हे खरे समाजकारण. ज्यांना साधे जीवन व शिक्षण हे अधिकार समाजाने दिले नाहीत. त्या समाजासाठी त्यांची कळकळ.
९.२ .२०२४.
हे खरे समाजकारण. ज्यांना साधे जीवन व शिक्षण हे अधिकार दिले नाहीत. त्यांनी दाखवलेली कळकळ.
माझ्या लिखाणाचे मनःपूर्वक वाचन करणार्या व बहूदा, त्या foot prints- follow करणार्या मम प्रिय वाचकहो, कालचे मदतीचा हात देणार्या great person चे उदाहरण वाचलेत नं? आता त्याच समाजाचा , " ही महानता" बघा. अलौकिक कार्य आहे नं? मग आपण का मागे? तर वाचा व वाचवा.
कारण ज्यांना, समाजाने rather स्वतःच्या परिवाराने सुखी जीवनाचा व साधे शिक्षण घेण्याचा अधिकार दिला नाही, त्या समाजासाठी त्यांची. कळकळ.
तसाच दुसरा प्रसंग. मी १९९८ मध्ये काही हेतु ठरवून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. नंतर मी दहिसर पुलाखालील सिटी मिशन या अनाथ आश्रमात मुलांना शिकवायला जाणे, सुरू केले. मी पश्चिमेला राहते व हा आश्रम पुला खाली पूर्वेला होता. अन् मला लाईन ओलांडायची भीति वाटते. म्हणून मी, पुला खालील बस स्टॉपवर उतरून मागे रेल्वे ब्रीजने पूर्वेला जात असे व पुन्हा चालत उलटी आंबेवाडीला जाऊन तेथून त्या वस्तीतून रेल्वे लाईनजवळील, आश्रमात जात असे.😊😉. म्हणजे दोन तास शिकवणे, अन् दोन तास प्रवास. पण एक दिवस झाले असे, हो. बोरिवलीला गेलेल्या वाचकांना, हे माहित असेल, दहिसर पुला खाली पश्चिमेला, या किन्नरांची वस्ती आहे. हो, त्या दिवशी त्यातील दोघेजण, त्या मायामॅडमना भेटायला आले. माझी चौकशी केली. मी जरा बिचकले. तर त्यांनी मला विचारले, मी सरळ रेल्वेलाईनीतून का येत नाही. मी सागितले, मला भीति वाटते. ते हसले, एकजण म्हणाला, कलसे उस मंदीर के पास आ जाईये, हम क्रॉस कराके देंगे। आपको चलेगा, तो हाथ पकडेंगे। मला कौतुक वाटले. ती मार्च महिन्याची २० तारीख. होती. पण त्यादिवसापासून, १२ एप्रिलला परिक्षा संपेपर्यंत मला, त्यांच्या पैकी कोणीना कोणीतरी जाताना व येताना, हात धरून लाईन ओलांडून देत असे. दैवत्वाची जेथे प्रचिती, येथे माझे कर जुळती. बघा, आपण सामजिक बंधन मानून, कधी, हयांच्या शिक्षणाचा विचार केला नाही. पण त्या अनाथ मुलांना शिकवते, म्हणून त्यांनी, ह्या कामात, हातभार लावला. तसेच, त्यांचे सांघिक ऐक्य बघा. कसे एकत्र येऊन त्यांनी हे ठरवले असेल कि नेमके कोणी कोठच्या दिवशी यावयाचे व पार पाडले असेल. एक दिवस यात खाडा नाही. मग हेच खरे सुसंस्कृत अाहेत ना!
वाचलेत. आता विचार करा. आपण असा काही समजकारणाला हातभार लाऊ शकतो नं! Yes.be positive and active. You can do it. इच्छा तेथे मार्ग.
«»«»«»««»«»«»«»«»«»«»«»
Comments
Post a Comment