आपले हित, आपल्या हातात. नाही कोणा नेत्याच्या हातात.

 २४. ६ .२१ गुरूवार जेष्ठ पोर्णिमा- वडपोर्णिमा. 

 काल मी फेसबुकवरील एका पोस्ट बद्दल लिहिले, तेव्हा deeply वाचणार्‍या वाचकांना वाटले असेल, मी spelling mistake केली. screen shot  च्या ऐवजी screem shot लिहिले. नाही हं. Actually मी मुद्दामच तसेच  लिहिलेय. सांगते का ते! ती पोस्ट इतकी DAUNTING भयावह आहे कि, तो नुसता screen shot नाही. त्या विरोधात  SCREAM  =आक्रोश करणे, जरूरी आहे. मग मी ते दोन्ही शब्द एकरूप केले. screen + scream = screem. अहो, शब्दांचे बादशहा, असा ज्या professionचा उल्लेख केला जातो., ती मंडळी भाषेला twist करून, जो english शब्द निरागस बालकासाठी योजला जातो naughty,  अापल्या भाषेतील अव्वल शिवीचा ( हरामखोर)  प्रतिशब्द आहे, असे ठाम सांगतात.

  मग मी माझा आक्रोश का प्रगट करू नये. मी ती post इथे देणार आहे. पण आजच्या शुभदिनी नको.

  असो. आता आपण आजच्या सणाचा विचार करू या. हो. हे वडपोर्णिमेचे व्रत असले तरी हा एक सण - सोहळाच आहे. आज हिंदु महिला उपास करतात व  वडाच्या झाडाची पूजा करतात. नुसतेच हात जोडून परत येत नाहीत, तर प्रदक्षिणा घालतात. त्या साठी एक विशिष्ट लांबीचा दोर मिळतो. तो घेऊन  त्याचे टोक वडाच्या बुंध्याला बांधावयाचे व तो संपेपर्यंत वडाभोवती फेरे घ्यावयाचे. नेमके असेच का, तर प्रत्येक स्त्रीने,आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे करावयाचे असते. म्हणजे जिला सासरी कितीही छळ/ बंधने असली तरी सासरची मंडळी ह्या व्रतासाठी प्रतिबंध करणार नाहीत. मोकळीक देतील. आता या मागील इंगीत ( गुपित) काय आहे, ते बघू. तुम्हाला  विश्वास बसणार नाही , पण ह्याला फार मोठे शास्त्रीय अाधार आहे. व आपल्या पूर्वजांनी घेतलेली स्त्रीजातीची काळजी आहे. कसे ते बघा. वड व पिंपळ हे असे वृक्ष आहेत कि, ते दिवसाचे २४ तास प्राणवायु उत्सर्जित करतात. म्हणजे हवेत सोडतात. आणखीन् एक निसर्गातील सत्य म्हणजे जेष्ट प्रारंभी मृगाचा पाऊस पडतो. तो  मृगा( हरीणा) प्रमाणे येतो व जातो. नुसता शिडकावा. पण या पोर्णिमेच्या सुमारास हस्तीचा पाऊस सुरू होतो. म्हणजे जणू हत्तीच्या सोंडेतून बरसतो. हजारो वर्षे चालत आले आहे, हे चक्र. बायकांना ह्या हजारो वर्षात चुली पेटवाव्या लागत. आत्ताच स्टोव्ह व नंतर गॅस आला. तेव्हा या पावसामुळे सरपण- लाकडे ओलीच मिळत. ती फुंकून जाळ करावा लागत असे. ते काम बायकांचेच असल्याने, या व्रताकारणे, त्यांना १०८ फेर्‍यात ओझोन - प्राणवायू मिळत असे. आणि त्याला नवर्‍याचे हित बांधून दिलेले असल्याने कोणालाही यापासून अटकाव होत नसे. पण हां, आजच्या गॅसच्या जमान्यात या व्रताची शहरात गरज नव्हती. 

  आता या संबंधी एक गोष्टीचा नीट विचार करा.आपल्या माननिय पंतप्रधान मोदींजीनी गावोगाव गॅस उपलब्ध केला, तर कौतुक करावयाचे सोडून, आपल्या स्वार्थासाठी " ते" नेते मंडळी , आमच्यासारख्या विचारी लोकांना अंधभक्त म्हणविण्यास, पोराटोरांना उपसत आहेत.  

      आता आपल्या पूर्वापार समजूतींचा व भाषेचा आढावा घेऊ.  Oxigen या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही. पण प्राणवायु या संस्कृतवरून आलेल्या शब्दाचा अर्थ बच्चे कंपनी ही सांगेल. प्राण जगवणयासाठी जरूरी असलेला हवेतील( वायु) तील घटक.  म्हणून जीव तोडून सांगतेय, आपल्या प्रचलित समजूती व प्रथा जाणून घ्या. त्यात खोलवरचा अर्थ दडलेला  आहेच, यावर विश्वास ठेवा. श्रध्दा ठेवा. फालतू म्हणून सोडून देऊ नका.

      आता आजच्या जमान्यात, प्राणवायुसाठी वृक्षांजवळ धाव घ्यायची जरूर नाही. पण त्यांच्या फांद्या तोडून घरी आणून, त्या मृत डहाळ्यापासून काय मिळणार बरे? तेव्हा या कत्तलीच्या विरोधात मोर्चे काढा.  आरक्षणासाठी नको. अाजतक महलोमें रहने वाले, इन लोगोंको, तुम्हारी फिकीर नही थी। तो आजही क्यों, सोचो, जानो, और खूदकी चिंता करो। मी तुमचा, ज्ञानाचा पेला  भरला अाहे. तो पिण्याचे व अंगी लावण्याचे काम तुमचे. हे तुमच्या हितासाठी आहे हो.

      तर  उद्या येणार नं? वाचणार नं  हा सुधारस.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू