मंगळ ग्रह - मंगळवार- पत्रिकेतील मंगळ ग्रह.

 १५ .६ २१ . मंगळवार. जेष्ठ शु. पंचमी. 

     स्वागत आहे, जिज्ञासू  वाचक हो. दिवसेदिवस माझे, I mean आपले वाचक वर्ग वाढत आहेत. हे श्रेय फक्त माझे नाही हं. तुम्ही ही प्रशंसेला योग्य आहात.  

     माझे, हे स्वगत अापण गोड मानून वाचत आहात. तसेच चिंतन व मनन करत असणार, म्हणूनच  उत्सुकतेने वाचता. हे मला प्रेरणा देत आहे.

      तर आज मंगळवार. जेष्ठ पंचमी सिधासाधा दिवस

      हां. धार्मिकदृष्टा देवीचा  व गणपतीचा दिवस. पण असे आहे, सगळेच दिवस उपास ठेवण्याची रीत नाही. हां देवाकडे मागणे, rather साकडे घालण्यासाठी उपास धरला जातो. मी  ५. ७.११ . दिवस उपास करीन, तु मला अमूक एक दे.  गंमत म्हणजे या विद्येच्या देवतेकडे काय मागतात माहितेय? विशिष्ट मुलगी / नोकरी वगेरे. त्या गणेशाने काय विवाहसंस्था खोललेय कि, नोकरीची  agency उघडलेय. लंघन आणि उपास संपूर्ण वेगऴ्या बाबी आहेत. स्वतःची लायकी व योग्यता सिध्द करा. मग नोकरी व छोकरी चालत येईल.  मंगळवारी  दादरच्या सिध्दि विनायकांच्या देवळातील लांबलचक रांगा पाहिल्या कि, या तरूण तरूणींची किंव करावीशी वाटते. अभ्यास करा. एखाद्या क्षेत्रात, न संकोचता्, शिरकाव करा. त्यात मेहनत घ्या. विवाह नंतरची बाब आहे. कमाई करण्यार्‍याला sky is the limit असते.  शोधले की मार्ग सापडतोच. एक उदाहरण चारी दिशेला दिसते. बघा. आपल्या घरच्या कामवालीला विचारा, तिचा दादला कोठे काम करतो.  कमाईतील किती पैसा घरात देतो.   मनात आणले व उघड्या डोळ्यांनी बघितले तर कित्येक छोटेसे व्यवसाय दिसतील.  जीव टाकून मेहनत घ्या. मग गणेशाची - विद्येच्या दैवताची अाराधना अध्ययन करून करा. लाइनी लाऊन काय मिळणार?  

      आधी आईवडिलांना हातभार लावा. मग friend ship करा. आईला एखादी साडी/ वडिलांना कपडे घेणे, दूर पण पैसा कमवला की चांगल्यापैकी मोबाईल मात्र घेणार. फेसबुकवर फोटो टाकणार? एकमेकांना like करणार. त्यासाठी  recharge करायला पैसे असतात. पण घरात डाळ तांदुळ किंवा एखाद्या  दिवशी घरच्या पालकांना भेळ वगैरे आणण्याचे सुचत नाही.

        मी topic बदलला नाही. पूर्ण  मुद्दाला धरून आहे. मंगळवार व पंचमी या बद्दलच लिहित आहे. मंगळ ग्रहावरून या दिवसाला नाव दिले आहे.

         मंगळ ग्रहाची पूर्वापार एक ख्याति आहे.   मंगल / शुभ या शब्दाचा मंगळ ग्रहाशी संबंध नाही. आपल्या जीवनाशी निगडित, असलेल्या ग्रहाच्या महती व प्रभावाच्या क्रमाने ही नावे दिली आहेत. बघा पहिला रवि( सूर्य), दुसरा सोम ( चंद्र) आता तिसरा मंगळ. ज्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. सगळ्याच अनाकलनिय गोष्टी, अंधश्रध्दा म्हणून  मोडीत टाकणे, बरोबर नाही. आमच्या लहानपणी मोबाईल संकल्पना हास्यास्पद ठरली असती. मुंबईत पहिली  आगगाडी ठाणे ते बोरीबंदर धावली, तेव्हा लोक बसायला तयार नव्हते. तेव्हा जर कोणी म्हटले असते.  काही वर्षातच ह्या गाड्या खचाखच भरून धावतील तर मुर्खात काढले असते. पण तेच आज कोरोना काळात ट्रेन बंद झाल्या तर, मुंबईकर helpless  झालेत.  कालाय तस्मै नमः। 

         आता येऊ आपल्या मूळ मुद्दाकडे. सुर्य व चंद्राचा आपल्या जीवनावर उपयुक्त परिणाम स्पष्ट दिसतो. तसेच मंगळ ग्रहाची जवळिक समजण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे? नासा ने चंद्रानंतर मंगळावरच का उतरण्याचा विचार केला असेल?  

         हां. या बुध्दीवादी व स्वतःला  विचारवंत समजणार्‍यांचा, आक्षेप आहे,  कि माणूस मंगळावर पोहोचलाय व आपण पत्रिकेतील मंगळावर आधारित विवाह योग्य/अयोग्य ठरवतोय. मान्य हे चूक असेल. पण माझा स्वतःचा जन्मपत्रिकेसंबंधी,  एक अनुभव  सांगते. माझी जन्मपत्रिका केली. तेव्हा काय घडले,  ते माहीत नाही. पण त्य़ानंतर कित्येक मान्यवरांना दाखवली. काही प्रश्न नव्हते. पण general विचारले कि, ( मला न पाहता) ठासून,  ते सांगत हिच्या उजव्या डोळ्यात problem  असेल. ते सत्य होते. वरवर पाहता ही बाब लक्षातही येत नसे. 

         जर पत्रिकेत अर्थ नाही, तर हे कसे शक्य होते?.

         पत्रिकेत,  मंगळ ग्रह विशिष्ट जागी असलेल्यांना दुर्लक्ष केल्यास अनुभव येतो, हे सत्य आहे. सर्व ग्रह ( मत) समज) पूर्वग्रहदूषित नसावे. 

         असो. उद्या बुधवार विषयी जाणून घेऊ.  त्याचे नाव- धौम्य या विषयी माहिती तर मनोरंजक अाहे. तर उद्या भेटायला विसरू नका. मंगळवारची ही एक गंमत सांगणार आहे. ही वरील अंधश्रध्दा ठरवणार्‍या, आपल्या समाजाची एक अंधश्रध्दा सांगणार आहे तर भेटू या, उद्या.🌍🌏🌎

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू