. ह्याला चहाडी म्हणत नाही. याबाबतची,एक घटना १.२ दिवसात सांगेन. मला भेटत रहा. विचार व आचार करा. Be active in social field. अन् पुण्य कमवा. तर येणार नं, माझ्या सजग वाचकहो. मला भेटायला. हे share करा. त्यातील कोणीतरी पुढे येईल व एखादी फसवणूक थांबवील. ते तरी पुण्य मिळेल.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू