आज तीन तिथीचा मजेशीर संगम
२३. ६. २१ जेष्ठ शुक्लपक्ष. त्रिवेणी संगम+ तिथींचा.
आज गंमत पाहिलीत, आज २३ जूनला सकाळी थोडा वेळ त्रयोदशी दिवसभर चतुर्दशी व उत्तररात्री , पहाट होण्याच्या थोडे, आधी ३.३२ला पौर्णिमा. ही तर निसर्गाची लिला. तिथी ठरतात चंद्राच्या भ्रमणावर तर तारीख date ठरते, सुर्याच्या भोवती पृथ्वी फिरताना, स्वतःशीच गिरकी घेते, त्यामुळे. मग असा काही चमत्कार होतो.
सोमवारी २१ जूनला मी एक उल्लेख केला होता, आठवतोय. जर नसेल वा कोणाचा त्या दिवशीचा लेख वाचावयाचा, राहिला असेल, तर कृपया तो वाचावा. लेखात मी एका सद्य प्रसंगावरून, व्यासमुनी व नारदमुनींची आठवण केली होती. दोघांना, अनुक्रमे आद्य वक्ता व आद्य किर्तनाकार का संबोधले जाते, माहीत आहे. दोघेही ,I mean तिघेही विष्णु भक्त-नारदमुनी विष्णुभक्त सदैव, "नारायण नारायण" , हा जप. अन् विष्णु पुराण व स्वर्ग प्राप्तीसाठी भक्तीचे विधी या बाबत लोकांच्यात जागृतीकारणे, सर्वत्र संचार करून, प्रचार करणे, म्हणजेच किर्तन करणे. म्हणून ते , " आद्यकिर्तनकार. रामायण घडले. तर वाल्मिकी मुनींनी ते महाकाव्य रचले. ती रचना त्यांनी स्वः हस्ताने लिहिली. म्हणून ते आद्यकवी.
अन् " महाभारत कर्ते , व्यास मुनी, त्यांच्या नावाने रंगभूमीचा व वक्त्यांंच्या जागेला संबोधले जाते.
"व्यासपीठ." विद्यापीठ, तसेच व्यासपीठ.
श्रीकृष्णाने विष्णुच्या आठव्या अवताराने, व्यास मुनींना, महाभारत रचण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. पण अट घातली, " मी ते ओघवत्या शैलीत सांगेन, पण मला, कोणीतरी लेखनिक हवा. जो त्याच ओघात लिहील. मी थांबणार नाही. पुनः उच्चार करणार नाही. अर्थात् असा लेखनिक, एकच होता- श्री गणेश. या पध्दतीने, " महाभारत रचले. म्हणून तर आद्य वक्ता.
हे सगळे मी सांगत आहे, कारण कोणीही बालक-पालक- शिक्षक वा भाषणकर्ता वा निवेदक व्यासपीठावर येतो, तेव्हा त्याने, ध्यानीमनी, निमित्त फक्त, प्रबोधन व सत्य निवेदनाचेच ठेवावे. भाषेचा दर्जा उच्च व सभ्य ठेवावा. नाहीतर या तिन्ही आद्य मुनींचा उपमर्द होऊ शकतो. म्हणून सर्व नेते व अभिनेते नाट्यलेखक व सर्व व्यासपीठाशी संबंधित यच्चयावत् मंडळींना 🙏 हात जोडून विनंती, नटराज व या तीन विभुतींचा मान राखा. हो, हे digital व्यासपीठालाही लागू आहे. फेसबुक व्हॉटस् अप वगैरे वगैरे. फेसबुकवर जे काही लिखाण दिसून येते, त्याचा दर्जा काय बोलायचा. ती पण एकप्रकारे व्यासपीठाची, "तोहीमच" ठरते. हे मान्य कि, सत्य निवेदन करण्यासाठीच व्यासपीठ असते. पण ते खरे सिध्द करणे, सहज शक्य असावे. पण सांगावे , कसे तर suger coated रीतीने.
आता जरा फेसबुककडे वळू या. तेथे कधी कधी वाटते, बरेच a/c fake आहेत. paid आहेत. जर आपण विशिष्ट व्यक्तिंचे व त्यांच्या कार्याचे कौतुक केले, तर लगेच आपण अंधभक्त ठरतो. असो. मी तर फेसबुकच सध्या सोडले आहे, पण एक screem shot काढून ठेवलाय. मुलीच्या नावाचा a/c आहे. एका महान मराठी ऐतिहासिक व्यक्तीला, अाईवरून ( ज्या आपल्या सर्वांचे दैवत आहेत) शिवी दिली आहे. मग अाजच्या महान नागरिकांच्या नजरेतून हे कसे निसटले बरे? असो. मी माझे जनजागृतीचे काम चालू ठेवत आहे. पहाट झाली आहेच. वाचकांच्या वाढत्या संख्ये वरून सिध्द होत आहेच. तर ही माझी रोजनिशी ( स्वगत) वाचणार नं, नियमित? निदान सत्य विचार व आचार व त्याचे भलेपण व फोलपण समजून घ्या. बस. आजचा तीन तिथींचा संगम असलेल्या दिनी, सर्वत्र उजाडू देत, परमेश्वरा, नटराजा, जनताजनार्दना!🙏🙏🙏.
Comments
Post a Comment