आपले ध्येय ठरवा व त्याच्या पूर्ततेसाठी वाटचाल सुरू करा.
२८.७.२०२३आपले ध्येय ठरवा व त्याच्या पूर्ततेसाठी वाटचाल करा.
माझ्या प्रिय दक्ष व जिज्ञासू वाचक हो, तुमच्या प्रोत्साहनानेच तर, मला लिहिण्यास हुरूप येत आहे. असेच भेटत रहा. व माझे विचारांचा प्रचार व प्रसार करा, ही कळकळीची विनंती🙏. आपल्या मराठी बंधुभगिनींतून,मि छोटेमोठे उद्योजक – व्यावसायिक-दुकानदार -साहित्यिक- कला निर्माते पुढे यावेत, ही मनिषा बाळगून आहे. जर लतादिदी वयाच्या ९० व्या वर्षीही कार्यरत होत्या- श्रीमान रतन टाटाही आज या वयात नवनव्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. मग तुम्ही का मागे बरे? घरबसल्या ही खूप काही करू शकाल. सोचो- सोचो आणि कुछ तो करो। come on.तर यासाठी च, परवाच्या ता.२६च्या ब्लॉगमध्ये मी काही- १० पायर्या लिहिल्या आहेत. त्यावर details मध्ये विचार करू या. निदान स्वप्न तरी बघा हो. रागवू नका. पण आपली क्षमता- संकल्पना अशा हवेत का जाऊन देत आहात.
तर पुढील मुद्दे विचारात घ्या.
१. मोठे व प्रबळ कारण/ प्रयोजन/ उद्देश निश्चित करा.:-
आधी कल्पनेच्या भरार्या घ्या. त्यातून, विशिष्ट संकल्पनेचा पाठपुरावा करा. एकाद्या फालतू मालिकेत न गुंतता, स्वतः काहीतरी करण्याचे ठरवा. परवा एक जोक वाचला, ” सर्व महिला, ७ परिवारांची, चिंता करतात. एक स्वतःचा परिवार , दुसरा आपल्या माहेरचा परिवार व शेजारचे २ परिवार. पण मुख्य चिंता असते,==४.५ मालिकेतील परिवार.😆😁हसू नका. हे सत्य आहे. मालिकाग्रस्त महिला, हा माझा ब्लॉग वाचण्याची शक्यता कमीच. कारण ती serial addict मंडळी, त्यात इतकी गुंतली असतात कि, काही करावयाची शक्ती व इच्छा गमावून बसली असतात. घरातील कामेही असो. तर अशांना active करायची इच्छा धरून, मी माझी शक्ती खर्च करीत आहे. मला यश द्या. २.निवडीचे सामर्थ्थ – आपण लहानपणा पासून कोण होणार होतो. काय व कसे करू शकाल – आर्थिक शारिरीक क्षमतेनुसार. = आता आपण काय करू शकू, याचा शोध घ्या. किती वेळ देऊ शकाल. त्यासाठी घराबाहेर जाणे, कसे व किती वेळ जमेल. किती पैसा खर्च करू शकाल? अन् in return किती अपेक्षा असेल. यात एक जाहिरातीचे उदाहरण देते. फार पूर्वी, एक जाहिरात टिव्हीवर दिसू लागली. पण आपल्याला ती आवडत नसे. त्या मुलाचे, मामाला उद्देशून, उद्धट बोलणे, खटकत असे. आठवा बरे, समारंभाच्या ठिकाणी साबणाने हाथ धुणार्या मामाला ” मामाजी,आप हाथ धो रहे हो या गंधे कर रहे हो? ही जाहिरात होती, liquid hand wash ची. पण आज घरोघरी सर्व ठिकाणी हा hand wash च दिसतो. अन् दिसतो त्या production च्या कंपनीचा , “दूरदर्शी”पणा. तसेच पाणी उद्योगाची बाब. हळूहळू ही संकल्पना, समाजाच्या, गळी जबरदस्त उतरली. तर ससा व कासवाची गोष्ट आत्मसात करा. मग यश तुमच्या हातीच. ३. मित्र/ मैत्रिणी काळजीपूर्वक निवडा:- हा point फार महत्वाचा आहे. तुम्ही जे करू बघाल, त्याची चेष्टा उडविणारे, नातलग वा मित्रमैत्रिणी, तुमच्या आसपास असतील, तर तुमच्या हातून काही positive होणे, जरा कठीणच. या उलट मी नशिबवान आहे. मी जेव्हा VRS घेऊन, काही करायचे, ठरविले, किंवा त्या आधी एक निर्णय घेतला, तेव्हा मला, माझ्या घरात, नातेवाईकांकडून व मैत्रिणींकडून support प्रोत्साहनच मिळाले. हे फार महत्वाचे असते. इथेच आपण अर्धी “लढाई” जिंकतो. व नव्या क्षेत्रात आपली ” पढाई” सुरू होते. मग काय आपली स्वप्नाच्या राज्यात, खरी, ” चढाई” होणारच. बघा, पटतेय का? तेव्हा आरंभ करा, विचारांना मुक्त करा. मग प्रारंभ होणारच. मग start now. अन् हो. इतरांच्या मनात ही अशा स्वप्नांची पूर्ती करण्याचर बीज,पेरते व्हा. त्यासाठी SUBSCRIBE LIKE& SHARE, THIS BLOG TO MAXIMUM. उद्या पुढच्या बाबी पाहू या. मूळ मुद्दा माझ्या लक्षात आहे. अहो पण, हे सायबर अपराध होतात, ते पैशासंबंधी नं, मग आधी आपण त्याची जमाई तर करू या.😍😊.
Comments
Post a Comment