शनिवारची आगळी कहाणी- आजच्या परिस्थितीशी साम्य धर्म राखणारी😂
१९. ६ .२१. जेष्ठ शनिवार- मंदवार. नवमी.
सात वारांतील शेवटचा. याला पुराणात मंदवार म्हणत. मंद म्हणजे संथ. english मध्ये मंद = slow. अर्थ- गतीने जरा कमी. पण मराठीत slow= हळू संथ व मंद. पण प्रत्येक वेळी संथ व मंद शब्द नकारात्मक नसतो. गुणदर्शक असू शकतो. नाहीतर' "मंदा" हे नाव कोणी ठरवले असते का?
मंदाकिनी एक नदी आहे. जी संथ वहाते. तिला सहसा पूर येत नाही किंवा कधी कोणी, प्रवाहात जोर नसल्याने वाहून जात नाही. आता शनिवारचा, पूर्वी उल्लेख मंदवार का करत, समजते. त्या शनि ग्रहाची कक्षेत गती इतर ग्रहांच्या मानात हळूहळू आहे. जेव्हा एखाद्या महान व विख्यात व्यक्तीचा पुत्र कामयाबीत कमी पडतो, *( see note written down), तेव्हा त्याला " सुर्यापोटी शनेश्वर!" म्हटले जाते. याचा प्रत्यय येतच आहे. पण आळीमिळी चूप, हे धोरण ठेवणे, शहाणपणाचे होय.
आता शनिची देवळे असतात. मालाडला, भाईंदरला व भायखळ्याला आहेत. पण ही त्याची भक्ति करायची नसते. तर शांति करायची असते. त्याला समोरून नमस्कार करू नये. कारण त्याची नजर आपल्यावर पडू नये,म्हणून काळजी घ्यावयाची असते. एक प्रकारे हा ग्रह आपले नशीब - भाग्य फळफळून देत नाही, म्हणून वेगवान पवननपु्त्र हनुमानाची , या दिवशी भक्ति करावयाची असते.
हनुमान चालिसा वा मारूतीस्त्रोत्र म्हणून शनि बंधन दूर करता येते. शनिच्या नजरेमुळे, जी प्रगती खुंटली जाते, तिला रामभक्त हनुमानच, गति देऊ शकतो.
आता हे बघा, या शनीला व मारुतीलाच फक्त तेल घालतात. इतर देवांना नाही. का बरे? simple thing तेल हे वंगण असते. ज्याची हालचाल खुंटलेय, अशा यंत्राला वंगण घालतात, हो नं? तसेच गति वाढवायलाही हाच उपाय असतो.
आपण पूर्वी पाहीले, सोमवारप्रमाणे, या वारीही पचनसंस्था संथ/ मंद होत असते.त्यामुळे पचायला जड असलेले चणे हरभरे खाऊ नयेत, असे सांगतात. बघा प्रयोग करून.
आज दिवसा जऊळ( अंधार आला) तर आपण पटकन लाईट लावतो. पूर्वी ही सोय नव्हती. दिवसा, दिवे जाळणे,परवडण्यासारखे नव्हते. चूल ही, इतर दिवसांच्या मानाने, शनिवारी पेटायला वेळ घेई. करून बघा. शनिवारी देवासमोर, दिवा लावताना ,जास्त काड्या जळतात. असो. त्यामुळे या दिवशी काही नियम पाळावे लागतात. ह्या दिवशी केस वा नख कापू नयेत. दाढी करू नये. कारण पूर्वी स्पष्ट उजेडा अभावी, कापून जखम होण्याची शक्यता असे.
आता थोडे आजच्या काळात येऊ. ४.५ वर्षापूर्वी एक चळवळ झाली. शनिशनेश्वराच्या ठिकाणी, महिलांना प्रवेश नाही. कार्तिकेय, गणेशाच्या वडिल बंधुच्या मंदिरात ही मना अाहे. एक तृप्ती देसाई नामक सुधारक या विरोधात उभी राहिली. ""का म्हणून? आम्ही जाणार. """ काही महिला ही बरोबरीने मोर्चा काढून निघाल्या, वीरबालिका होऊन. पण एक विचारते, शनि व कार्तिकस्वामींना स्त्री सहवास नको आहे, तर जबरदस्ती का? जर यातील कोणी महिला, काही कारणाने विवाह करू इच्छित नसतील व जबरदस्ती झाली तर? असो. मूळ मुद्दा संपूर्ण जगतात, सर्व खंडात ग्रह व वार कसे नेमके क्रमवार ठरले व सात ग्रहावरूनच वार ठरले? तेव्हा संपर्काची साधने नसताना? या चमत्काराला अंधश्रध्दा म्हणाल का?😂 मग विश्वास ठेवा. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानभंडारावर. अन् समृध्द व्हा. मी आहेच मदतीला. दररोज रतीब घालतेय. रतीब म्हणजे नियमित एखादा पुरवठा करणे. उदा. दूध.
• मला काय व कोणा बद्दल लिहावयाचे आहे, ते कळलेच, असेल सुज्ञास अधिक सांगणे, नलगे. पण त्यापायी आपल्या जीवनाशी खिलवाड होतेय. जास्त स्पष्ट लिहिणे, टाळलेय व decent भाषा वापरलेय. नाहीतर पटले, तरी भयापोटी माझा blog वाचणे, सोडाल. तसे होणार नाही नं😇🤔
•
तर तयार आहात नं, हे माहितीरूपी दूध पिण्यासाठी. गरम करायला नको कि, की हा अक्षय प्याला रिक्त होणार नाही. तर भेटणार ना, मला दर दिवशी. वाट पाहतेय हं, ही दैनंदिनी घेऊन.📕.
Comments
Post a Comment