२)राम नावातील गंमत. हिंदू धर्मातील ग्रंथात ही आहे रंजकता.९.५ .२१ दुसरा भाग.
या ग्रंथाचे नाव ही , " राघवयादवीयम्" ठेवले आहे. राघव हे श्रीरामाचे प्रथम नाव व पुढे लावलेय, श्रीकृष्णाचे कुलाचे नाव. दाखवलेय, दोघांची, "एकरूपता". दिसतेय या कवि वेंकटाध्वरिंची आत्मिक क्षमता. अर्थात त्यासाठी त्यांनी किति वाचन केले असेल, अनेक शब्दसंपदेचे, " राजस्व मनात जमा केले असेल व ह्या अकल्पित साहित्याची निर्मिती केली असेल. या तिन्हीचा संदर्भ,माझ्या आधीच्या दोन लेखात मिळेल.
पहिला श्लोक,
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लिलामारायोध्ये वासे ।। १।।
हेच उलट क्रमाने लिहिल्यास,
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ।।१ वि.।।
बघा नीट अक्षर रचना. असे ३० श्लोक अर्थ पूर्ण , हेही आपल्या हिंदू धर्मातील सर्व भारतवर्षात वंदनिय असलेल्या राम व कृष्ण दोन्ही देवतांचे एकत्रित गुंफलेले चरित्र. त्या वेंकटाध्वरि कवींची महानता पूर्ण विश्वात विख्यात करणे, हेच माझे जीवित कार्य असेल. तुमची साथ हवी🙏🙏🙏.
आता अर्थ जाणून घेऊ या. पहिल्या श्लोकाला १ अंक दिलाय. तसेच उलट लिहिलेल्या श्लोकाला १ वि. लिहिलेय. अशा उलट्या क्रमाने केलेल्या लेखनाला,
"विलोमम् " संबोधतात.
प्रथम श्रीराम कथा,
मी ह्या श्रीरामाला चरणवंदन करत आहे. ज्यांच्या ह्रदयात सीतामाई विराजमान आहे. जे आपल्या प्रिय सीतेच्या शोधार्थ, सह्याद्री पार करून, लंकेस पोहोचले व रावणाचा वध केला, मग सीतेसह अयोध्येला परतले.
आता याच्या विलोमम् मधील कृष्णकथेचे वाचन करू या.
मी,रुक्मिणी पती व गोपिकांना पुजनिय, अशा श्रीकृष्णाच्या चरणी प्रणाम करीत आहे, जे सदैव, माता लक्ष्मीसह विराजमान असून त्यांची शोभा-प्रभा, समस्त हिरे जवाहरांच्या शोभेस निस्तेज ठरवते.
आवडला नं हा अनोखा साहित्य साज़. मग संपूर्ण ग्रंथ जाणण्यास उत्सुक आहात नं, please माझ्यासाठी नाही तर, तुमच्या नातवंडांना ह्या अनोख्या, त्यांच्या भाषेत UNIVERSAL WONDER ची कथा ऐकवा. तुमच्या मालिकेची कथा ना तुम्ही आठवून सांगू शकणार, ना त्यांना त्यात रस असणार. तेव्हा जरा आपल्या देशातील , या कलाकॄतीची ओळख पाहिजे ना? तर वाचत रहा, माझा ब्लॉग. आणि empress your grand children👍👍✍.
Comments
Post a Comment