Skip to main content

प्रत्यक्ष व सोशल मिडियातून होणारी फसवेगिरी (भाग दुसरा)

 आता बघा. मुली मुले, फेसबुकवर आपले फोटो टाकतात. कोणासाठी god knows ते ही कसे तर, ओठांचा चंबू करून. अहो आपल्या संस्कृतीत साधारणतः ८.१० वर्षाच्या मुला मुलींची पापी घ्यावयाची पध्दत आहे का? मग फेसबुकवर ही तर्‍हा कशी सुरू झाली बरे? तेव्हा घरच्या मोठ्यांनी ही फेसबुकवर आपला a/c open करावा. व अापसूकच घरच्या तसेच दारच्या मुला मुलींवर लक्ष ठेवावे. social work from home करावे. फार काय तर ही तरूण मंडळी हसतील. पण निदान काहीजण तरी ना फसतील. पुढचा टप्पा म्हणजे likes & comments. ओळखीच्यांना तर तुम्ही दिसताच नं? मग फोटो दाखवून काय होणार? पण अनोळखी मुले माणसे like comment- sweet& cute & nice ete.बोलून ओळखी व मैत्रीचा प्रस्ताव ठेवतात. घरी फक्त अभ्यासाचेच वातावरण असल्यास या कौतुकाला मुलेसुध्दा बळी पडतात. मग यातूनच friendship .मेसेजेस कॉल्स सुरू होतात.

दुसरे फसवणूकीचे माध्यम online games.
कित्येकदा घरातील मोठी माणसे ही या रमी वगैरे अडकतात. मग मुलेतर काय. त्यात आधी आकर्षण म्हणून रू ५००/- बोनस पाँईट. मी कालच लिहिले, आपल्या लहानथोरांना FREE चे जबरदस्त आकर्षण असते. पण त्या फ्री पाचशे रूपयातच ,” या” खेळांचा नाद लागतो. जुगाराचे व्यसनच ते. या सर्वांतून मुलांना वाचवायचे असेल तर, महिलांनो, त्या मालिकेतून बाहेर निघा व या क्षेत्रात या. म्हणजे आपली मुले काय करतात, ते कळेल. कित्येक गेम हिंसक असतात. त्यातून मग तोच संस्कार होतोय हो. सावध मनुजा सावध रे, करील कोणीतरी पारध रे।
हे मुलांनो, तुम्हाला ही कळकळीने सांगते, अापल्या पालकांवर, तसेच जेष्ठ पालकांवर ही लक्ष ठेवा. त्यांच्याशी संपर्कात रहा. मोबाईलच्या बाबतीत, त्यांना परक्यांची मदत घ्यावयाची वेळ आणू नका. ” घरात हसरे (बोलके) तारे असता, मी पाहू कशाला नभा(लोकां) कडे. असे वातावरण घरात असावे. म्हणजे आपली मंडळी.फसण्याची शक्यता कमी हो. पटतेय ना? मग हा विचार स्वतःच्या बाबत आचरणात आणा. अन् सर्व दूर पसरवा. share the blog & subscribe and ask them to subscribe. वरील short film बघितलीत नं, अहो आपल्या सर्वांत ,” राम” असतोच. फक्त त्याची ताकद जाणा. तर भेटू उद्या.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू