५ ६ .२१ .इतिहासातील सत्य व लटके दिखावे.

 ५.६ .२१ . इतिहासातील सत्य व लटके दिखावे.


        हो, वाचक वर्ग हो, मी आता जे लिहीणार आहे, त्यातून खरे व खोटे  वेगळे करणार आहोत. कसे ते बघा.  शिवकाळात जे घडले ते सत्य मांडले आहे, पण त्याच बरोबर मिथ्य़ा( काल्पनिक कथा) पुढे आल्या. त्यामागे, सावत्र मातेचे, सोयराबाईंचे कटकारस्थान होते. स्वःपुत्राला राजा करावयाचे होते. ते एका विशिष्ट घटनेने सिध्द होते. जसे कैकयीचे कपट, भरताला अयोग्य भासले व त्यांने रामाच्या पादुका  ठेऊन, राज्य संभाळले. तोच कित्ता,छ. राजारामाचे गिरवला. ते सर्व आपण पाहाणार आहोतच. पण भविष्यकाळात ही, छ.शंभू राजेच्यावर आपल्याच महाराष्ट्र देशी अन्याय केला गेला.  त्यांच्या शौर्याच्या कथा  व त्यांच्या , औरंगजेबाने, केलेल्या क्रुर हालहालाच्या हत्येच्या, सत्य घटना, अभ्यासक्रमात नसो, पण निदान  दृश्य स्वरूपात, तरूण- पौढांना दाखवायला काय हरकत होती? पण नाही. विशिष्ट समाज दुखावला जाईल, म्हणून  कलेतुन ही दाखवले नाही. उलट स्वातंत्रोत्तर काळात एका प्रतिष्ठित  सिनेमंडळाकडून, दोन चित्रपट प्रदर्शित केले होते. या आपल्या मायभूमीत. ते सुध्दा काही  पुरावे नसताना. हा उद्योग का केला असेल बरे?  सत्य नाही सांगायचे तर नका सांगू, पण  हे असे धडधडीत व खोटे,  लांच्छन का त्या पराक्रमी व धर्म परायण - स्वधर्मरक्षणासाठी ( काल लिहिल्याप्रमाणे) हाल सोसणार्‍या महान विभूतींवर लावले. आज असे वाटते, कि~~ 

         त्या छ.शंभूंच्या जीवनावर काल्पनिक असे दोन चित्रपट  चित्रित केले, " मोहित्याची मंजुळा व थोरातांची कमळा," ह्या दोन्ही  व्यक्ती अस्थित्वातच नव्हत्या. मग त्याकाळी सरकार व सेन्सॉर बोर्ड काय करीत होते?   मी तेव्हा लहान होते पण त्याकाळातील तरूण व पौढ ,तथाकथित ," रसिकवर्ग," का असे, आपल्या छत्रपतींवरील सिनेमे बघत होते. नट नट्या काय फक्त मिळणार्‍या बिदागीसाठीच  काम करीत होते? देश  धर्मापाय़ी प्राण घेतले हाती, असे खंदे वीर,  स्वतंत्र काळात नव्हतेच का? 

         की सगळेच , "खंडूजी हेराची अवलाद होते. 

         हो,  खंडुजी कोण, ते सांगते, स्वकियाच्या फितुरीने व दगलबाजीमुळे, छत्रपती संभाजी राजे हे, मोगल शहजादे आझम व सरदार असदखान, ह्यांच्या ताब्यात आले. ती खबर बादशहांना सांगण्यासाठी, जो हरकारा पाठविला होता, त्याचे नांव, " खंडुजी," त्याने मोठ्या ऐटीने, औरंगजेबाला खबर दिली व खुशीने ५०० ची बक्षीसी घेतली.  आता एक सत्य सांगते, ते नीट वाचा. या आपल्या धर्मवीर व संस्कृत जाणकार छत्रपतींनी एक ग्रंथ लिहिला आहे., "बुधभुषण", तो वाचा आणि मग सांगा असले कृत्य हा  शिवाजीमहाराजांचा पुत्र करेल का? 

         या विरोधी आवाज उठवणे,जरूरी आहे नं! मी जाने २०च्या BLOG मध्ये, या ग्रंथाची ओळख करून दिली होती. ती वाचा मनन करा. पुढचे सांगायची गरज नाही. तुम्ही सुज्ञ आहात.   तो ब्लॉग  refer  करते. तोही मनःपूर्वक वाचा.

छत्रपती संभाजी कृत संस्कृत ग्रंथ= बुधभूषणशी,  आज मी आपल्याला, परिचय करून देणार आहे. 

त्यात दुसर्‍या अध्यायात, छ.शंभू राजे, अंतर्बाह्य राजनीति सांगत आहेत. खरे तर जिजाबाईंचा शंभूबाळ हे लिहित आहे. कारण हा ग्रंथ त्यांनी वयाच्या १५.१६ व्या वर्षी लिहिला आहे. प्रथम आपण मराठीत त्याचा अर्थ समजून घेऊ व नंतर संस्कृत  श्लोक पाहू. म्हणजे समजून, त्यांच्या शब्दातच आकलन करून घेऊ.

शंभुराजे ( इथे  छत्रपती असा उल्लेख केला नाही, कारण हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा शिवबाराजे ही प्रजेचेच राजे होते. पण छत्रपती झाले नव्हते.) लगेच काही मंडळी. असो.

 आता त्यांच्या बुधभूषण या संस्कृत  ग्रंथाकडे वळू.

      इथे त्यांनी राजनीतिच्या विषयावर भाष्य केले आहे.

      ते सांगतात की राजा कसा असावा.

      त्याला राजनीतिची पूर्ण जाण असावी. राजनीति विषयक ग्रंथाचा अभ्यास असावा. सद्य परिस्थितीची सामाजिक व आर्थिक समज असावी. बाह्य प्रदेशातून आलेल्या मंडळी बद्दल माहिती असावी व त्यांच्या हालचालीवर लक्ष असावे. त्यांच्या व्यापाराला परवानगी देताना दक्ष असावे.

      राजा नम्र असावा. त्याचे कार्य व वर्तन सज्जनांना आवडणारे असावे. राजा बुध्दिवान असावाच, पण त्यासोबत त्या बुध्दीचा स्वतंत्रपणे सदुपयोग करणारा असावा.

      तो सावध व दक्ष असावा. तसेच सरळ मनाचा, क्षमाशील व धर्मात्मा असावा. त्याच्या मनात द्वेष मत्सराला थारा नसावा. प्रजेकडून त्याने कर ही अल्प प्रमाणात घ्यावा. म्हणजे प्रजेला कर डोईजड न व्हावा. उत्पन्नाच्या प्रमाणात सर्व समान असावा. राज्य शास्त्रातील षट् गुण जाणकार असावा. त्याने गुणाची कदर करावी. त्याने यानाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे .यान म्हणजे गमन आगमन - दळणवळण. शत्रुशी द्वैधिभाव राखणे गरजेचे अाहे --- प्रजेपेक्षा वेगळपणा. जेतेपणा. म्हणजे त्यांना स्वप्रजेच्या बरोबरीने अधिकार न देणे. संश्रय-- कोठे जबरी करावी व कोठे नरमाई याबाबत योग्य निर्णय घेणारा असावा.

      बलशाली व सतत उत्साही प्रसन्नमुख. ( हसतमुख  नव्हे)असावा.

   धैर्यशाली, दुसर्‍याची मर्म व वर्म जाणणारा, निर्व्यसनी  असावा. मुख्य म्हणजे " आ बैल मुझे मार" या प्रकारातला नसावा. उत्कर्ष व अपकर्षातील बदल समजणारा असावा .

   उपकाराची जाणिव ठेवणारा असावा. तसेच वृध्दाबद्दल आदर व सेवा भाव बाळगणारा असावा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू