एकरूपता संचित व क्षमता. हेच रामस्वरूो.| 07/05/2021

स्वागत, रसिक हो. मीही तुम्हाला भेटायला उत्सुक असते, सदैव.  

     काल परवा आपण "राम" या नावाचा संदर्भ व  संस्कार कसा होऊ शकतो. ते पाहत होतो. आज ही " राम" ही संकल्पना वेगळ्या स्वरूपात व संदर्भात जाणून घेणार आहोत. धर्म म्हणजे काय, ते मी वेळोवेळी सांगत आहे. आपल्या आजुबाजूच्या संपर्कातील व्यक्तींच्या बाबत आपले कर्तव्य म्हणजे आपला धर्म. काही जण, " हिंसा करणे" हाच आपला धर्म मानत आहे. आज जे काही बंगालमध्ये घडत आहे, ते घडवणार्‍या घटकांना, तसेच घडवले आहे. मारावे हेच इति कर्तव्य, हा कुसंस्कार झाल्याने, ते इतिहास घडवत आहेत. असो. मी काही या बाबत बोलणार नाही. प्रत्येकाने या वर विचार करावा. वा मला काय, त्याचे असे मानावे. फक्त यामुळे आपल्या मुलाबाळांना, नातवंडा-पतवंडांना कसे जीवन जगायला, मिळणार आहे, त्याची just कल्पना करावी.

      आता बघा. आपण पितृपक्ष फालतू ठरवतोय. पण ती एक पूर्वजांना. देण्यात येणारी Thank giving  आहे. आपण त्याला मुकणार आहोत. आजच्या नातवांच्या मुलांच्या खिजगणतीत आपण नसणार. पण  शाळाशाळातून हॉलोविन साजरा केला जात आहे. जाणार आहे. ते दुसरे तिसरे काही नसून पुर्वज आपले welwishers च आहेत. त्यांना व त्यांच्या skeletons ना  घाबरायचे नाही वगैरे. तेथे दफन, म्हणून सापळे.  आपण दहन करतो. म्हणून आपल्याकडे आत्मे ( सरळ शब्दात भुतयोनी) धुरांच्या वेलांट्यात.

       पण जेव्हा रात्री बाहेर पडण्याची वेळ येते, तेव्हा मुखात येते, राम राम, का तर मनातील भीति घालवण्यासाठी. आता सांगा, जेव्हा हे रामनाम जपतो. तेव्हा काय जादू होते, तर आपल्यातील भयाला दूर करण्याची क्षमता जागृत होते. त्या साठी कामी येते,  राजस्व मनातील. संचित -अनेक positive  विचाराचे. वाडवडिलांच्या आचरणाचे. त्यामुळे नकळत जमा झालेल्या राजस्वाचे. 

       मग होते. या सर्व हिंमत वाढवण्यार्‍या विचाराशी   

                    एकरूपता, म्हणजेच पुनश्चः राम.

            कसे ते सांगते. आपल्या ऋषी मुनींनी संस्कृत मध्ये खूप काही लिहून ठेवलेय, आपले कसे झालेय माहितेय,

            " काखेत कळसा अन् गावाला वळसा. 

          बघा हं.  राममद्वयमम्      म्हणजे

          राम अद्वयम्  म्हणजे एकरूपता. तीच सदैव वर्तमानातील घटनांशी साधा. सत्य माहीत करून घ्या. दुर्लक्ष करू नका. जमल्यास निदान चर्चा तरी करा.  चांगला बदल घडावा, ही तीव्र इच्छा करा.

          एकरूपता. ही अापण जीवनातच नाहीतर, मृत व्यक्तिला करायला सांगतो. पुर्ण भारतवर्षात अंतयात्रेत काय म्हणतात, बरे, राम बोला- राम बोलो भई राम". म्हणजेच त्या व्यक्तीला अंतराळात विलीन = एकरूप होण्यास विनंती करतो.  जरा जास्त गंभीर झालेय खरे. पण हेच सत्य आहे. रामबाण आहे, सुखी जीवनाचे रहस्य अाहे. या क्षणी जे कार्य करावयास हवे व करत आहात, त्याशी एकरूप व्हा. जे जे काही राजस्व संचित झाले आहे, ते पूर्ण क्षमतेने वापरा. मग रामराज्य दूर नसेल. आज म्हटले तर छोटासा लेख. पण जर विचार व आचार केलात, तर मोठा अाशय व पूर्ण ज्ञान देणारा ठरेल. 

          बघा.भेटा. मी मनोरंजन ही करेन. पण ते समजून घ्या. no pranks here. ह्या! ह्या! करून हसण्यापेक्षा हसतमुख राहावे, असे मला वाटते, पटवतेय नं मी? मग read my blog regularly like & compliment and be smiling face persons. 

          आता भेटू या शनिवार व रविवारी.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू