सामाजिक भान असलेली, मोबाईल धारक , तरूण पिढी
10.8 .2023. मोबाईलमध्ये घुसून ही सामाजिक जाणिवेची भान असणारे तरूण पिढी.
आज वाचा ही अनोखी कहाणी. वाचकहो, नवल वाटले नं, मोबाईलमध्ये गर्क असून ही, वयस्कांचा आदर करणारी तरूण पिढी. एखादाच मुलगा नव्हे, तर बरीचशी मुले. हां, दोन अडीच वर्षापासून, माझ्या ब्लॉगचे जे वाचक आहेत, त्यांनी पूर्वी ही गोष्ट वाचली असेल, पण परत वाचा. अजूनही, ” ही” प्रथा चालू आहे. तर झाले असे, पूर्वी मी ट्रेनने प्रवास करू शकत होते. ४वर्षापूर्वी. तेव्हा मी सफाळ्याहून मीरारोडला येत असे. तेव्हापासून या स्टेशनावर, पूर्ण प्लॅटफार्मभर, म्हणजे गाडीच्या लांबी, इतक्या, लांबवर, उंची मुळे, पायर्या होत्या, त्यासुध्दा, थोड्या थोडक्या, नव्हे तर १८पायर्या. हो, मी मोजल्या. अन् धरायला, एक ही बार नाही. No comments. तर मी जेव्हा प्रथम गोंधळून उभी होते. तेव्हा काय झाले, माहीतेय. तेथे free wifi असल्याने, कित्येक मुले व तरूण, मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेली असत. To my surprise , त्यातील एक मुलगा उठला, नजर मोबाईलवर, मला खूणेनेच विचारले, रिक्क्षा कोठे. आमच्या मीरारोडला, स्टेशनवर ,तीन रिक्क्षा स्टण्ड आहेत, मी म्हटले, “सिने मॅक्स” त्याने, मला नीट हाताला धरून, रिक्क्षाच्या लाईनीत, उभे केले. मी thanks म्हणायच्या अातच पळाला. बहुदा स्टेशनच्या इतके बाहेर आल्यावर, त्याचे नेटवर्क गायब झाले असावे. मागे वळून बघितले, आणखी दोन वयस्कांना, कोणीतरी मुले अशीच रिक्क्षा स्टॅण्ड वरून सोडून, परत गेली. मी दोन तीन दिवस mark केले, ही मोबाईलसाठी, स्टेशनावर बसलेली मुले, हे सामाजिक काम, स्वेच्छेने करत होती. कोणी त्या सर्वांना हा ,” सुसंस्कार ” दिला असेल. एकदा तर मी बरीचशी उशीरा स्टेशनात पोहोचले. कोणीच मुले नव्हती. एका कोपर्यात, एक मुलगा व मुलगी एकमेकांना बिलगून, उभे होते. त्या मुलीचे, माझ्याकडे लक्ष गेले. तिने बरोबरच्या मुलाला खूण केली. अन् काय, तो yes dear म्हणत, तिला सोडून, माझ्या कडे आला, as usual, विचारले, कोठे? मी सिनेमॅक्स सांगितल्यावर, मला सोडायला निघाला,” मी म्हटले, “अरे, ती एकटी, ” तो हसून म्हणाला, हे आमचे नेहमीचेच आहे.” तिला सवय आहे. मी अालो नसतो तर, माझी खैर नव्हती. पुढच्या आठवड्यातील माझ्या escort ला मी न राहवून विचारले, हे कोणी सुरू केले? तो
उद् गारला,” god knows. अन् आता मला ट्रेन प्रवास झेपत नाही. पण समोरच्या हॉटेलमध्ये बसून मी, observe केले, अजून ही ती प्रथा ४.५ वर्षे चालू आहे.
HATS OFF TO THOSE TEEN AGERS. आज इतकेच असे, नवल जेव्हा बघाल, तेव्हा, त्यांचे कौतुक करा. मी एकदा, सर्व मुलांना ऐकू येईल, असा मोठ्या आवाजात, त्यांचे, सर्व वयस्कांच्या वतीने आभार मानले. अन् म्हटले, hats off to you, boys.
बस, आज इतकेच. खरेच. कोणी ह्यांना हे सामाजिक कार्य करायला, उद्युक्त केले असेल. या वाचकांत, त्यातील कोणी मुले, असल्यास , शाबास! तर वाचकहो , तुम्हाला ही कधीतरी कोणी , अनामिकांने मदत केली असेल नं ?
” याद उन्हे भी कर लो, जो,खूद आके, मदत करते है।”
Comments
Post a Comment