गुरू व शुक्र- जीवनातील 🕯🕯🕯🕯🕯.

१८. ६ .२१ .शुक्रवार जेष्ठ शु.  अष्टमी दुर्गाष्टमी

 आज आपण गुरुवार व शुक्रवार दोन्हीविषयी जाणून घेणार आहोत.  तसे पाहिले तर दोन्ही मार्गदर्शक. एकप्रकारे जीवनात, "प्राण" आणणारे. 

  गुरू ग्रह मालिकेतील पाचवा ग्रह. आकाराने सर्वात मोठा. लहानाला बोलतात, लघु व मोठ्या बोलतात, गुरू म्हणजे समर्पक नाव. 

  गुरू म्हणजे शिक्षक अध्यापक , हे तर सर्वांनाच माहीत  आहे, पण हा शब्द कसा तयार झाला, ते पुढील श्लोकावरून समजते.

  गुकारास्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज  उच्यते।

  अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभीधीयते। ।

   अर्थ बघु या.   "गु" कार म्हणजे अंधार.

                      " रु" कार म्हणजे तेज. 

             जो अज्ञानरूपी अंधाराचा निरोध करून, ज्ञानाचा प्रकाश-तेज देऊन आपल्याला, प्रज्ञावान बनवतो. तो  गुरू होय. गुरू ग्रहाला  इंग्रजीत jupiter म्हणतात. त्याचा ही अर्थ तेजःपुंज असा आहे. मला सांगा, संस्कृत व ग्रीक   जगाच्या पाठीवर, लांब वेगवेगळ्या ठिकाणी संवर्धन झाल्या, मग ह्या दोन्ही संस्कृतीच्या विचारात साम्य कसे? विचाराचे आदानप्रदान कशा प्रकारे घडले असेल? वारांची नावे नेमकी क्रमवारच कशी? आता हे बघा, गुरूवारला इंग्रजी शब्द आहे- THURSDAY.  ही संज्ञा अालीय, एका जॅमनिक ( युरोपियन पुरातन संस्कृती) दंतकथेतून. थोअर या शब्दावरून - म्हणजे थोर😆 .ही कथा गुरू- शिक्षकांशी संबंधित आहे. पाहिलात चमत्कार. वरवर वेगळे शब्द दिसले तरी अर्थ एकच. म्हणजे गुरूवारचा  बेत style मध्ये Thursrday's programme म्हटले तरी मूळ तेच 😁.

               अाता वळू  या.  शुक्रवारकडे. आजचा दिवस. तुम्ही म्हणाल हा देवीचा वार. संपूर्ण भारतभर, हा शुक्रवार वेगवेगळ्या देवीच्या उपासनेचा मानला जातो. तिला प्रसन्न करण्याच्या अनेक पध्दती नेमून दिल्या आहेत. पण एक ध्यानात बाळगा. देवी मग कोठचीही असो. ती निर्मितीची प्रतिक असते.  आपले जन्मदाते मातापिता व आपल्याला घडवणारी संपूर्ण दुनिया तिचेच रूप आहे.  आता शुक्र ग्रहाचे नाव बघा. इंग्रजी नाव VENUS - goddess of love. प्रेमाची परिणती विवाहात होणे, अावश्यक व योग्य आहे नं? मग येतो पत्रिकेतील उल्लेख. त्याच्या/ तिच्या पत्रिकेत शुक्रबळ कमी पडतेय! मग ही काय भानगड आहे बरे.  दोन जीवांना एकत्र आणतो, हा अापला शुक्र म्हणजे venus 😬

   दुसरा अर्थ तो तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. तेज रात्रीत झगमगणारा तारा.  मी बोलते म्हणून, खटकेल. पण गृहलक्ष्मीला,स्वतःच्या तेजाने- पराक्रमाने , अाज चांगल्या पध्दतीने अर्थप्राप्ती  करून व सर्वार्थाने सुखी समाधानी  करणे, हीच शुक्राची कामगिरी. ही शुक्राची चांदणी ही तेजस्वी असते. हे महिलांनी ध्यानात ठेवावे. in return  वर्तनाने सिध्द करावे.

    साध्या  डोळयांनी ही  शुक्र रात्री सहज दिसतो, म्हणजे प्रकर्षाने चमचम करतो. संस्कृत शुक म्हणजे झगमगणारा. इंग्रजीत अर्थ gaudy. आपण या अर्थीहा शब्द कित्येकदा वापरतो. उदा. The people from circus always wear gaudy clothes. 

     चमचमणारे just like VENUS . जणू शुक्राची चांदणी. आपण सर्व ही आपापल्या क्षेत्रात, जणू शुक्राच्या चांदणीप्रमाणे चमकण्याची अास, "ध्यानी मनी" बाळगू या

      त्यासाठी ही तेजाची ज्योत, सर्वदूर नेण्याकरिता मला हातभार लावाल नं? I am  confidant in you, my dear readers. तो फिर ज्योतसे ज्योत लगाते चलो। ज्ञानकी गंगा बहाते चलो।

      👫👬👭👫👬👭👫👫👬👫👫👬👭👭.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू