थांब, लक्ष्मी कुंकू लावते.
३०.७.२३ असे म्हणतात,”थांब लक्ष्मी कुंकु लावते.”
वाचक, स्नेहाकिंत जनहो, पण हा विधी, आपण जाणार्या, व्यक्तिंना, परत येण्यासाठी, करतो. पण अापण लक्ष्मीला जाऊनच कशाला द्यायचे हो. तर मग, पुढे आरंभ
काल रविवार जरा सुट्टी घेतली. आज पुढचे लिखाण नीट मनापासून वाचाल, तर निश्चित routine एकसुरी जीवनापासून वाचाल.
माझ्या प्रिय वाचक हो, हे कृपया lightly घेऊ नका हो. हा आपला ब्लॉग मराठीतून असल्याने, साहजिक, वाचकही, आपलेच असणार, हे निश्चित. पण ह्यातून ” बोध” घेऊन काहीतरी करा हो. समर्थ रामदास स्वामी ही, त्या काळात, दासबोधातून हेच सांगत. मोगलाची सुखासीन चाकरी न करता , स्वःतंत्र उद्योग करा. इतरांना नावे न ठेवता, स्वतः काही उद्योग करून बघा, किती मेहनत व risk असते. काय होते, या जमातीला, लहानपणापासून व्यवसायाचे, ” बाळकडू” मिळते. पण आपण, ग्राईप वाॅटरवर मोठे होतो. readymade नोकर्याच्या मागे असतो. मग कमाई चौपट- पाचपट कशी होणार? अन् “१० ते ५”,या चक्रातच सुख मानतो.
४. योग्य सुत्र निर्माण करा. किंवा असलेल्या सुत्रांत प्राविण्य मिळवा. मुख्य म्हणजे, जे करायचे त्यासाठी विशिष्ट ,” सुत्र” निश्चित करा. त्यासाठी त्या क्षेत्रातील व्यक्तींशी बोला. for example – beautician होणार असाल, तर फक्त, कला अंगी असून भागणार नाही. लागणारी equipment जवळ ठेवावयास हवी, ते बजेट, क्रिम वगैरे ची quality पारखायला हवी. लगेच customers मिळतीलच असे नाही. sale करणार असाल, तर विशिष्ट मालाची व्हरायटी असायला हवी. जसे आपणच साडी घ्यावयास जातो. चौकस असतो. तसेच आपल्या बाबतीत घडणार, हे गृहित धरा. तेव्हा ती मंडळी आपल्याशी कशी sweet व संयमी बोलतात, ते सुत्र आत्मसात करा. मग यश तुमचेच.
५. काही सुरूवात करण्या आधी स्वतःच्या गरजा पुर्या करा. स्वःहित सुरक्षित करा. काही व्यवसायाचे भांडवल उभे करताना, सर्व प्रथम आपल्या गरजा पुर्या करा.
कमीतकमीच ४ महिन्याचे income राखीव ठेवा. त्यातच नेमके, आपले खर्च भागवा. आपले नुकसान होऊन देऊ नका. ही राखीव रक्कमच आपली कमाई आहे, असे समजा.
६. स्वतः वर ताबा मिळवा. be always positive. but not be over confidant. सुरूवातीलाच, जवळच्या संबधित व्यक्तींकडून फायदा झाला, तरी हुरळून जाऊ नका. नवीन,अनोळखी गिर्हाईक- customers मिळतील, तेव्हाच profit समजा.
७. जे ह्यात तुम्हाला प्रोत्साहन देतील, त्यांना सदैव thanksgiving द्या. तुम्ही सुरूवात कराल, तेव्हा ही कल्पना जे उचलून धरतील, go ahead म्हणतील, त्यांचे योग्य रित्या आभार माना.
हे मी, तुम्हाला पूर्णतः encourage करण्यासाठी सांगत आहे. मागे खेचण्यासाठी नव्हे.
इतके धनवान बना. की ,” त्या” लोकांना वाटले पाहिजे, you are somebody. अन् मग social media वर सावधान होऊ या.😉
तर यानंतर सावधान भारत,- म्हणजे आपण. 👍
मिळकत वाढवा. शिल्लक वाढवा. व ती सुरक्षित कशी राहील, ते ज्ञान मिळवा. तर वाचत रहा. पण त्याच बरोबर व्यवसायाच्या बाबतीत, कदम कदम बढाते चलो, लक्ष्मीके गान गाते रहो। तर उद्या भेटणार आहेच. वाचक हो,आपली संख्या वाढवणे, तुमच्या हातात आहे।
Comments
Post a Comment