फसवणूक होणे, न होणे, सर्वस्वी आपल्या हाती.

 8.8.2023. फसवणूक होणे, न होणे, सर्वस्वी आपल्याच हातात.विचारवंत व सुज्ञ वाचक हो,शिर्षक पटले नाही नं, मी हेच आज सिध्द करणार आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही. पण माझे सावधपणाचे उदाहरण देते. आम्ही मालाडहून, भाईंदरला shift झालो. लगेच माझ्या लक्षात आले, माझ्या सोन्याच्या हाराचा हूक तुटला आहे. आमचे सोनार मालाडमध्येच असल्याने मी लोकलने मालाडला गेले. स्टेशनच्या जवळच आमचे सोनार आहेत. पण मी ट्रेनचा प्रवास risk नको म्हणून हार सँडलवूड साबणाच्या डबीतून नेला. येताना सोनाराने त्यांच्या बॉक्समध्ये घालून दिला. पण मी परत तो साबणाच्या डबीत घालून तो बॉक्स रिकामा पर्समध्ये ठेवला. कोणीतरी बहुधा माझ्या पाळतीवर होते. स्टेशनवर येऊन गाडी पकडली. भाईंदरला उतरल्यावर लक्षात आले, माझ्या पर्सची चेन उघडी आहे व, ” तो बॉक्स” गायब झालाय. पण माझी साबणाची डबी शाबूत होती. कशी वाटली आयडिया. थोडे डोके चालवून सावध रहावे हो. असो.आज एका मान्यवर पेपरमध्ये बातमी वाचली. तुम्ही बर्‍याचजणांनी ही वाचली असेल. शिक्षण खात्यातील कोणा एका महिला आयुक्तांना अटक केली आहे. बातमी अशी कि, तिने, ” शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४जणांची ५ कोटींची फसवणूक केली.” काय म्हणालात, बिच्चारे! अं हं! मी त्यांना मुर्ख म्हणेन. समर्थांनी अशा उगीच दुसर्‍याच्या भरवशावर राहणार्‍यांना, ” मुर्खच म्हटलेय. बघा आता, ५००००००/- ५कोटी भागिले ४४ किती होतात. म्हणजे प्रत्येकाने नोकरी मिळण्यासाठी त्या बाईंना किती दिले बरे? साधारणतः १ लाख. मग एक सांगा, मी १५ दिवसांपूर्वीच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे, आपल्यामंडळीं (कौन पहचान?) इतक्या मोठ्या रकमेत स्वतःचा एखादा व्यवसाय करू शकली असती ना? नाही, आपण नोकर्‍यांच्या मागेच धावतो. बघा आणखीन् एक गणित नोकरी लागल्यावर, पहिले काही महिने, ही जी लाच दिली आहे, ती adjust होईपर्यंत कमाई ० नं? आता हिशोब करा. किती महिने, ” फुकट” हमाली करावी लागणार😬😂. मग असला बादरायणी कारभार करणारे, ” बिच्चारे” या सदरात कसे बसतात बरे. शिवाय एक मुद्दा असा कि, शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र खात्यात, अशा गैरमार्गाने शिरणारे, पुढे काय करणार, तर त्याच foot prints वरून जाणार व पैसा खाणार! हे चक्र थांबवणे व स्वतः काहीतरी उद्योग करणे, असा सरळ मार्ग घेतला असता, तर! पण कोण लक्षात घेतो? यासाठी पैसा- लाच देणारेच दोषी ठरतात. पटले ना? तर या विचाराचा प्रसार व प्रचार करा. कसा, तो मार्ग शोधा हो. तर समाज सुधारणेत, तुमचाही खारीचा वाटा असेल. तर लागणार नं कामाला? please don’t say, how could we do? तर उद्या भेटाल नं, निदान share this blog, then somebody can do this to stop -गैर व्यवहार. 🙏🙏🙏.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू