Skip to main content

घरात व बाहेर समाजात, समाजावर होणारे दुदैवी परिणाम.

 14.8.2023. आजचा विषय आहे, घरात व बाहेर समाजात होणारे परिणाम – संस्कार .चांगले तसेच वाईट.

माझ्या सुज्ञ वाचक जनांनो, हे फक्त वाचून सोडून देण्यासाठी नाहिये. तर त्यावर विचार व चिंतन करण्याची गरज आहे. आता मी जे लिहिणार आहे. ते वाचून , आपल्यातील, तथाकथित- पण – माहीती नसलेले, वाचक माझ्यावर नाराज होतील. कदाचित यापुढे, न वाचताच, ब्लॉग, बंद करतील. पण माझा मुद्दा समजून घ्या. माझे हे घर, मी घेतले, तेव्हा मी खूप खूश होते. कारण, अगदी जवळच, एक शिव मंदीर होते. पण , मैने घी देखा, पर बडगा नही देखा। आधी मी एक स्पष्ट करते. मी कट्टर हिंदुत्व वादी आहे. माझे वाचन चांगले आहे. मी दासबोधाचा व मनाच्या श्र्लोकाचा अभ्यास केला आहे. दोन वर्षा मागील, माझ्या ब्लॉग मधून, त्यावर भाष्य ही केले आहे. मनाचे श्लोक हे वयस्क लोकांनी, कसे नश्वर जीवनाची जाणिव, करून घ्यावी व मरणाला तयार असावे. त्यासाठी, ” निवृत” कसे व्हावे, हे समर्थरामदास स्वामी सांगतात, ते स्पष्ट केलेय. अन् आपल्या पिढीपासून, हे श्लोक, लहान चिमुकले, पाठ करून, बोलतात,” मरे एक त्याचा दुजा शोक वाहे.” असो. आजचा विषय जरा वेगळा आहे. मी, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा व एकनाथ यांचे वाचन व मनन केलेय. तेव्हा या पार्श्वभूमीवर पुढील वाचन करावे.
तर आता मूळ विषय. मंदिराचे सानिध्य. आता बघा, आपण , “त्या” भोंग्याच्या विरोधात आवाज उठवतो. अर्थात् जाहिररित्या नाही.😬. आपापसात तावातावाने. बघा आता आमच्या आसपासच्या ७.८ बिल्डिंगची कथा. दररोज सकाळी,खरे तर भल्या पहाटे, भक्तमंडळींची देवळात येजा सुरू होते. प्रत्येकजण ती मोठी घंटा जोराने वाजवतो. दर ५.७ मिनिटाने ती वाजते. नंतर दिवसातून दोनदा ७.३० वाजता. आरती सुरू होते, ती घंटा जोरजोरात, ठणाणून वाजत. साधारण २० मिनिटे. अभ्यासाला बसलेली मुले नकळत~~ आणि साधारण संध्याकाळी ४ वाजल्यापासून ६.३० पर्यंत, हौसी महिला मंडळे भजन करतात. एक तर भक्तिगीते- सिनेमाच्या गाण्यांच्या चाली लाऊन किंवा सूर हीन पध्दतीने. नंतर रात्री ८.३० ते ११ पुरूषमंडळीचे, एकाच ओळीचे, मोठ्या आवाजात, पठण सुरू होते. ना सूर ना ताल. आता मला सांगा, अशा वातावरणात, पुढची पिढी, लहान ५ ते १२ वर्षाची मुले, धार्मिक होतील का? सर्व साधारणतः ती वेळ अभ्यासाची असते. त्यात होणारा, disturbance च त्यांच्या आठवणीत राहील ना?
आता या क्षणाला माझे, आरतीच्या ठण ठणने, मन विचलित होऊन, एकनाथी भागवत, बाजूला ठेवून, मी एकदम मनाच्या उर्मीने, हा लेख लिहिण्यास सुरूवात केली.
कल्पना करा, रोज असा सतत आवाज ऐकण्याची. अन् मग समजून घ्याल, हे लेखन. आमच्या येथील आजारी व वृध्दाची काय गत होत असेल. झोपेची गोळी घेतल्यावर, या लाऊडस्पिकरच्या आवाजाने झोप उडाली, तर परत झोप येत नाही, हे मेडिकल सत्य आहे. स्पिकर नसला, तरी एका वेळेस १२.१५ जण जोरात गात असतील, तर तोही आवाज कमी नसतो हो. मग हा संस्कार कसा होत असेल, सांगा बरे, मनात काय विचार येतील. शिवाय कित्येकदा, लग्नाच्या जोड्या वाजत गाजत, देवदर्शनाला येतात.आत शिरायच्या आधी व नंतर, बँन्डच्या तालावर, मनसोक्त नाचतात. हे additional.
बघा विचार करा. पटले तर, यापुढे देवळात गेल्यावर, हात जोडा. मनात भक्तीभाव आणा. पण घंटा वाजवू नका, हो. आणि हा विचार – हा ब्लॉग share to maximum people and let them think over it and be active. व तेही घंटा वाजवताना, विचार करतील.🙏.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू