छ.संभाजी कृत , " संस्कृत ग्रंथ बुधभूषण" यातील सुचक मदत.

 22. 5 . 2021. छत्रपती शाहू यांचे मोगल छावणीतील वास्तव्य व त्यातील वास्तव.


        Good morning Viewers, Welcome.

      आज आपण महाराज्ञी येसूबाईं व बाल शिवाजी (शाहू) राजे व इतर राजपरिवाराच्या, मोगल अधिपत्याखालील व्यतित झालेल्या, तब्बल १९ वर्षाचा (१६८९ ते १७०८)  या  कालावधीचा आढावा घेणार आहोत. मी मुद्दाम अटक व कैद शब्द वापरले नाहीत.  का तोच खुलासा करणार आहे.

        अगम्य व अजिंक्य असा रायगड, फितुरीमुळे, मोगलांचा अधीन होऊ घातला होता. आधीच स्वकियांच्या, खुद्द येसुबाईंच्या सख्या भावाच्या दगलबाजीमुळे छत्रपतींचा संभाजीराजेंचा मृत्यु झाला होता. सद्यकाळात आपले कोण - फितुर कोण कळेनासे झाले होते. येसुबाईंनी चाणक्यनीतिचे अध्ययन केले होते. त्याचा उपयोग केला. औरंगजेबाच्या सरदाराला, झुल्फिकारखानाला संदेश पाठवला, " आम्ही रायगड  देऊन स्वत: स्वाधीन व्हायला तयार आहोत. पण अटीवर, आमच्या जीवाची व धर्मरक्षणाची हमी, त्याने घ्यावी. त्या अाधी त्यांनी राजारामांची, गुप्ततेने गडावरून रवानगी केली. व मोजक्या विश्वासू मंडळींची सभा घेऊन अापली भूमिका स्पष्ट केली,   " रायगड आता  लढायचा तर जी मोजकी स्वःराज्यप्रेमी आहेत, त्यांना गमवावे लागेल. व बाह्यशत्रूपेक्षा, हे अंतर्गत शत्रु ( फितुर) जास्त धोकादायक ठरू शकतात. तेव्हा आज बादशहाला पेचात पाडून, स्वाधीन व्हावे, हे कमी  धोक्याचे ठरेल. आपलेच लोक तेथे आमच्या जीवाला हानी करणार नाहीत. कारण विना कारण ही तोहमत, आपल्यावर येऊ नये, म्हणून बादशहा सजग राहतील. काट्याने काटा काढणे, या सद्य परिस्थितीत  सोईस्कर वाटत आहे. हा निर्णय महाराज्ञी येसुबांईंनी महाराणी सकवार( छ.शिवाजी महाराजांची पत्नी) व छोटे बाल शिवाजीराजे व मदनसिंग ह्यांच्या उपस्थितीत, विश्वासू व मातबर लोकांच्या कानावर घातला.  व गडाखाली वेढ्याच्या मुख्य सरदार झुल्फिकारखानाला कळवला. 

    एका महत्वाच्या बाबतीत, हा निर्णय जबरदस्त कामयाब ठरला. महाराणी स्वाधीन होत आहे, हे समजल्यावर कदाचित दुखी झालेली जनता, त्यांच्या सोबत निघाली. २००.३०० जण हात बांधून राणीसोबत, गडावरून निघाले.  बालराजे, केसरकरांच्या घोड्यावर होते. सर्व त्यांना मानवंदना देत होते. राज घराण्याचा रितसर मान ठेवण्यासाठी, दस्तुरखुद, झुल्फिकारखान गडा वर आले होते. बहुदा भयापोटी, त्याने, बालराजेंना आपल्या घोड्यावर घेतले. अन् अघटित घडले. सततच्या सहवासाने, त्या मोगल सरदाराच्या मनात, या बालजीवाचे  प्रेम  व वात्सल्य जागृत झाले. ते पुर्ण छावणीच्या जीवनात व सुटकेच्या वेळी, अटळ राहिले. 

    या निर्णयाने सुरक्षा अबाधित राहिली. यामागे छत्रपती संभाजी महाराजांनी  लिहिलेल्या ,  बुधभूषण  ग्रंथाची मदत झाली. ह्या ग्रंथाची, मी या ब्लॉगमध्येच ओळख करून दिली आहे. ती पुन्हा बघावी. उद्या प्रत्यक्ष छावणीतील जीवनाची  माहिती करून घेऊ या. हा इतिहास, अभ्यासक्रमात नसल्याने व बहुतेकजण, दुदैवाने अवांतर वाचन करतच नाहीत, त्यामुळे या सत्य घटनांबाबत अज्ञानी राहिलेत. स्पष्टपणाबद्दल माफी असावी. पण चुकीचे आहे का? 

    THEN BETTER LATE THAN NEVER. THE BEST THING IS TO STAY WITH ME AND THINK OVER IT. तो फिर कल मिलेंगे ना?

बुधभूषण-- प्रजा कर्तव्य

https://www.sunitakarnikshow.com/2020/03/blog-post_25.html

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू