समारंभातील हितअर्थकारण.
19 7 2023.
अर्थकारण व हितकारण. समारंभ.माझ्या सुज्ञ वाचक हो, तुमचे स्वागत आहे, या माझ्या स्वगत- मन की बात- समजून घेण्यास, interested आहात, खूप छान वाटले.
मी काल लिहिले होते नं, मी समारंभाच्या अर्थहित कारण संबंधाविषयी सांगणार आहे. आपण समांरभ, functions करतो का तर आपला आनंद वाढविण्यासाठी, बरोबर ना? पण त्यात बरेचदा, show बाजी होते, हे आपल्याला लक्षातच येत नाही. अन् आपण unnecessary खर्चात डुबून जातो.
एकच उदाहरण घेऊ या. लग्न हे दोन व्यक्तींच्या मिलनातून, दोन परिवार एक येण्याचा समारंभ. त्या धार्मिक अधिष्टान जरूर आहे. पण आजकाल, या लग्नाच्या विधी जेथे चालतात, त्या स्टेजला, वेढले गेले असते, professional व्हिडिओग्राफर्स व फोटोग्राफर्स ह्यांच्या कळपाने. बघा वरवधू पक्षाच्या -दोन्हीकडील चारजण – त्यांच्या छत्र्या – शिवाय हौशी गवशी मोबाईल धारी. त्यांच्या घोळक्यातून खाली उपस्थित -आमंत्रित मान्यवर – त्यांना काहीच दिसत नाही. हातातील , “अक्षता”, हवेत उधळत, बिचारे आपापसात विविध गप्पा करत असतात. मग हा विधी बघायला, त्यांना पुढे कधितरी ते गलेलठ्ठ अल्बमच बघावे लागतील. आता अर्थहित- आपल्या मुख्य विषयाकडे वळू या. मग सांगा, हा अनाठायी खर्च ठरत नाही का? हाच मुद्दा इतका विस्तृत आहे कि, detailed मध्ये बघितला तर हाच लेख अपुरा पडेल. बाकी items नंतर. ह्यात होणारा खर्च, किती मोठ्या प्रमाणात, असतो.विचार करा. अन् पुढे किती वेळा हा अल्बम बघितला जात असेल बरे? या ५वर्षात जितकी लग्न झाली, त्यांनी तितक्या अवधीत लग्नातील CD कॅसेट काढून, किती वेळा बघितलीत, खरे सांगा. तेच reception च्या फोटो बाबत. किती नातलगांना बोलवून ते दाखवले?😁.
मग विचार करून सांगा बरे, हा अनाठायी खर्च आपण का करतो? सर्व करतात म्हणून. प्रवाहपतित होतो, आपण. इथे मी आकडेवारी बघितली नाही. सांगितली नाही. पण संपूर्ण लग्नात, असा लग्न- reception बुफे चा proof रूपी खर्च करतो, किती हजारो असतो?
आजकाल ह्यात आणखीन् एक फॅड शिरलेय! खरे तर आपल्या संस्कृतीत, हे बसत नाही. तसेच सामाजिकरित्या, ते जरा, अयोग्यच आहे. मध्यातरी काही ( तसे घडत नाही, घडू नये). पण आपल्यातील काही प्रथा- मुलीकडच्यांना, अडचणीत आणू शकतात.काय ते कळले, असेलच.
pre-wedding shoot.
हे एक addition expenditure. माझा अंदाज आहे कि, या items चाच खर्च साधारणतः २५०००/- ते ३००००/- होत असणार. आता मी माझ्या मूळ मुद्दाकडे वळते. जर त्या नव विवाहित जोडप्याने, लग्नानंतर, स्वतःचे हक्काचे घर – वास्तु घ्यावयाची ठरवली, तर ह्या रक्कमेत दोन तरी EMI यानी दोन घराचे हप्ते सहज होतील? पटतेय का? मला माहीत आहे, पटले तरी वळणे कठीण😉😉. ही लग्न या समारंभातील फक्त १०टक्के बाब होय. रॉबर्ट के. या लेखकांचे rich dad हेच सांगतात. खर्च हे आपल्या हितासाठी असावेत. दिखाव्यासाठी नसावेत. पण कोण लक्षात घेते? हो, माझ्या सुजाण वाचकहो, पुढच्या भागातही, मी आपल्याला, याची जाणिव करून देण्याचा “प्रयास” करणार आहे. त्याचे रूपांतर, “प्रयत्ना”त करणे, तुमच्या हातात आहे.
Comments
Post a Comment