छत्रपती शाहूंची राजकिय कारकिर्द व त्याची पाळेमुळे.
३ .६ २१ .
छत्रपती शाहूंची राजकिय कारकिर्द व त्याची पाळेमुळे.
बालशाहूंचे जन्मापासूनचे जीवन युवराजांचे होते.पण ऐयाशी नव्हते. शिस्तप्रिय आई व स्वराज्यासाठी लढणारे पिता कि, ज्यांना बाह्य गनिमासोबत, स्वकिय फितुरी ला तोंड द्यावे लागत होते. तसे तर युध्द परिस्थितिमुळे, पित्याचा सहवास मिळत नव्हता. पण त्यांची धर्मपरायण वृती पराक्रम याची जाणिव होतच होती.
तेव्हा छ.शाहूराजे, अभ्यासावयाचे असले तर, त्यांना घडविणार्या मातापिताचे सहजीवन समजून घेणे, आवश्यक आहे. हो. छ.संभाजी राजेंची आपल्या, पत्नीला मृत्युनंतर ही साथ होती. कशी तर त्या कठीण काळात, त्या पतीच्या ( ८.९ व्या वर्षी विवाह- एकत्र शिक्षण ग्रंथ व राजनीति तसेच युध्दकला) या आठवणीवर, योग्य निर्णय घेऊ शकल्या. छ.संभाजीराजेंनी राज्याभिषेकाच्या दिवशीच राज्ञी येसुबाईंच्या नावे, " श्री सखी राज्ञी जयती " हा शिक्का करून सभेत,बहाल केला होता. व मुलकी अधिकार दिले होते.
जरा आपण पुन्हा, अाजच्या काळात येऊ या. आज कित्येक कमवणार्या व उच्च अधिकारी पदावर असणार्या महिला, छोट्या छोट्या बाबतीत, नवर्यावर विसंबून असतात. व वयाच्या ६०. ७० वर्षी ही, पतिनिधनानंतर, पैसा इस्टेट व विमा काही माहीत नसते. ती चूक सर्वस्वी तिची नसते. ते योग्य वयात स्वातंत्र नसते. स्वतंत्र व स्वातंत्र यात महद् अंतर आहे.
असो. आता जरा त्या दोघांचे सहजीवन पाहू या. rather study करू या. त्यांच्या जीवनातील घडामोडींचा आढावा घेऊ या.
इतर इतिहासकारांच्या हातून, काहीसा हा प्रमाद घडला आहे. येसुबाईंचे स्वतंत्र चरित्र लिहिलेच गेले नाही. अशी ही कर्तृत्ववान राज्ञी आदर्श पत्नी व दक्ष माता, सर्व काळात व सर्व जगात श्रेष्ठ व वंदनिय आहे. येसुबाईंनी जी परिस्थिती व संकटे झेलली, ती, "न भुतो न भविष्यति," होती. दुदैवाने , त्यांच्या बाबतीत समकालीन लेखन झालेच नाही.
छत्रपती संभाजींचा वध, औरंगजेबाने केला, हे सत्य जरी सर्व मानत असले, तरी त्यांच्या धर्मनिष्ठतेला व निग्रहाला, स्वातंत्रोत्तर काळात, योग्य प्रकारे न्याय दिला नाही, हे सत्यच आहे. का त्यांच्या या वधाला, अभ्यासक्रमात, अग्रस्थान दिले नाही. आज औरंगाबादचे नाव बदलून, , "संभाजीनगर" नाव ठेवण्यास, आपलीच मराठी " सज्जन?" विरोधात ठाकले आहेत. जिवंतपणी , आपल्या दोन विभुतींना, परकिय सत्तेकडून छळ सोसावा लागला त्यांनी धैर्याने व शौर्याने, तोंड दिले. पण आपल्याच या स्वकिय सत्तेने, त्यांच्या पराक्रमाची हेळसांड केली. दुसरे कोण ते ओळखले असेलच व शिवप्रभुंचे नाव सांगणार्या, कित्येकांना, हा समग्र सविस्तर ," इतिहास"जाणून घेण्यात हंशील नाही व नसतो. फक्त देशासाठी जीव गहाण ठेवणारे, त्यांच्या लेखी चुकीचे धोरण राबवणारे, असतात.असो.
ज्याप्रकारे, छ.संभाजीची जोपासना झाली, त्यानुसार त्यांचे व्यक्तिमत्व घडले. तर त्यांना रागीट म्हटले गेले. त्यांना परिस्थितीनुसार निर्णय घेणे भाग होते. पण त्यांच्या पित्याने स्वराज्यरक्षणासाठी जे निर्णय घेतले. ज्यात या बालजीवाने, स्वतःला झोकले. अवघ्या ८व्या वर्षी. आग्राच्या प्रसंगी. ते कौतुकास्पद निश्चितच आहे.
उद्या या विषयी माहित करून घेऊ या.
याच बरोबर, आपल्या आजच्या पंतप्रधानांच्या काही निर्णयाचा लेखाजोखा पाहू. मला काही पक्ष व राज याविषयी माहित नाही, असे समजू नका. जरी फेसबुकवरील तरूणांना, मी म्हातारी, देवदेव करायचे सोडून, मिडियात कशाला तोंड घालते, असे वाटे. वयाचा मान न ठेवता, अक्कल शिकवत असत. तरी मी CAG च्या ऑफिसमधून निवृत्त झाले असल्यामुळे finance - PUC meetings- Constitution- funding-त्याचे distribution ह्याचे ज्ञान आहे. तेव्हा मी येथे जी माहिती देईन, ती निश्चितच सखोल असेल. तर viewers , खरेच ही देशाच्या योजना, आधार कार्ड नोटा बंदी, आणि हो मतदानातील, "नोटा" अधिकार हे सर्व जाणून घेण्यासाठी , हा माझा BLOG वाचा.परत परत भेटा व मुख्य म्हणजे, त्यावर विचार करा. FRIENDS शी चर्चा करा. त्यांना वाचक बनवा. Subscribe व्हा या विचारांशी.
Comments
Post a Comment