खरे शिक्षण व आजचे शिक्षण.

 ४ .६ .२१ . छत्रपती शाहूंच्या माता व पित्यांचे जीवन. 

         स्वागत आहे, तुम्हा चौकस वाचकांचे , या माझ्या Blog मध्ये. इतिहासाकडे बघण्याच्या, माझ्या दृष्टीकोनाकडे, तुम्ही  interest घेऊन व कुतुहलाने, ओढ घेत आहात, याचे समाधान वाटले. 

        इतिहास फक्त शालेय जीवनातच, लावलेल्या क्रमिक पुस्तकापुरताच नसतो, हो. काल मी सांगितले, त्याप्रमाणे, आपल्याला खरा इति+ हास  शिकवलाच नाही. तो आज ही  अभ्यासक्रमात नाही.  त्याऐवजी इंग्रजी माध्यम म्हणून, परदेशी लेखकांच्या, कादंबरीतील भाग, प्रायमरीत शिकवला जातो. 

        आता प्रथम आपण, आपल्या स्वधर्मरक्षणासाठी, म्हणजे आपल्यासाठी जो अनोखा त्याग- sacrifice   आपल्या छ. शिवरायांनी केला. त्याला शंभूराजेंनी अवघ्या ८ .९ व्या वर्षी साथ दिली, त्या घटनेचे अध्ययन करू या.  हो. अभ्यासच. सगळ्यांना, आग्राहून सुटका  ही कहाणी माहित आहेच. पण त्याकडे कहाणी म्हणूनच  पाहिलेत. मिठाईच्या पेटार्‍यातून,  दोघांनी बादशहाच्या हातावर तुरी  दिली. बस. त्या नंतर अाग्रा ते  पुणे कसे आले हा प्रवास पालखीतून वा घोड्यावरून नव्हे तर, एक नक्की  बादशहा , शिवाजीराजेंचा शोध घेताना, बरोबर आठ वर्षीय मुलगा असणार हेच गृहित धरणार. म्हणून त्यांनी, मन घट्ट करून, शंभू राजेंना, अगदी उलट्या दिशेला काशीला पाठवले. त्यासाठी विश्वासू ब्राह्मण परिवारावर भिस्त ठेवली. अन् स्वधर्मनिष्ठ असा चिमुरडा, पित्याच्या धोरणाला साथ देत त्या परिवारकडे गेला.  रस्त्यात मोगल सैन्याला तोंड देत,  त्याला काशीला सुरक्षित नेले. त्या कुलकर्णी कुंटुंबानी , शंभूराजांना, जिवापाड संभाळले. 

        पण आजची पिढी दुसर्‍या एका , " कुलकर्णी", साठी,  समस्त , " भटांचा राग करतेय",  फेसबुकमध्ये तर काय काय लिहितात . जरा हिंमत करून विचारते, राग नसावा. पण मग  छ. संभाजी राजाच्या वधाच्यावेळी हजर असलेली मराठेमंडळीना, काय म्हणाल?  ती छावणी होती.सर्व उघड. कोणा बंद खोलीत  "तो" जिवघेणा छळ झाला नव्हता नं?  असो. त्यावेळी ही काशीहून आलेल्या कवी कलश या  कनौजी ब्राह्मणाने साथ दिली होती. जे छ.शंभू राजांशी घडे, तेच ह्या कलुषाबरोबर घडले.डोळे फोडले,जीभ कापली,पण त्या भटाने मोगलाई स्विकारली नाही.  हे ऐतिहासिक सत्य जाणून घ्या. 

        हे लहान मुलांना कसे शिकवायचे, म्हणे तर ९ . १० वीत शिकवा. आता या उलट बघा. प्रायमरीत असलेला lesson.चार्लस् डिकन्स च्या कादंबरीतील- The Great Expectation तील. एक अनाथ मुलगा आपल्या पालकांच्या tombstone ( gravestone) जवळ बसला असतो. ( मुळात आपल्या हिंदू मुलांना " हा" प्रकार शिकवायचा कि,स्थापत्य कलेचा भाग म्हणून मंदिर दाखवायचे अं? असो. तो कायद्याचा भाग अाहे. आपण बोलणे, म्हणजे!

         तर तेथे एक  चोर येतो. त्याला धमकावतो. ,

          , "Keep still or, I'll cut your throat.

या शिवाय पुढे म्हणतो, 

   " or I'll have your heart and liver out

  मग आपले शिक्षण कोणत्या दिशेने चाललेय, ते बघा म्हणजे झाले.  म्हणून मी जीव तोडून सांगण्याचा प्रयास करते की, मालिका बघण्यापेक्षा , आपल्या मुलांना काय शिकावे लागतेय, त्याचा विचार करा.

  अहो, ती काश्मिरी चिमुरडी पंतप्रधानांना , शिक्षणविषयक लिहू शकते, मग अाता बोला! मी तर खुल्या मनाने, भीड न बाळगता लिहित आहे, तेव्हा please please please, वाचून मनन करा .चर्चा करा. विचार करा. आणि हे विचार सर्वदूर पसरविण्यात, मला साथ द्या. share the blog to your friends-  like & subscribe this blog.  Be with me and  give me inspiration to share my knowledge to you all.

https://www.lokmat.com/national/good-news-central-government-will-provide-rs-225-lakh-home-only-work-has-be-done-a301/

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू