कृष्णलिला हवी. रासलीला नको.

 १३ .५ .२१ . कृष्णलीला हवी - रासलिला नको.

   परवा आपण श्रीराम व श्रीकृष्णाची एकरूपता पाहिली. तीच एकरूपता, त्यांच्या भक्तांत ही आहे.  दुदैवाने आज फेसबुक वरील तथाकथित विद्वान (अर्थात् स्वघोषित) यांनी "भक्ति" या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे.  त्यांच्या मते, I mean,  त्यांना, ज्या व्यक्तीकडे बोट दाखवून, ह्यांच्यावर टिका करा, सांगून फेसबूक वर सोडले आहे.  त्या व्यक्तिच्या,  प्रत्यक्ष कार्याचे कौतुक करणारे, या विद्वांनांच्या मते, अंधभक्त असतात. शब्द ही असे वापरतात, अंडभक्त😀 असो. आपण चांगल्याला चांगलेच म्हणावं. हे माझे तत्व. अन् जे वाईट आहे, ते वर्षोन् वर्षे प्रचलित आहे, म्हणून , " वा! छान! म्हणून माना डोलवायच्या, हे होणे नाही. परवाच्या लेखा सोबत मी, माझा एक एपिसोड दिला आहे, तो आपण पाहिलाच असेल, असे मी मानते. नसल्यास, कृपया, बघा.  कृष्णाच्या खर्‍या स्वरूपाला जाणा.  त्यात मी आपल्याला, राधेची खरी ओळख करून दिली आहे.  ती व तिचा पती, कन्हैयाचे खरे गाढे भक्त होते. ही त्यांची श्रध्दाच, त्यांना गोकुळातून पायी निघून  सौराष्टात  वाटचाल करण्यात सहाय्यभूत झाली. जमेल का, कसे शक्य आहे, असले फालतू प्रश्न, त्यांच्या मनीध्यानी आलेच नाही. जंगले नद्या डोंगर ओलांडून, ते द्वारकेत पोहोचले व त्यांच्या कान्हाने त्यांचा आदरसत्कार केला. असे हे भक्तिचे रूपच देवाच्या देवत्वाचे व धर्माचे वर्धन करते. इतर धर्मियांना बघा. तेथे जी एकरूपता दिसून येते ती,~ असो.

     ‍ आज मी तरूण आबालवृध्दांना सांगण्याचा प्रयत्न करते कि, संध्याकाळी , " शुभम् करोती" म्हणा,  वयस्क म्हणतात, आता काय? तरूण म्हणतात, वेळ कुठे असतो, व लहान मुलांना कोणी सांगतच नाही.  फक्त दोन तीन मिनिटे ~ असो. 

       पुन्हा आपण वयस्क राधा अनयकडे वळू. जिद्द असणे,महत्वाचे. आज आपण ज्यांना परप्रांतिय म्हणतो , ते येथे येतात, ते मेहनत करतात. नवनवीन कला शिकतात व स्वकष्टाची भाकर खातात. आताच बघा. कोरोना व lockdown मुळे रोजी रोटी बंद झाली तर, कोणाची दयेची भीक न स्विकारता, ट्रेन बंद असून,परतीच्या मार्गाला लागले व कसे तर अनय राधा सारखे पायी. तर काही लोक संकटात पलायन करतात, अशी टिका करू लागले. काय म्हणायचे, ह्या कर्माला?

        आता मी खर्‍या भक्तीचे व कर्तव्य बुध्दीचे उदाहरण सांगते. नीट वाचा. व त्यावर चिंतन करा. 

         मी A.G. com. होते. तेथे All India लेव्हल वर  भरती असल्याने, " परप्रांतिय" असत.  असाच एक दाक्षिणात्य, श्री. सुंदर राजन २३.२४ तारखेला join झाला. भांडूप क्वार्टर्स मध्ये  राहण्याची सोय. पोस्टींग मिळाली.ST audit party मुंबईसेंट्रल ला. दोन दिवस झाले. व सौ. नार्वेकर मॅडम व इतरांच्या लक्षात आले. त्याच्या पायात चपला नाहीत.  विचारल्यावर काय बोलला माहित आहे? म्हणे in village, we cannot afford. पहिल्या पगारात  घेणार होता. पैसे देऊ केले, तर आधी  आईवडिलांना विकत घेऊन पाठवणार होता.  अन् खरेच एक ता.ला कोणाबरोबर पाठवल्या व तिसर्‍या दिवशी स्वतः घातल्या. त्यांना आत्ता मिळाल्या  असतील,म्हणे.  मी लिहीते म्हणून राग करू नका. पण हे असे उदाहरण विरळाच नाही का?  

  उत्कट मातृपितृ भक्तिचे रूपच होय. खरेच विचार करा. चिंतन करा. आणि आदर्शवत् स्विकारा, ही विनंती.  हां, थोडे लेक्चरबाजी करतेय. पण चुकीचे आहे का, सांगा. 

  या सोबत माझा एक प्रवचनाचा प्रयोग सादर करीत आहे. विषय तोच, राधेचा असला तरी आशय वेगळ्या प्रकारे, आपल्या ध्यानात आणण्याचा प्रयास आहे. , त्या "" राधे"" सिनेमात, पालकांचा, स्वकष्टाचा पैसा घालण्यापेक्षा, आमच्या सुंदरराजनसारखे बना. पुंडरिक / श्रावण बाळ नाहूी, तर निदान स्वः कमाईतुन घरच्या गरजेच्या वाणसामानाची खरेदी करा. आईसाठी,  तिची काय गरज आहे, शोधा व द्या. मग बघा. तिच्या नजरेत किती आभा- कौतुकाच्या ज्योति उजळतील. ते सौख्य मिळवा. तीन तासाच्या  "त्या राधे"  पेक्षा, तिन्ही त्रिकाळ पुरणारा "आनंद" मिळेल. 

   भेटू या, आता शनिवारी १५ तारखेस.  असाच जीवनातील चिरकाल टिकणारा आनंद मार्ग  ज्ञात करून घेण्यासाठी. भेटा, वाचा. मनात SAVE करा. LIKE करा. म्हणजे पटवून घ्या. आचरणात आणा.





Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू