१८मे.आज सातारा छ.शाहू महाराजांचा जन्मदिवस १६८२.

 छत्रपती शाहू सातारा गादीचे संस्थापक. 

     हो. आज ह्या सर्वात जास्त कालावधिचे सुप्रशासक असे छत्रपती. आज त्यांचा जन्मदिवस. १८ मे १६८२. पण खरेतर, निदान खुद्द सातार्‍यात हा दिवस शाही स्वरूपात साजरा व्हायला हवा होता. असो. छत्रपती संभाजी महाराज व महाराज्ञी येसूबाईंचे सुपुत्र.  भावी छत्रपती असल्याने, ह्यांचे बालपण, शाही स्वरूपात पण शिस्तीत रायगडी  गेले. पण वयाच्या अवघ्या ७ व्या  वर्षीच नियतीची चक्रे अशी फिरली कि, सगळे होत्याचे नव्हते झाले. औरंगजेबास फितुर झालेल्या, छ.संभाजीच्या मेव्हण्यांमुळे, ते यवनाच्या हाती पडले. खरे तर जावळीच्या घनदाट जंगलात संगमेश्वरी, मुगल सैन्याला, छ.शंभुराजे सापडणे, शक्यच नव्हते. पण दोन्हीकडून मेव्हणा (महाराज्ञी येसूबाईंचे बंधू व छ.शिवाजी महाराजांची सुपुत्री राजकुँवर, ह्या भगिनीचे पती, गणोजी शिर्के, ह्यांनी वतनापायी, दगलबाजी केली. व छ.शंभुराजेंचा ठावठिकाणा,मोगलांना दाखविला. त्यांच्या वधानंतर, रायगड पडला. अन् राजपरिवार औरगंजेबाच्या हाती लागला. भावी छत्रपती जन्मतः नाव शिवाजी, आपल्या मातोश्री येसुबाई व आजी सकवारबाई ( छ.शिवाजी महाराजांच्या जिवित पत्नी) व मदनसिंग समवेत राजकैदी म्हणून मोगल छावणीत दाखल झाले. 

 सगळेच बदलले. औरगंजेबाच्या इच्छेखातर शिवाजीचे

  " शाहू" झाले. सुरू झाले खडतर जीवन.

         पण धैर्यवान येसुबाईंनी, आपल्ता बालराजेंचे दुहेरी जीवन, कौशल्याने  निर्माण केले. मोगल सैन्यात, छोटासा शाहू शांत व गरीब स्वभावाने वावरत असे. पण येसूबाईंनी व सकवारबाईंनी, ह्या निखार्‍या खालील ठिणगी, धगधगती ज्योत जागृत ठेवली. ती हि काही ५.६ दिवस नव्हे,  १० १२ महिने नव्हे .४.६ वर्षे नव्हे तर तब्बल १९ वर्षे. आपण कल्पना ही करू शकणार नाही, ह्या स्थितीची. एवढेसे पोर' पण गुप्तता बाळगून मनातील धग झाकून शत्रुच्या छावणीत कसे जगले असेल? ही अनोखी कैद या चारही राजकैद्यानी कशी कृष्ण निति वापरून जीवन जगले असतील? 

         त्या काळात, आपल्या शामियान्यात, त्यांचे धार्मिक व राजकिय शिक्षण  गुप्ततेने पार पाडले.  रामायण महाभारत पुराणे व उपनिषदे, ह्यांच्या बरोबर चाणक्यनिती व संत वाङमय त्या बालराजेंना शिकवत. अर्थात त्यांच्या सोबत असलेल्या केसरकर,  भक्ताजी, खंडो व निळो बल्लाळ चिटणीस असे अनेकजणांनी साथ होती.  साधू बैरागी -कडकलक्ष्मी- डोंबारी- भुत्ये- जोतिशी- रामोशी- ह्या स्वरूपात हेर पण लाभले होते. असे बिकट  बालपण भोगलेल्या ह्या बालशाहूंनी, पुढे वयाच्या २६व्या वर्षी सुटका झाल्यावर, स्वदेशी परतून तब्बल  २३वर्षे सातार्‍याला स्वराज्य स्थापन करून सुराज्य निर्माण केले. पण आज इतिहासाच्या अभ्यासक्रमात, ह्यांना दुदैवाने स्थानच नाही. हे, अापले दुर्भाग्य आहे. खरे तर यांची राज्य व्यवस्था व नीति  अादर्श मानून, स्वातंत्र्यानंतर, जर त्या foot prints वरून संविधान कायदा व्यवस्था अवलंबिली असती, तर रामराज्य दूर राहिले नसते.असो. 

          आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून, नंतर गुरूवार व शनिवार व रविवार अशा तीन विभागात, त्यांच्या जीवनातील तीन टप्पे जाणून घेऊ या. 

          १. युवराज म्हणून रायगडी जन्म. पिता छ.संभाजी महाराज व माता महाराज्ञी येसुबाई. १६८२ ते १६८९. छ.संभाजी मृत्यु.

          २. छावणीतील परस्वाधीन जीवन. १७८९ ते १७०८

          ३. भोपाळवरून सुटका.पण आझमच्या क्लेशकारी

              अटी. सातारी आगमन . राज्याभिषेक  व सुनियोजीत राज्यकारभार. १७०८ ते १७४९. 

              तर भेटू या गुरूवारी. २०मेला.

               by the way, I am surprise and happy to see the response of more than 12000 VIEWERS in such a short period  and  really its my  pleasure to meet you, my dear viewers. BE STEADY WITH ME. LIKE &SUBSCRIBE. AND INCREASE OUR MEMBERS.  आणि या मी लावलेल्या ज्ञानकल्पतरूचा लाभ जास्तीतजास्त मंडळींना मिळो, ही आशा करते.मला श्रोते व वाचक सदैव वंदनिय असतील.🙏

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू