छावणीतील सत्य व भविष्य.
23.5.2021 बालशिवाजीराजे, " शाहू" बनले व
त्यांचे छावणीतील जीवन, कसे व्यतित झाले.
बादशहाची छावणी. मजल दरमजल करीत, सरदार झुल्फिकारखान, राजकैद्यांना घेऊन डेरे दाखल झाले.
छावणीत शिरल्यावर, मातोश्री सकवारबाईसाहेबा व राज्ञी येसुबाईंना धक्काच बसला. मोगल शिपाईंच्या सोबत जवळजवळ, त्याच संख्येने, आपली मराठी मंडळी ही दिमाखाने वावरत होते. राजे तर लहान होते. पण येसुबाई तर जाणत्या होत्या. त्यांच्या लगेच मनात आले. ही तर उघड छावणी अाहे. इथे तर काही बंदिस्त चालत नसावे. म्हणजे~ मग जेव्हा, स्वारींच्या बाबत ते ते वध झाला-- धर्म बदलण्यासाठी, त्यांचे व कवि कलशांचे हाल हाल केले गेले, ते ह्या सर्वांच्या उपस्थितीतच घडले असावे तर-- मग परक्या कलशांनी आपले डोळे फोडले- जीभ कापली तरी स्वामींची साथ सोडली नाही.~ पण हे सर्व स्वकिय बघत बसले असतील का? फक्त वतनासाठीच का? स्वहितासाठी स्वधर्म - आपले राजे- ह्यांच्यासाठी, " प्राण घेतले हाती", ते मावळे हेच का? जर हे आता इथे असलेले व मराठी जन्म घेतलेले, त्या वेळी एकत्र झाले असते तर~~ तर आज स्वामी जिवंत असते. मग ह्यांनाच खरे स्वराज्याचे शत्रू म्हणावे लागेल. आपल्याला या (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गनीमा) गोतावळ्यात राहून बालराजेंना घडवायचे आहे. सुदैवाने आपल्याला, मातोश्री सकवारबाईंची साथ व आशिर्वाद लाभले आहेत.
नक्कीच
उगवतीच्या डोईवरी
तुरा सुर्याचा डोलतो.
नारायणाचे रूप घेऊनी
धरतीला गा धरतीला
अन् इरसरीने चांद संपवी,
रातीला गा रातीला.
हे सपान पुरे झालेले पाहूच, आम्ही या डोळी या देही. आबासाहेबाच्या नंतर दोन वरीसाने, पुत्रकामेष्टी यज्ञानंतर हे " शिवाजीराजे" पोटी आले, ते काय उगीचच असेल? तेच नव्हे तर पुढील ७.८ पिढ्या अबाधित राज्य करतील, या मराठीशाहीत. मग भले प्रशासन पध्दतीत बदल झाले तरी जनमानसात अधिराज्य करतील.
हे भाग जरा लांबणार आहेत, कारण ह्या घटना मुळतः, थोडक्यात गुंडाळण्यासारख्या नाहीतच. एकदा तुम्ही, interest घेऊन वाचता आहात, तर मलाही details मध्ये सांगायला हुरूप आला आहे. हे सत्य जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचणे, आवश्यक आहे. तेव्हा कॄपया हा माझा ब्लॉग सर्व नातलग व मित्रमैत्रिणींच्या बरोबर SHARE करा. इतिहासातील सत्य जाणून घ्या. आपल्याला हा सातार्याचा इतिहास,पुढच्या पिढ्यापिढ्यांपर्यंत पोहोचावयाचा आहे. 🙏🙏🙏.
हॉलोबिन ताजमहाल आपले अतित नाही.
तर हे वाचाल तरच वाचाल. हिंदुधर्म वाचवाल. तर भेटू या. परवा २५मे मंगळवारी- आपल्या ठरलेल्या दिवशी.
छत्रपती संभाजी कृत संस्कृत ग्रंथ= बुधभूषणशी, आज मी आपल्याला, परिचय करून देणार आहे.
त्यात दुसर्या अध्यायात, छ.शंभू राजे, अंतर्बाह्य राजनीति सांगत आहेत. खरे तर जिजाबाईंचा शंभूबाळ हे लिहित आहे. कारण हा ग्रंथ त्यांनी वयाच्या १५.१६ व्या वर्षी लिहिला आहे. प्रथम आपण मराठीत त्याचा अर्थ समजून घेऊ व नंतर संस्कृत श्लोक पाहू. म्हणजे समजून, त्यांच्या शब्दातच आकलन करून घेऊ.
शंभुराजे ( इथे छत्रपती असा उल्लेख केला नाही, कारण हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा शिवबाराजे ही प्रजेचेच राजे होते. पण छत्रपती झाले नव्हते.) लगेच काही मंडळी. असो.
आता त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथाकडे वळू.
इथे त्यांनी राजनीतिच्या विषयावर भाष्य केले आहे.
ते सांगतात की राजा कसा असावा.
त्याला राजनीतिची पूर्ण जाण असावी. राजनीति विषयक ग्रंथाचा अभ्यास असावा. सद्य परिस्थितीची सामाजिक व आर्थिक समज असावी. बाह्य प्रदेशातून आलेल्या मंडळी बद्दल माहिती असावी व त्यांच्या हालचालीवर लक्ष असावे. त्यांच्या व्यापाराला परवानगी देताना दक्ष असावे.
राजा नम्र असावा. त्याचे कार्य व वर्तन सज्जनांना आवडणारे असावे. राजा बुध्दिवान असावाच, पण त्यासोबत त्या बुध्दीचा स्वतंत्रपणे सदुपयोग करणारा असावा.
तो सावध व दक्ष असावा. तसेच सरळ मनाचा, क्षमाशील व धर्मात्मा असावा. त्याच्या मनात द्वेष मत्सराला थारा नसावा. प्रजेकडून त्याने कर ही अल्प प्रमाणात घ्यावा. म्हणजे प्रजेला कर डोईजड न व्हावा. उत्पन्नाच्या प्रमाणात सर्व समान असावा. राज्य शास्त्रातील षट् गुण जाणकार असावा. त्याने गुणाची कदर करावी. त्याने यानाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे .यान म्हणजे गमन आगमन - दळणवळण. शत्रुशी द्वैधिभाव राखणे गरजेचे अाहे --- प्रजेपेक्षा वेगळपणा. जेतेपणा. म्हणजे त्यांना स्वप्रजेच्या बरोबरीने अधिकार न देणे. संश्रय-- कोठे जबरी करावी व कोठे नरमाई याबाबत योग्य निर्णय घेणारा असावा.
बलशाली व सतत उत्साही प्रसन्नमुख. ( हसतमुख नव्हे)असावा.
धैर्यशाली, दुसर्याची मर्म व वर्म जाणणारा, निर्व्यसनी असावा. मुख्य म्हणजे " आ बैल मुझे मार" या प्रकारातला नसावा. उत्कर्ष व अपकर्षातील बदल समजणारा असावा .
उपकाराची जाणिव ठेवणारा असावा. तसेच वृध्दाबद्दल आदर व सेवा भाव बाळगणारा असावा.
Comments
Post a Comment