मायाजाल व सांप्रत सावळा गोंधळ.
१. ७. २१ गुरूवार जेष्ठ कृष्ण सप्तमी. माया नगरी.
आज पुन्हा ४ दिवसाची gap पडली, प्रिय वाचक हो, क्षमस्व. काय करू, ही मुंबईच नव्हे तर, ही पुरी दुनियाच खरेच, "माया" नगरी झालेय. तुम्हाला माहीत आहे, हा
" माया" शब्द अगदी पूर्णतः विरोधी अर्थाने वापरला जातो. बघा आता,
१. माया:- ममता- प्रेम. हा positive अर्थ. आईची माया. बहिणीची माया वगैरे.
२.आदिमाया:- मूळ देवी. पार्वतीला उद्देशून म्हटले जाते. म्हणजे देवत्व. बरोबर नं.
३. माया:- जमवलेले डबोले. साठवलेले धन. आजकाल कोणी निवडून आले कि, पुढारी/ नेते मंडळी करोडोंनी इतकी "माया" जमवतात हो, कि आपण कल्पनाच करू शकणार नाही. ही माया- लक्ष्मी. पण इथे जरा negative अर्थी वापरला जातो हा शब्द.
४. मायाजाल:- भुलभुलैया या अर्थी ही माया शब्द योजला जातो. बघा, माया बाजार. माया नगरी.वगैरे. ते ढोंगी बाबा अन् बाया असे काही मायाजाल पसरतात कि, सामान्य माणूस त्या जाळ्यात फसतो व लुटला जातो.
५. जादूचे प्रयोग:- रंगभूमीवर असे काही हातचलाखीचे प्रयोग दाखवून मायाजाल पसरतात कि,प्रेक्षक आश्चर्यचकित होतो.
६. कपड्याची माया:- अं हं, कपड्यानी भरलेले कपाट नव्हे हो. शिंप्याची , 'माया' . आठवतेय का, पूर्वी, लहानपणी पोलके, फ्रॉक शिवायला देताना आया , शिंप्याला सांगत, जरा ," माया" पुरती सोडा हं नाहीतर , लगेच घट्ट व तोकडे होतात हो कपडे, म्हणजे शिलाईच्या आत जास्तीचा कपडा व जास्तीची शिलाई मारायची. even हल्लीही लग्नाच्या साडीवरील ब्लाऊजच्या बाबतीत हेच धोरण ठेवावे लागते, कारण आपली शारिरीक माया वाढते, तसेच ते मॅचिंग ब्लाऊज ही चालले पाहिजे ना?
तर ही अशी माया-- मी ही शब्दाची माया जमवतेय. तुम्हाला माझ्या या MAYABLOG मध्ये गुंतवण्यासाठी , पण हां, तुम्हा वाचकांचे हित, समोर ठेऊनच, लिखाण करत आहे.
जरा विषयांतर होतेय. पण धोरण या शब्दावरून आठवले, ते सांगते. एका मान्यवर वर्तमानपत्रात, परवा २८ जूनच्या संपादकीय लेखात, एक नवीन शब्द वापरलात,
" धोरणधीर" मला फार आवडला. अगदी अर्थपूर्ण आहे बरे का!
त्यांनी अर्थही सांगितलाय, "धोरणधीर म्हणजे आपल्या धोरणाचे फलित काय हे पहाण्यासाठी करावी लागणारी प्रतिक्षा. त्यांचेच विधान येथे जसेच्या तसे देत आहे, कारण मला ते, जबरदस्त पटलेय. तुम्हाला ही पटेल बघा,
" त्यांनी भूतानच्या राजांचे, जिग्मे वांग्चुक यांचे कौतुक केले आहे. ते राजेच आहेत निवडून न येण्याचा सवाल नाही. तरी ते देशभर कोरोना परिस्थितीचा व प्रजेच्या हालाचा आढावा घेत फिरत आहेत. पुढे संपादक म्हणतात, " महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निदान, अप्रत्यक्षपणे का होईना, हालहवाल समजून घेण्यास हरकत नाही. तशा त्या घेतल्या असत्या, तर अवघ्या ३ आठवड्यापूर्वी जाहीर केलेली नवी नियमावलि, त्यांनीच स्वहस्ते मोडीत काढली नसती. ह्यातून ह्या सरकारातील गोंधळाचे दर्शन घडतेच. माझ्याही हे मनात आले होते. लिहावयाचे ठरवले, पण जरा बिचकले व आजारीच पडले. मग हा मुद्दा बाजूस झाला. पण आता, लोकसत्ताचे संपादक ही हेच मत मांडत आहेत.
आता हे बघा, साधा १०० ताप तो काय, एरवी आपण झोपतो, तरी का? एक गोळी घेतो, अन् काम चालू. पण आज त्यासाठी एका खोलीत बंद व किती , "माया" गायब झाली, माहित आहे? हिशिब करून उद्या सांगते. तीन प्रकारच्या तपासण्या अन् TENSION वेगळे. सावळा गोंधळ. दुसरे काय?
Comments
Post a Comment