सुखी जीवनातील मोठा अडसर- अहंमन्यता.
१६ मे २०२१. नटसम्राट. वि.वा. शिरवाडकर.
१९७० साली प्रथम हे नाटक आले. या नाटकातून वि.वा. नं ( कुसुमाग्रजांना) नेमका काय संदेश द्यावयाचा होता, ते तेच जाणे. पण तेव्हापासून तमाम श्रोते, अप्पा बेलवलकर, या नटसम्राटांसाठी, भावूक झाले, ते आजगायत. पण कोणीही त्या मुलांची ही "काही" बाजू असेल, हा विचार केलाच नाही. समजा, आपल्यातील वृध्द पालक, बाहेरून भजी वगैरे आणून कागदातच खाऊ लागले तर घरातील मुलांची प्रतिक्रिया काय असेल? एक उदाहरण मी पूर्वीच ह्या ब्लॉगमधून दिले आहे. परत सांगते. आम्ही तिघी मैत्रिणी ( मी, निलम देसाई व मीना शहा.) ऑफिसमधून परत येण्यासाठी दादरला ट्रेन पकडत असू. रोज एक वृध्द महिला, प्रवासी महिलांकडे पैसे मागे. तिच्या वयाकडे पाहून नवनवीन target मिळत असे. आम्ही लक्ष ठेवले. तर ती स्टॉलवर बटाटेवडे व गुलाबजाम खात असे. निघून जाई. देसाई म्हणाली, साडी चपला महागाच्या दिसतात..मीनाच्या पुढाकाराने, घराचा शोध घेतल्यावर लक्षात आले, मधुमेह ४५०च्या वर असल्याने पथ्य चालू होते. डॉक्टर मुला सुनेला दोष देत होते. देवळाच्या नावावर, ह्या महिलेचा गर्व- अहंकारच ना हा. सांगायचा मुद्दा, काल लिहिल्याप्रमाणे, "पाचोळ्या"ने सर्व मोहातून आपल्याला मुक्त करणे, जरूरी आहे. नटसम्राट रंगमंचावर असले, तरी लौकिक जगात, मुलांची प्रतिष्ठा पण जपणे, अापले कर्तव्य आहे हे ध्यानीमनी नव्हते. आज ही ५० वर्षानंतर ही प्रेक्षक, ह्या नाण्याची दुसरी बाजू समजून घेतच नाही. जर आपल्या घरात असे घडले तर~~ असो. पुढच्या पिढीसाठी, स्वतःत बदल करणे, नक्कीच योग्य व फायदेशीर राहील.
आता ही खालील कविता बघा. आज त्याचे रसग्रहण वेगळ्याच रूपात शिकवले जाते. म्हणे दलित व सवर्ण रूपक आहे. हे चूक आहे. इथे कुसुमाग्रजांना, कोठचाही समाज अभिप्रेत नव्हता. सामान्यतः सर्वजण समोरच्याला underestimate करतात. मीच श्रेष्ट ( वयाने, शिक्षणाने वा सत्तेने) मानतात. व स्वतःच फसतात. आपले न्यूनत्व दूर करण्याच्या ऐवजी, फुकटची शेखी मिरवतात. त्यांना कवी, समज देऊ, पाहत आहेत.
जमीन व आगगाडी.
नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -
धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन
छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!
नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.
दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड
पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!
हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!
उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश
उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!
ह्यात भाष्य करायला नकोच बहुदा. आपल्या वयानुसार व क्षमतेनुसार योग्य आचरण ज्याचे , त्याने ठरवणे, हीच यातील शिकवण तरीही मंगळवारी बोलूच या विषयावर. मी जे like & subscribe म्हणते, त्याचा अर्थ सागितला आहेच. तर भेटू या मंगळवारी १८ मेला. तो दिवस विशेष आहे. आज स्वबळाने सत्ता न मिळवता, ही त्यांचे, सतरंजीवाले, शेखी मिरवत आहेत.
परवा ज्या आदर्श व सुनियोजित प्रशासक अशा छत्रपती शाहूंचा जन्मदिन आहे. त्यांचे खडतर जीवन व त्यावर मात करून सदैव जनसंपर्क व लोकसंग्रह करून THE BEST ADMINISTRATER अशा सातार्याच्या गादीचे संस्थापक छ.शाहूमहाराजांची थोरवी जाणून घेऊ या. १८ मे १६८२. तर मग परवा भेटू या.
Comments
Post a Comment