छत्रपती संभाजी महाराज पुत्र - छत्रपती शाहू ( सातारा) महाराजांचे बालपण.
२०.५ .२०२१ . छत्रपती संभाजी पुत्र छ. शाहू
महाराज बालपण.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म व बालपण. त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी गांगवली येथे झाला. त्यावेळी छ. संभाजी राजे रामसेज किल्लाच्या रक्षणाच्या कामी होते. पुत्रजन्माच्या वेळी ते रायगडी परतले. व गांगवली येथे आले. बालराजेंचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीसाठी , "शिवाजी" असे केले.
नंतर लवकरच संभाजी राजेंनी १० जुलै १६८३ रोजी महाराज्ञी येसुबाईंचा व चिमुकल्या शिवाजीराजेंचा निरोप घेतला व ते राजापूरला गेले. तेथून गोव्याला रवाना झाले.तेथे विरजईचा हिंदुवरील अत्याचाराचा अतिरेक झाला होता. त्यांनतंर ते १६८३ नंतर रायगडी परतले. पण लढाईची धामधूम व फितुरीचे भिरभिरणारे संकट यामुळे बालराजेंना पितृसंगत मिळालीच नाही. अन् बालराजेंच्या वयाच्या ८व्या वर्षीत तर छ.शंभूराजेंचा वध झाला. परंतु कर्तव्यदक्ष माता येसुबाईंच्या च आजी सकवारबाईंच्या देखरेखी खाली त्यांचे जीवन सुखात व राजेशाही पण शिस्तीत व्यतित होत होते. त्याच बरोबर अनेक जणांच्या फितुरीमुळे त्यांच्या सुरक्षितेखातर, त्यांना बंधनात ठेवावे लागत होते.
१६८२ ते १६८८च्या काळात संभाजी महाराजांवर स्वकियांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न केला गेला. मुळात छ.शिवाजी महाराजांचा मृत्युच, शंभुराजांपासून लपवून राजरामाला छत्रपती केले गेले होते. त्या कटातील सर्वापासून, बाल शिवाजी राजांना धोका संभव होता. त्यामुळे ते दोघेही कशा मनस्थितीत असतील, ही कल्पनाच करवत नाही. त्यापेक्षा स्वराज्यावर येणारे , मोगली परचक्र, गोव्यातील हिंदूवरील अत्याचार व त्यांची, या हिंदू राजाकडून मदतीची अपेक्षा या सर्वातून बाहेर पडून छत्रपती संभाजींना, पुत्राकडे प्रेमपूर्वक लक्ष पुरवण्याचे भाग्य लाभले नाही. पण पुर्णत: सुशिक्षित व संस्कृत व राजकिय अध्ययन झालेल्या राज्ञी येसुबाईंनी, छ. संभाजींच्या परोक्ष स्वतः, माता पिता दोन्ही भुमिका निभवल्या. त्याच बरोबर छ.शभूराजांनी, येसुबाईंना मुलकी अधिकार ही दिले होते. त्यामुळै अंतर्गत कारभार ही बघावा लागत असे. नकळत्या वयापासून बाल शिवाजी राजे (शाहू)चे, बालपण, मातेला, अशा प्रकारे तिहेरी भुमिका बजावताना, बघतच जात होते. नकळतच सुनियोजित प्रशासनचा, सुसंस्कार मनावर घडत होता.
त्याबरोबर मनात, "टेहळणी बुरूज" निर्माण होत होते. ह्याच्या अर्थ माझ्या मागील ब्लॉगमध्ये वाचून संदर्भ लाऊ शकाल. तर शनि. २२च्या भागात, छ.संभाजीच्या क्रुर वधानंतर चे बालशिवाजीराजेंवर जीवन पाहू या. मोगलाच्या कैदेत त्याचे वसतीस्थानच नव्हे तर नावच बदलून गेले. औरंगजेबांच्या, शिवभयाने, त्यांनी शिवाजीचे शाहू केले. पण महाराज्ञी व महाराणी सकवारबाईंसाठी ते फक्त " बाळराजे" च राहिले. ही रामकथा व नंतरच्या स्थापित रामराज्याची माहिती जाणून घेणार ना? घ्याच. ही मराठेशाहीतील महत्वपूर्ण पाने, प्रत्येक मराठी माणसांनी जाणून घेणे, गरजेचे आहे. नुसतेच , " जय शिवाजी" , म्हणून, स्वः कर्तव्याकडे पाठ फिरवणे, काय उपयोगाचे? तर हा सत्य इतिहास ज्ञात व्हावा, असे वाटते नं? तर वाचत रहा, माझा हा सत्यशोधक ब्लॉग. अन् खर्या घटना माहित करून घ्याच. हे ज्ञान मिळवणे, वयातीत असते हो. अभ्यास क्रमातून दूर ठेवलेल्या, या महान व्यक्तीची ओळख करून घ्या. तर भेटू या. परवा शनि व रविवारी. Then, Dear viewers, don't forget to subscribe the blog and try to join your friends to this mission of knowledge. 👍👍👍.
Comments
Post a Comment