श्रीराम व श्रीकृष्ण एकरूपता.
११ मे २०२१ रामकृष्ण एकरूपता.
शनिवारी व रविवारी आपण त्या अद् भूत ग्रंथात, राम व कृष्ण याच्या चरित्राची सरळ लेखनात व विलोम लेखनात एकरूपता पाहिली. प्रत्यक्षात त्यांच्या भूमिकेतील समानता पाहू. वरवर पाहता, अगदी विरोधी आचरणातून त्या दोन्ही अवतारातून श्री विष्णूंनी एकच पाठ- आदर्श घालून दिला आहे. स्त्रीविषयक सन्मान. झालेय काय, संस्कृत ग्रंथांचे खोलवर अध्ययन, दाक्षिणात्यांनी केले, तितके आपण केले नाही. उत्तरेला तर श्रीकृष्णाला, आपल्या रसिकतेखातर, वेगळ्याच स्वरूपात, प्रदर्शित केले. आता या दोन्ही रूपात नारायणांनी, महिलांना, माय भवानी कसे मानले आहे, ते सांगण्याचा, मी प्रयास करत आहे.
आज जे काही चालले आहे, आपल्या, हिंदुधर्माच्या विरोधात, "गदारोळ" माजविला आहे, तो ही हिंदुधर्मियांच्या पोटीच जन्माला, आलेल्या, पुत्रांकडून. फेसबुकच्या माध्यमातून.
श्रीरामांवर, आरोप केला जातो, त्यांनी धोब्याचे ऐकून, पत्नीला सोडले. ह्याच मुद्दावरून, ही मंडळी, आपले मानमनिय मोदींजींची खिल्ली उडवतात. पण हे विसरतात. लहान वयात झालेले लग्न, आपल्या देशधर्म व आदर्श यासाठी दोघांनी स्वतंत्र मार्गाने वाटचाल केली आहे. निदान २.३ लग्न ( संविधानात मान्यता नसून) करणार्या नेत्यापेक्षा व त्यांना पाठीशी घालणार्या वरिष्ठ नेत्यांपेक्षा, सरसच नव्हे का?
आजकाल अशा अनैक्तिक संबंध दाखवणार्या, मालिकेत रमणार्या, जेष्ठ महिलांना सवाल विचारते, " जर तुमच्या जावयांनी/ सुनांनी असले वर्तन केले तर? असो. आपण मूळ मुद्दाकडे वळू या. राघवांनी, सीतेला वार्यावर सोडले नाही, लक्ष्मणाच्या सुरक्षित हाती, वाल्मिकि मुनींच्या आश्रमात पोहोचवले. त्या मागील तत्व,नंतर बघूच. या प्रसंगावरून हिंदू धर्माची चेष्टा करणार्यांना, बुध्द अवतारात, सिध्दार्थाने झोपेत असलेल्या पत्नी व पुत्राचा केलेला त्याग खटकत नाही. अर्थात या दोन्ही अवतारात, श्री विष्णूंचे देवत्व व आदर्श आहे, ते म्हणजे, नंतरच्या काळात ते एकपत्नी व्रती राहिले.
आता वळू या. आठव्या अवताराकडे. सातव्या राघव व नवव्या बुध्द अवताराच्या मधल्या कृष्णावताराकडे.
आपले, हिंदू धर्मियच कृष्णाच्या १६००० पत्नी वरून त्याला रंगिला मानतात, का माहित आहे? त्यापायी ह्यांना, नवरात्रीत मज्जा करायला मिळावी.
आता जरा practical बनून या प्रकाराकडे बघा. कान्हाने म्हणे, गोपिकेंच्या बरोबर रासक्रिडा खेळली. सत्य नीट अभ्यासा. कथा वाचा. अष्टवर्षीय कान्हा, गोकुळातून, मथुरेला नेला. कंसाने, उध्दवाला पाठविले होते. मथुरेला येऊन, कंसाच्या वधानंतर, वसुदेवाने, कृष्ण व बलरामाला सांदिपनीच्या आश्रमात उजैनला, अध्ययनाला पाठवले. नंतर कृष्ण परतून, गोपींना भेटलाच नाही. मग ७.८ व्या वर्षी केलेल्या रासक्रिडेला, आज आपण काय रूप दिले आहे? तसेच पुढील १६ सहस्त्र नारींची सत्य कथा समजून घेऊ या, १३ मे गुरूवारीच्या लेखात. आपला धर्म व देव व त्यांचे देवत्व समजून घ्या हो. उगीचच हा ज्ञानाचा अनमोल खजिना हातून दवडू नका. तुमचे वय काही असो, निदान हा ब्लॉग वाचा. आणखीन् समजून घेण्याचा प्रयास करा. आपले देव आपले आदर्श जाणा व माना. रामायण सांगते, do's आणि महाभारत सांगते, don't. ते जाणून घ्या. तर भेटू, ठरल्याप्रमाणे गुरूवारी १३ तारखेला.
शनी .रवि. मंगळ व गुरू. जे काही, माझ्याकडे ज्ञान आहे, ते मी देईन व ग्रंथ व इतिहास अभ्यासून, तुम्ही ते वाढवा. माझ्यासारखा आनंद मिळवा. तर भेटणार नं. मी वाट बघते, तुमची. view & subscribe this blog for your benefit. 😆.याच बरोबर माझा कन्हैयाचा episode देत आहे. तो बघा.
Comments
Post a Comment