स्वतःला स्वतःच ओळखा व तुम्हीच स्व ला न्याय द्या.
21.7.2023 स्वतःला स्वतःच ओळखा.
माझ्या सजग व जिज्ञासा मनी धरून आलेल्या सुज्ञ व रसिक वाचकहो, या माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. थोडे स्पष्ट बोलायचे झाले, तर~~~ खरे तर, आपल्यातील बरेचसे लोक, स्वतः बद्दल, स्वतंत्र मत करूच शकत नाहीत. ते स्वतः ला इतरांच्या नजरेतून पाहतात. मी कसा/ कशी आहे, यापेक्षा लोक, माझ्याबाबत काय बोलतात. यावर त्यांची जीवनशैली अवलंबून असते. अाता म्हणाल, या आर्थिक उपदेशात, हे काय नवीनच बरे?सांगते आपले सर्व आर्थिक व्यवहार, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, या संकल्पनेच्या आधारे केले जातात. बघा मनात विचार करून. नक्कीच पटेल. समर्थरामदास स्वामी आपले या पुढील काव्यात, हेच सांगत आहेत. हे वाचताना, वरवर, न बघता, त्यातील, गूढार्थ बघणे, महत्वाचे आहे. हे त्यांचे छोटेसे काव्य नीट समजून व उमजून आपलेसे केले, तर सुखीसमाधानी जीवन सहजसाध्य आहे. त्यांच्या मते, गुरू म्हणजे एखादी विशिष्ट व्यक्ती नव्हे कि, जिचा फोटो वा मूर्ती समोर ठेऊन, पूजाअर्चा करत तासन् तास बसायचे, तर जिथे कोठै चांगले ,तत्व / आदर्श दिसेल, ते आत्मसात करावयाचे. या प्रकारे, आपण -मेहनती, आपल्या कमाईच्या साधनावर जीव टाकणार्या, परप्रांतियांचा, राग करण्यापेक्षा, त्यांची निष्ठा, आत्मसात करणे, आवश्यक आहे. स्वामींनी पुर्ण हिंदुस्थानात भ्रमण केले व भाविकांना, म्हणजे, कार्यात यशस्वी होऊ इच्छिणार्यांना, भक्त होण्याचा, सल्ला दिला आहे. आता एखाद्या निर्वाहाच्या साधनावर, पूर्णतः श्रध्दा ठेवल्यास, येणार्या अपयशाने खचून न जाता, त्यातील,खाचखळगे, समजून ते ओलांडावेत. याच अनुभवाला व अनुभूतिला , समर्थरामदास, "गुरू" मानतात. आता हेच त्यांचे काव्य आपण, अभ्यासणार आहोत. हे मी खाली देत आहे, ते किमान २.३ दा वाचा. उद्या ह्या ओळीच्या आपल्या सामान्यांच्या आर्थिक नियोजनाशी व कसा संबंध आहे, ते समजाऊन सांगेन. मनापासून वाचन केलेत तर उद्या नक्कीच ही , " कल्पना" तुम्हाला उमजेल. तर हे ते , " भोळे भाविक जनहो", काव्य. तसेतर समर्थांचे सर्व साहित्य, खरोखर, गुरूस्वरूप आहे. ऐका भोळे भाविकजन हो॥॥ नित्य करा गुरूचिंतन, महा दोष होती दहन, स्मरणमात्रे करूनिया॥ ध्रु॥ गुरूसेवा घडेल ज्यासी, काळ दंडिना तयासी, अंती जाय मोक्षपदासी, गुरूस्मरण केलिया॥१।। गुरूभक्तिचा दाता, गुरूदेहासी चालविता, हरे पातकाची व्यथा, गुरूस्मरण केलिया॥२॥ गुरू ज्ञानाचा सागरू, गुरू धैर्याचा आगरू, गुरू नेईल पैलपारू, नामस्मरण केलिया ॥३॥ पुढील कडवी नंतर. हेच तत्व मोठमोठे उद्योगपतींनी आत्मसात केले आहे. म्हणून तर टाटा बिर्ला, अंबानी अडानी आहेत. तर उद्या मोक्ष पातक पैलपारु वगैरेचे आर्थिक गणित जाणू या. मग येणार नं, समर्थांचे व मॅकडोनल चे साम्य बघायला? Then subscibe & share my blog to your friends relatives.
Comments
Post a Comment