आपण srv भारतीय ना? आणि हिंदू ही, हे नक्कीच नं???
आपण सर्व भारतीयच नं आणि हिंदू ही हे, नक्कीच नं?
मम विचारवंत वाचक हॊ, आज उबाठा चे अजब गजब वक्तव्य फेसबुकवर वाचले. पूर्वीचे आहे का माहित नाही, पण सोशल मीडिया वर आहे, हे सत्य., आता जरा वर्तमानकाळात येऊ या. या घडी आपल्या आजूबाजूला काय चाललेय, व त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ घातला आहे, ह्याचा विचार करणे, त्याप्रमाणे, ह्याबाबत आपण काय करू शकतो , ते बघणे जरूरी आहे. जर हातावर हात ठेऊन बसले, तर काय परिस्थिती होईल? यामुळे आपली पुढची पिढी कशी गोत्यात येईल, हे आपण बघणे, किती गरजेचे आहे, ह्याचा आपल्यातील ८०% ( वय वर्षे १८ ते ९०) विचारच करीत नाहीत. हाच आपला दुर्दैव विलास आहे. आपल्यापुरतेच जगत्यात ही लोकं!
त्यामुळे होतेय काय कि, आपमतलबी लोकांना, सामाजिक व राजकिय क्षेत्रात, सावळा गोंधळ सहज करणे, शक्य होय आहे.
आता मी सुरवातीला, जे लिहिलेय, त्याबाबतीत स्पष्टीकरण. एका ठिकाणी हे महाशय म्हणतात की कोणी तरी,मला विचारले, तुम्ही "गीता" वाचलीय का, मी सांगितले, मी ते ""कार्टून""पुस्तक वाचत नाही.. वर म्हणे, मला कोणी तरी"" कुराण"चे मराठी भाषांतर दिले आहे, ते.....
मला एक कळत नाही, तिथे त्या सभेत बसलेले, मराठी "हिंदूच होते नं मग एकालाही उठून शारीरिक प्रतिकार करावासा वाटला नाही . यांना षन्ड म्हणावे नं संत रामदास स्वामी सांगून गेलेत
" नाठाळच्या माथी हाणा काठी "
पण आपल्याला नाठाळ च ओळखता येत नाही, इतके आपण........
कारण सामान्य जनता, आता, जनता "जनताजनार्दन" राहिली नाही. तिला आसमंतात काही घडले, तरी देणेघेणे राहिले नाही. कोणी ही वक्ता, सभेत कशी ही भाषा वापरतो. टाळकरी, " टाळ्या पिटतात. जोड्याने हाणू, ही वाक्यरचना, व्यासपीठावरील नव्हे, हा व्यासमुनी व नारदमुनींचा अवमान आहे. आपण नकाराधिकाराच घालवून बसलोय. संत तुकारामांनी सांगितलेला उपदेश,
" जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान",
याचा हवा तो अर्थ काढून निष्क्रिय बनत आहोत,आपण नागरिक. समाधान म्हणजे काय हो. कोणी दुसर्याची नाहक निंदा करत असेल तर, मुकाट ऐकत राहणे, हे त्या संतांना अभिप्रेत नव्हते. निदान आपल्या धर्म ग्रन्थ तरी... त्यांची निंदा ऐकणे, किती मोठे पातक आहे. हे तरी समजणे व उमजणे, करा हॊ. किती लाचार बनताय???
याला प्रेतवत् जगणे, म्हणतात. खरे तर आपण, सर्व नाही, तरी ८५% नागरिक जागृत नागरिक राहीलो नाहीत.म्हणून नेते मंडळी, आपली किंमत ठेवत नाहीत. काही मनमानी केली, तरी ही जनता ठस की मस होणार नाही. हे नागरिक नसून,फक्त, " प्रजा" राहीली आहे. हिंदुत्वाचा डिंडोरा पिटला कि झाले, त्याची कास धरण्याची गरज नाही. म्हणजे काय कळले, हिंदूत्व आचरणात आणले नाही तरी चालतेय. जरा स्पष्ट विचारते, पुनःपुनः विचारणा करतेय, फक्त मराठी मुलुखाचे रहिवासीच हिंदू आहेत का? मग खालच्या अंगाचे दाक्षिणात्य वा युपी बिहारचे भय्ये कोण आहेत? हिंदू आहेत नं? अन् मग रोहिंगे का दयेला पात्र ठरत आहेत? आज इतकेच. या नेत्यावर, हे कुसस्कार कसे झाले मग त्याच्या पित्याला, मुलावरच हिंदूत्वाचा संस्कार करणे, जमले नाही तर सम्राट????
एकच लेख. पण मोठा आलेख. विचारवंत व्हा. आचरण प्रिय व्हा. निदान एक व्हा.बस.हीच कळकळीची विनंती.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment