Skip to main content

सायबर गुन्हगारी अस्थित्वात आहे, ती आपल्याच चुकीच्या, वैचारिकतेमुळे.

 3.7.2023. स्वातंत्र जगण्याचे, तसेच भविष्य घडविण्याचे.

वाचकहो, आपण माझे लिखाण वाचताय, त्याबद्दल परत आभारी आहे. आज पण स्वातंत्र्याचा दुरूपयोग यावर थोडा विचार करू या. आपण आपल्या मुलांच्या अभ्यासा बाबत जागरूक असतो. पण त्यांचे general knowledge योग्य रितीने वाढते आहे, हे पाहतो का? तसेच मुलांनो, तुम्ही तुमच्या पालकांना current topic बद्दल सजग करता का? जर तुमच्या घरातील महिला मंडळी, फक्त मालिकेतच गुंतत असतील, तर त्यांना बातम्या पाहण्यास सांगा. आजूबाजूला काय घडते, त्यावर आईवडिल वा आजोबा आजींची, आजच्या जगाशी ओळख करून द्या. त्यासाठी त्यांच्याशी बोला. नुसतेच ते रागावतात, म्हणून नाराज राहू नका. त्यांना ही संपर्काची गरज असते. हे जाणून, कधी कधी त्यांच्याशी गप्पा मारा. Human beings are social person. They cannot live alone.घरात असताना फक्त मोबाईलमध्येच घुसून बसू नका. माणूस व्हा.
पालकांनो, कित्येकदा, तुम्ही पाहत असलेल्या, मालिकेतील मुले उध्दटपणे बोलतात. बायका एकमेकांचा द्वेष करतात. व त्यातूनच, त्यांची कथा पुढे होते. मग तोच संस्कार बाजूला बसलेल्या, मुलांवर होतो. त्यात दाखवलेले अनैत्तिक संबंध, लग्ना आधीची मुले, विवाहित व्यक्तींची घराबाहेरील संबंध, हे जेव्हा पौढ मंडळी चवीने बघतात. त्यावर चर्चा करतात, तेव्हा मुलांच्या मनावर, हे कोरले जाते, कि हेच normal life आहे. त्यातूनच , ” शनाया” निर्माण होतात. अन् स्वतंत्र – आपल्या पायावर उभे राहण्याच्या आधीच, स्वातंत्र उपभोगण्या मनमानी करण्याची घाई होते.
आता वळू या, कालच्या,माझ्या ब्लॉग मधील , महाराष्ट्र टाइम्सच्या बातमी कडे. अभ्यासाच्या व मार्काच्या मागे घोडदौड करताना, पालक हेच विसरतात कि, मुलांच्या काही भावनिक गरजा आहेत. त्यांना दुनियादारी शिकवणे, गरजेचे आहे. एक उदाहरण देते. त्यावेळी मेरिट लिस्ट असे. १० वी व १२वी त ९४वा ९५ % मिळवणारी मुले– त्यांना आजूबाजूच्या परिसराची माहिती नसते. एकदा माहीमला खूप पावसामुळे गाड्या बंद होत्या. मी बांदर्‍याला ऑफिसमध्ये जाण्यासाठी, प्लॅटफॉर्म नं १ वर उभी होते. एक मुलगी कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत होती. तिने आम्हा बायकांना काही न विचारता, तेथे time pass करणार्‍या, मुलांकडे विचारणा केली. ‌आम्हालाच राहवले नाही, म्हणून पुढे होऊन विचारले, तर कळले, तिने VJTI मध्ये admission घेतलेय. सकाळी, वडिलांनी पारल्याहून हार्बर ने सोडले. पण हार्बर बंद पडल्याने, तिला कसे जायचे कळत नव्हते. दोन वर्षे, अभ्यासाच्या pressure मुळे ती कोठेच जात नसे. त्यामुळे माहिमचा हा मुख्य भागच तिला परिचित नव्हता. काय म्हणावं या कर्माला. त्यावेळी ,”ती” परक्या कडून फसली जाण्याची शक्यता होती. पण त्या परिस्थितीत, आमच्यासारख्या, आगावू मदतीला पुढे येतात. पण social media च्या वाटेवर मोबाईल वा लॅपटॉपच्या मार्गात कोणी, “दिपस्तंभ” च नसतो. मग प्रेमाच्या भुकेल्या ( घरात अभ्यासाव्यतिरिक्त संभाषण नसलेल्या) मुलीच नव्हे तर मुले ही त्या, वेड्या प्रेमात- मोहात पडतात. आज मोठे मोठे पगार मिळणारे, उच्चशिक्षित मुले, पैसा खर्च वा गुंतवण्यामागे अविचाराने फसतात. त्यासाठी घरात संभाषण संबंध मोकळे, खेळीमेळीचे आवश्यक हवेत. तेच पौढ व जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही लागू आहे. घरात जर त्यांच्याशी गप्पा मारण्यास, घरच्यांना सवड व आवड नसेल, तर ते सुध्दा, अशा बदमाशांचे शिकार होतात. म्हणून घर व घरातील मंडळी, हे संपर्काचे, महत्वाचे साधन आहे, हे जाणा व अंगी बाणा. हीच माझी कळकळीची विनंती आहे. घरच्या लहानथोरांना, आपलेपणाच्या, भावनिक गरजेसाठी, बाहेर -social media कडे वळावेसे वाटणार नाही, यासाठी दक्ष रहा. अाणि हेच इतरांना पटवा
त्यासाठी सोपा उपाय म्हणजे subscribe and share my blog to everybody near you.. उद्या प्रत्यक्षात, यातील social media वरील सायबर गुन्हे व त्यापासून बचाव कसा करावा, ह्याचा मागोवा घेऊ या. see you soon tomorrow.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू