१)राम नावातील गंमत. हिंदू धर्मातील ग्रंथात ही आहे रंजकता.८.५ .२१ पहिला भाग.
वाचक हो, तुमचे स्वागत आहे. हां. कदाचित तुमच्या मनात येईल, नेहमीच काय , " राम", पण हे वाचाल तर लाखो कमवाल, अर्थ (पैसा) या अर्थाने नव्हे तर ज्ञान या अर्थाने. संस्कृत कडे आपले तसे दुर्लक्षच झालेय. मृत भाषा मानली आपण, शेकडो वर्षे. त्यामुळे आज आपण खूप मोठ्या खजिन्याला मुकलो आहोत. अजून वेळ गेली नाही.
मी आज एका महान ग्रंथाची ओळख करून देणार आहे. हा ग्रंथ छोटा म्हणजे ३० श्लोकांचा आहे. पण गंमत म्हणजे तो वेगळ्या प्रकारे वाचल्यास ३०+ ३०= ६० श्लोकांचा होतो. आता बघा,
हा ग्रंथ माझ्या बालमैत्रिणीने whatsup केला. सौ. शुभांगिनी चंद्रकांत जाधव. (मूळ सुनंदा गोपिनाथ गुप्ते) जन्मापासून मैत्रिणी. खांडके चाळ नं ५.
मूळ हा ग्रंथ कोणी शोधला व whatsup मध्ये प्रसारित केला, ते रामकृष्णच जाणे. . त्या ग्रंथकर्त्यासोबतच, ह्या शोधकर्त्याला प्रथम नमन करू या. आता बघा हा नमन शब्द दोन्हीकडून ही वाचा. सेम. तसेच बघा देव अक्षरे उलट केली अन् मात्रा जागीच ठेवली, तरी दोन्ही पूजनियच देव व वेद.
तशीच गंमत या ग्रंथात आहे. प्रत्येकी ३० श्लोक उलट रीतिने वाचले, तर काय होते माहितेय. सरळ वाचल्यास रामकथा व उलट क्रमाने वाचल्यास कृष्णकथा. संस्कृत भाषेतील हा ग्रंथ रचिला आहे, कांचीपुरम् येथील, कवि वेंकटाध्वरि या महान व्यक्तिने. तो ही १७व्या शतकात.
अहो, आज आपल्याला, या मोबाईलवर एका finger touch ने, लिहिताना ही ," इमोजी" व readymade greetings ची गरज भासते. त्याकाळात असे रचनात्मक लेखन कसे केले असेल? आता बघाच हं.
या ग्रंथाचे नाव ही , " राघवयादवीयम्" ठेवले आहे. राघव हे श्रीरामाचे प्रथम नाव व पुढे लावलेय, श्रीकृष्णाचे कुलाचे नाव. दाखवलेय, दोघांची, "एकरूपता". दिसतेय या कवि वेंकटाध्वरिंची आत्मिक क्षमता. अर्थात त्यासाठी त्यांनी किति वाचन केले असेल, अनेक शब्दसंपदेचे, " राजस्व मनात जमा केले असेल व ह्या अकल्पित साहित्याची निर्मिती केली असेल. या तिन्हीच��
Comments
Post a Comment