मुंबईनगरी बडी बाका. तुमचे भविष्य तुम्हीच शोधा.
२५. ६ .२१ . गु्रूवार जेष्ठ कृष्णपक्ष. प्रतिपदा.
पुनवेचे पर्व काल झाला. वडाच्या फांद्याची कत्तल झाली. आज जिथे तिथे कचर्यात सुकलेल्या वडाच्या पानाचा ढीग दिसतोय. हे काय हो. जर व्रताचा मतितार्थ, सुज्ञांनी समजून घेतला असता, आज तोच पर्णसंभाार आजही दिमाखाने वृक्षावर डोलला असता. असो. आज मी मुंबईची ओळख करून देणार आहे. जे वाचक मुंबईकर आहेत, ते म्हणतीत, त्यात तुम्ही काय ओळख करून देणार, आम्ही तर इथेच राहतो नं!
इतिहासाशी बहुदा, सर्वांनी, शालेय जीवनानंतर काडीमोड घेतला असतो. कधी मुंबईचा इति+ हास जाणून घेतलात का? मुंबई ही सात बेटांचा समुह होता., हे शाळेत नकाशासह शिकलो आपण. पण ही अशी एकसंघ मुंबई कशी बनली. कोणी बनवली? माहित आहे का? अगदी आमच्या लहानपणी मालाड वगैरे- बापरे किती लांब मानले जाई. ठाण्याला तर. एक गंमत सांगते. माझे वांद्रेला आजोळ. कांतामावशीचे लग्न जमले. १९५५मध्ये. बाकी सगळे छान असून एवढे लांब कां जावयाचे, अरे देवा! असे तिच्या मनात आले.
तर सांगायचा मुद्दा कि, हे सर्व आता मुंबईतच मानले जाते. मुंबई पसरत गेली. western& central ला. नंतर नवी मुंबई बनली. तिला हे अभिनाम मिळाले.नवी मुंबई. म्हणून काही आपली मूळची मुंबई, " जुनी मुंबई" झाली नाही. 😀. आता तेथे ही स्वतंत्र विमानतळ झालाय. अर्थात प्रकल्पग्रस्तांसाठी धडपडलेल्या व त्यांचे पुनर्वसन होण्यासाठी जीव टाकण्यार्या विभूतींचे कृतज्ञ असणार्याची इच्छा कि त्यांचे नाव ( श्री.दि. बा. पाटील) त्या विमानतळाला द्यावे. त्या भावनेची कदर करावयास हरकत नसावी. असो.
आपला मूळ विषय- मुंबापुरीची जन्मकथा व तिचे नामकरण. मुंबादेवीचे देऊळ पाहिलेत, कधी? आगरी लोकांची देवी. तसे तर तेच मूळ रहिवासी. त्यावरून तीज वरून ही नगरी झाली मुंबई.
तुम्हाला माहित अाहे का? मुंबई मूळ पोर्तुगीजांनी काबीज केली. पण तिचे बकाल रूप बहुदा त्यांना पसंत पडले नाही. गोवा दीव दमण त्यांनी स्वतःकडे ठेवले. अन् मुंबई आपल्या राजकन्येच्या लग्नात, इंग्लडच्या राजपुत्राला आंदण दिली. पण त्याने व ब्रिटीश राजवटीने ती, त्या स्वरूपात ताब्यात घेतली. आपल्या सासरच्या मंडळींप्रमाणे दुल्हनचा छळ केला नाही. 😀 उलट तिला सोन्याची लंका बनवली. त्यांना साथ दिली , पारशी गुजराथी मारवाडी, धनिकांनी. हां आपल्यापैकी जगन्नाथ शंकरशेट , रामा कामत मंडळी होती, म्हणा. आपण मुंबई आमची म्हणतो. पण हा इतिहास जाणून घ्यावयाची तकलिफ घेतोय का?
आज मुंबईत अन्य परिजन खोर्याने पैसा कमावतात. हां, मग त्यामागे त्यांची ढोर मेहनत का बघत नाही? त्यांना सहजी हा मार्ग सापडतो. मग आपलीच मुले त्या व्यवसायिकाकडे, नोकर्या मागत, आयुष्य का फुकट घालवत आहेत. एक उदाहरण सांगते. मालाडला artificial jwelleryचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. शेट आहेत, सर्व मारवाडी- क्वचित गुजराथी अन् कामे करणारे /र्या सर्व मराठी व विकत घेऊन वापरणारे आपणच. ४०.५० वर्षे चालत आलेय. पण मराठी लोक धंद्यात उतरण्यास तयार नाहीत. अगदी पैसा पुरवला तरी. घरबसल्या काम मिळते, ते किती बरे म्हणे. पण यातली गोम म्हणजे- कारखाना नसल्याने, तो खर्च नाही. नेमके किती कामगार आहेत माहीत नाही Thats why , no PF, no medical& no travelling. ते लाखोने कमावत आहेत. का तर आपल्याला हिंमत नाही. जबाबदारी घ्यायची तयारी नाही. फक्त मुंबई अामची म्हणतो, आपण. पण नोकर्या करून नगरी निर्माण होत नसते. तसेच पूर्वी ब्रिटीशांनी सात दलदलीयुक्त बेटांतून ही अवाढव्य नगरी उभी केलेय ती कशी, त्याचा अभ्यास करावयाला हवा.
आता हे बघा.
देहींच देव असतां कारे भ्रमतोसि व्यर्थ रानी।
नाभीत गंध असता कस्तुरीमृग जेवि हिंडतो रानी ।।
हया काव्याचा भावार्थ समजून घ्या. ही मुंबईनगरी आहे. आपण कस्तुरीमृग आहोत. हा एक जातीचा मृग- हरीण असतो. त्याच्या नाभीत- बेंबीत सुगंधी कस्तुरी असते. पण त्या वासाचे मूळ आपल्यातच आहे, त्याला कळतच नाही. तो इतरस्त्र शोधत फिरतो. अापल्या मुलांचे असेच झालेत. आपल्या आत्मशक्ती- क्षमता आहे. ती आकलन करतच नाहीत. इतरांकडे नोकर्या मागत - आरक्षण- आय़ुष्याचा वेळ फुकट घालवत आहेत. दहीहंडीच्या मनोर्याची प्रॅक्टिस व गणेशोत्सवाचे ढमढम साठी जो सराव करत आहेत. ते दिवस व त्यासाठी नंतर मिळणारा मेहताना ह्याची सांगड घाला. व दिवसाचे किती मिळाले ते गणित मांडणे जरूर आहे. समजा. आरक्षणासाठी अाज जो वेळ फुकट घालवतात, ते मिळेल, तेव्हा त्यातूनही, तुम्ही Agebar झाला असाल. सोचो सोचो. व आपल्यातील जेष्ट मंडळी ही, निदान एका तरी मुलाला track - पटरीवर आणण्याचे पुण्यकर्म करा हो. बस. वाचा व काहीतरी करा. मग मी भरून पावले.🙏.
Comments
Post a Comment