छत्रपतींच्यावरील छावणीत मातेने जे संस्कार केले, त्यातूनच घडले, सुप्रशासक छत्रपती.

 बालशाहूं राजाचे छावणीतील दुहेरी जीवन.


सुस्वागतम्, माझ्या सुजाण वाचक हो, अगदी मनपूर्वक. मी आज खूप खुश आहे. ह्या ब्लॉग लेखनाचा, मी प्रारंभ केला तर खरा. पण जरा मनात संदेह होता. आजकालच्या दुनियेत,  ऐतिहासिक अशा  सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावी, अशा महाराज्ञीची गंभीर दखल कोणी घेईल का?  prank& jokes च्या, या दुनियेत मी वेडी तर ठरणार नाही नं? पण नाही. तुम्ही  mature & intellgent लोकांनी मला आनंदाचा व आश्चर्याचा धक्का दिलात. दिवसाला १०० हून जास्त जनता, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे, पाहून माझा  उत्साह द्विगुणित झालाय. मी हे ४च दिवस न लिहिता दर रोज लेखन चालू ठेवणार आहे. तर भेटा व माहित करून घ्या, या दोघा सासुसूनेची( महामाता सकवारबाई व राज्ञी येसूबाईंची) महती. गनिमांच्या छावणीत, बालराजेंना घडवायची युगत. 


 छावणीतील जीवन. लहानग्या बालराजेंना घेउन माता व आजींचे मोगल छावणीतील जीवनाला आरंभ.  सुरूवातच झाली, ती नाव बदलण्याने. पण परस्वाधीन असलेल्या येसुबाईंनी _, ह्यातच समाधान मानले कि, औरंगजेबाच्या मुलीने, बेगम झिन्नतनुसाबेगम यांनी, संरक्षण व धर्म रक्षणाची जबाबदारी पत्करली. एरवी, झुल्फिकारखानाने हिंदुत्वाची अट मान्य केली असली तरी बोलून चालून तो बादशहाचा चाकर. कितपत वचन पाळू शकेल, हा प्रश्नच होता. असो. ही जणू तारेवरची कसरतच होती.

         बादशहा व झिन्नतनुसाबेगमच्या लक्षातही न येता, बालराजेंचे धार्मिक शिक्षण चालू होते. रामायण व महाभारता सोबतच विदुरनीति चाणक्यनीति व पुराणे दशावतार त्यांची महती व सत्य त्या बालजीवाला दोघी सांगत. पण हळू अावाजात. सोपे नव्हते हे, त्या काय बंदिस्त जागेत नव्हत्या त्या. कापडी कनात ती. बाहेर आवाज जाऊ न देता, त्या लहानग्या बालजीवाला, असे दुहेरी जीवन जगायला शिकवणे, फार कठीण काम होते.  भावी राजा म्हणून ज्ञान मिळवायचे. शरीर यष्ठी सुदृढ ठरवायची अन् तंबूच्या आत शानदार चालणे बोलणे व ताठ मान व डोळ्यात राजशाही अदब. पण बाहेर मोगल सैन्यासमोर, विषेशतः येथील मोगलाईत सामिल झालेल्या, मराठी मंडळी समवेत असे वागायचे की, अल्ला घरची गाय.  चालढाल ही कशी तर ढिलाईची.  ते ही तब्बल १९वर्षे घडवले. त्यामुळे नंतर सुटकेनंतर जणू सापासारखी " कात" टाकली शाहू राजांनी.  राज्ञी ( हो छावणीत हि त्या महाराज्ञीच राहिल्या- मनाचा खंबीरपणा सोडला नाही.)  

          धर्म ग्रंथासोबत त्यांनी पतीने लिहिलेल्या बुधभूषणाचे अध्ययन, शाहूंकडून करवलेच. त्यासोबत विष्णुशर्मा लिखित, पंचतंत्रातील, कथांचे इंगित, बालराजेंना समजावले.

           अन् आपण पक्षी प्राण्यावर आधारित कथा म्हणून मुलांना लहानपणी देतो. मोठेपणी वाचत नाही व त्यातील आशय समजूनच घेत नाही. मूळात: या कथा, एका राजाच्या बिघडलेल्या, तीन राजपुत्रांना सुधारण्याचा विडा उचलला  अन् विष्णुशर्मा या गरीब ब्राह्मणाने ६ महिन्यात, त्यांना मार्गावर आणले व राजनीतिज्ञ बनवले - या कथांतून.  मग सांगा या कथा कोणासाठी लिहिल्यात, बच्चे कंपनीकरिता कि  आपल्याकरिता? राजकारण नाय करायचे,  करू नका.

            पण आजचे राजकारण जाणायचे, तर हा सत्य प्रयोग समजून घ्या. तर आता उद्याही भेटणार आहोत आपण नं? तसेच आधीचे blogs ही refer करा. I AM SURE, YOU ALL WILL LIKE THOSE AND YOU WILL AGREE WITH ME. AND DO NOT FORGET TO SUBSCRIBE TO THIS BLOG. 

           SEE YOU TOMORROW. वाचक परमेश्वरांना🙏🙏🙏.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू