आठवडा=फक्त सात दिवसाचा😁.
२०.६ .२१ . रविवार जेष्ठ शु. दशमी.
गेल्या आठवड्यात, आपण सात वारांची मराठी नावे व पाश्चिमात्य वापरत असलेली त्यांची नावे, ह्यांची तुलना केली व कमालीचे साधर्म्य जाणवले. हजारो वर्षापूर्वी हजारो योजने दूर वसलेले हे लोक, आकाशातील कित्येक अब्ज योजने दूर असलेल्या ग्रहावर आधारित दिवसांचे साम्य नामकरण करतात. हा खरेच चमत्कार आहे नं? तेव्हा या आपल्या पृथ्वीतलावरील सर्व पुर्वजांच्या ज्ञानावर, श्रध्दा ठेवायला काय हरकत आहे. तर माझ्या जिज्ञासू वाचकवृंदानो, या सर्वांना मनःपूर्वक वंदन करणार ना, माझ्या समवेत.
आता गंमत बघा, लेखाच्या सुरूवातीस, मी एक शब्द वापरला.- आठवडा- अहो, सात दिवसांचा हा समुह आठवडा(८) का बरे संबोधला जात असेल ? तोच तर प्रश्न मला ९.१० वर्षाची असताना पडला अन् मी सगळ्याचे डोके खाल्ले. माझी एक सवय होती, आजीचा ( सर्व तिला काकी म्हणत) पदर धरून, देवळात प्रवचन- किर्तनाला जाणे. तेथे किर्तनाकारांनी , काही शंका असल्यास विचारा, सांगितले. विषयाशी काही संबंध नव्हता, पण मनात खदखदणारी शंका विचारलीच, " आठवडा सात दिवसांचा असतो,मग तो सातवडा का नाही?", त्यांनी बरेच समजून सांगितले. त्या वयात नीट कळले नाही.पण ती माहीती मेंदूत कोठेतरी रूतून बसली. जसजशी मोठी झाले, तसतसे हे आठवत गेले. "आठवणी" वरून हे आठवले.
हां, आपले मराठी महिने मूळतः दोन पक्षात विभागले आहेत. पहिला, " शुक्ल पक्ष- अमावस्ये नंतर प्रतिपदा ते -पौर्णमा व दुसरा कृष्ण पक्ष - पौर्णिमेनंतर प्रतिपदा ते अमावस्या. १५- १५ दिवस. त्यांचे पुन्हा दोन भागात विभाजन झाले. पहिला भाग - प्रतिपदा ते अष्टमी- अष्टक व दुसरा भाग - नवमी ते पौर्णिमा/ अमावस्या. सप्तक. प्राकृत ( बोली भाषेत) पहिला तो आठवडा व दुसरा तो सप्ताह.
पण पुढे काय झाले दोन्ही , "आठवडे" म्हणून संबोधले जाऊ लागले. हिंदीत दोन्हीला सप्ताह म्हणू लागले. एक प्रकारचा अपभ्रंशच होय.
म्हटले तर ही माहिती तशी काहीजणांना, विशेष उपयुक्त वाटणार नाही. काही जण, " काय फरक पडतो!, म्हणणार्या CATEGORY तील असतात. असो. पण लक्षात घ्या, आजची पिढी चौकस आहे. तुमची नातवंडे / मुले माझ्यासारखी असतील तर विचारतील असे सवाल. मग ही असली माहिती राहू द्यात, तुमच्या पोतडीत .
Just for fun , माझी लहानपणीची आणखीन् एक शंका सांगते. मी नेहमी ज्याला त्याला विचारी, " झाशीच्या राणीने, बाळाला पाठीशी बांधून, लढाईत का नेले? तेथे तर ढाल बांधतात, त्याला 👪सरळ आजीकडे ठेवायचे नं?
आठवा बरे, अशा आपल्या लहानपणीच्या शंका कुशंका! AND ENJOY THOSE. DO YOU WANT TO SHARE WITH ME AND OTHER VIEWERS.
WE WILL MAKE ARRANGEMENT FOR THE SAME SOON.
तूर्त मी लिहिते, तुम्ही वाचा. ओके. भेटत राहू या, असेच दररोज. हां, इतिहास व सामाजिक विषयावर, सवालांचे जबाब द्यावयास आवडतील का? मला हे आदानप्रदान खूप भावेल (अावडेल).👪⏩⏪.
Comments
Post a Comment